त्रिवेणी या काव्यप्रकारात तीन ओळींची कविता असते. ज्यात पहिल्या दोन ओळी म्हणजे एक शेर असतो जो स्वतःमध्ये एक विषय घेऊन असतो.
पण तिसरी ओळ त्या विषयाला एका स्पर्शिकेसारखी स्पर्श करते आणि त्याचा सम्पूर्ण विषय बदलून टाकते
अश्याच माझ्या काही त्रिवेण्या इथे आपल्या समोर सादर करतो ....
.
त्रिवेणी
.
1) तू गेल्यावर नयनांची रिपरिप चालू होती
ढगाळलेल्या मनात आठव दाटली होती
कुठतरी आडोश्याला थांबाव म्हणतोय
.
2) इथे कुणी गुलझार ,
इथे कुणी ग्रेस,
मलाच मीपणा नडतोय
.
3) रडताना पहिलीय माय रात्रभर
१)
हल्ली मला पहिल्या सारखे
कांही नवीन सुचत नाही
.
.
.
बहुधा 'तिच्यात' कांही बदल झाले नसावेत !
२)
ह्या पावसाळ्यात तसा पाऊस
जास्तीचा पडला नाही...
.
.
.
कदाचित 'ती' उन्हाळ्यात खूप रडली असावी!
*****
समीप
*****
आकाशात आणि मनात
एकाच वेळी मळभ कसं दाटून येतं?
आकाशालाही कुणाची तरी आठवण छळते वाटतं!
------------------------------------------------
रोज तर तुझ्याशी बोलणं होतं
फक्त अमावस्या सोडून....
वेडा चंद्रच त्या रात्री उगवत नाही!
------------------------------------------------
स्वतःची तारीफ स्वतःच करते आता
पण आरशासमोर यायचं टाळते
मेला आरसा खोटं का बोलत नाही?
------------------------------------------------
जमतील तितके कढ रिचवले
पण एका नाजुक क्षणी बांध फुटलाच!
काठोकाठ भरलेली कळशी नेहमीच थोड्याश्याही धक्क्याने हिंदकळते!
------------------------------------------------
आज अचानक माझे एक मित्र श्री. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी 'सहज सप्रेम' म्हणून भेट दिलेले,
थोर रचनाकार श्रेष्ठ कवी गुलजार यांचे त्रिवेणी हे पुस्तक हाती आले.
दहा वर्षांपूर्वी वाचून हातावेगळे केलेले हे पुस्तक,आज गतस्मृतींना उजाळा देवून गेले.
पुस्तकात गुलजार यांच्या रचनांचा भावानुवाद कवियत्री शांता ज. शेळके यांनी केलेला आहे.
मेहता पब्लिशिंग हाऊस यांच्या या प्रकाशनाच्या मलपृष्ठावर -
'त्रिवेणी' हा गुलजारांनीच निर्माण केलेला कवितेचा नवा आकृतिबंध.
कोणत्याही भारतीय भाषांतील कवितेत हा रचनाबंध नाही.
हि त्यांची कवितेला देणगीच ! या अल्पाक्षरी कवितेत
अश्रू जाऊ देत वाहून
या पानावरच्या थेंबांसारखे..
..ओलावा मात्र जपून ठेव.