कित्येकदा
कित्येकदा वाटलं, सत्वर निघून माझं प्रेम व्यक्त करावं
कित्येकदा वाटसरू होऊनही दारावरून मी परतावं.
कित्येकदा वाटलं, तु नाही येणार, फार उशीर झाला आता,
कित्येकदा वाट एकाकी बघता मम अंतरंग अमृत व्हावं.
कित्येकदा वाटलं हिशोब करावा, उरले मोजकेच तुकडे,
कित्येकदा वाटलेल्या मर्माचं तु मूल्य चुकतं करावं.
कित्येकदा वाटलं, पुन्हा नको तो चौक आपल्या नात्यात,
जिथून वाटांनी भिन्न दिशा धरण्यास अगतिक व्हावं.
कित्येकदा वाटलं अनैसर्गिक आहे, नित्याचे भांडणे,
कित्येकदा वाटघाट म्हणून तु शिळ्या प्रपंचानामी खपवावं