मराठी काव्य

चाल दैवाची

Submitted by प्रतिक सोमवंशी on 16 May, 2020 - 02:52

चाल दैवाची कुणा कळली कधी
वाट ही दुःखाकडे वळली कधी

का दुरावा मागते मज रात्र ही
सांगना तृष्णा तिची शमली कधी

मी न झालो वृक्ष वाटे बाजूचा
तू न त्याखाली तरी रमली कधी

पापणी ओली कशी होते तुझी
चाल ही नाही मला जमली कधी

ही कहाणी आपुली नाही जरी
ती मला नाही कशी कळली कधी
©प्रतिक सोमवंशी

वूमन्स डे

Submitted by प्रतिक सोमवंशी on 25 June, 2019 - 03:00

व्हेंटिलेटरवर ती
इसीजी चा टूनग, टूनग आवाज
उरात भीती, घश्यात अडकलेले श्वास
वातावरणात पसरलेला औषधी वास
“वाचेल का हो ?” -मी
.
व्हेंटिलेटरवर - ती
फाटलेले ओठ , रक्ताळलेल शरीर
असंख्य जखमा घेऊन, खचलेला धीर
तशी ती चुरगळुन बिरगळुन टाकलेली
रस्तावर कचऱ्याच्या ढिगाच्या काठी
पण खरच कुणी नाही आज तिच्या पाठी
.
व्हेंटिलेटरवर ती
“डॉक्टर प्लिज वाचवा ना तिला” -मी
कस घडल? कुणी केल? तू कोणते कपडे घातले होतेस?
किती पिलेली होतीस? वगैरे वगैरे
एक इंटरव्ह्यू पाहिजे मला फक्त
थोडा वेळ बोलली तरी चालेल

काळ अनंत आहे

Submitted by प्रतिक सोमवंशी on 22 June, 2019 - 08:01

बघ कुठेतरी काहीतरी राहून गेलय...
एक एक क्षण हातातून निसटून जातोय...
तुझाही प्रवास असाच सगळ्यांसारखा...
अनंताकडून अनंताकडे...
काय कमावलस? काय गमावलस?
याच्या हिशोबात पडू नकोस...
तुझ गणित अजूनही कच्चच आहे...
बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार,
इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह, ट्रीग्नोमेट्री,
क्वांटम फिजिक्स, सेलेस्टीअल मेकॅनिक्स,
कॉस्मोलॉजि, अस्ट्रोलॉजि,
न्यूटनचे, डार्विनचे, पायथागोरसचे कोणतेही सिद्धांत लावलेस तरी...
शेवटी ‛शून्य’च उरणार...
वरच्या शंकूतील वाळू खालच्या शंकूत
अशीच हळू हळू निसटत जाणार...
.

काव्य प्रकार :- त्रिवेणी

Submitted by प्रतिक सोमवंशी on 21 June, 2019 - 13:01

त्रिवेणी या काव्यप्रकारात तीन ओळींची कविता असते. ज्यात पहिल्या दोन ओळी म्हणजे एक शेर असतो जो स्वतःमध्ये एक विषय घेऊन असतो.
पण तिसरी ओळ त्या विषयाला एका स्पर्शिकेसारखी स्पर्श करते आणि त्याचा सम्पूर्ण विषय बदलून टाकते
अश्याच माझ्या काही त्रिवेण्या इथे आपल्या समोर सादर करतो ....
.
त्रिवेणी
.
1) तू गेल्यावर नयनांची रिपरिप चालू होती
ढगाळलेल्या मनात आठव दाटली होती
कुठतरी आडोश्याला थांबाव म्हणतोय
.
2) इथे कुणी गुलझार ,
इथे कुणी ग्रेस,
मलाच मीपणा नडतोय
.
3) रडताना पहिलीय माय रात्रभर

राजकारण

Submitted by प्रतिक सोमवंशी on 17 May, 2019 - 00:23

पैश्यांचे छप्पर | पैश्यांच्याच भिंती
नात्यांच्या किंमती | मातीमोल ||

लक्ष खुर्चीवर | राजकारण हे
मरु दे मेले ते | सत्ता हवी ||

घरात घुसले | समृद्धीचे मार्ग
मातीविन स्वर्ग | व्यर्थ जाय ||

असे हे आमुचे | राज्य मॅग्नेटिक
बळीराजा भीक | मागतोया ||

टांगला फांदीला | जीव हा लाखाचा
दुष्काळ सुखाचा | मोक्षोत्तर ||

येऊ द्या सत्ता | काढुया रुसवे
असेना फसवे | अच्छे दिन ||

दिवस सरतो सारा..

Submitted by दुसरबीडकर on 12 August, 2013 - 07:31

दिवस सरतो सारा,
सरत नाही कातरवेळ.
तुझे माझे क्षण असे,
जुळत नाही कसला मेळ.
आठवांचा प्रवास आणि,
जिवघेण्या जखमांनी..
भळभळतेय जिंदगानी,
किती काळिजवेदनांनी.
तू निघुन गेलीस अवचित,
आयुष्याचा शेणसडा झाला,
ऒळखीचं नव्हतं गाव,
जिव थोडा वेडा झाला.
आता होईल संध्याकाळ,
मग थोडं बर वाटेल,
रात्र झोपेल आणि माझी,
पहाटे मात्र धीर सुटेल..
असा खेळ रोज चालतो,
मी मात्र कायदे पाळतो,..
पोटापाण्याचं बघतो आधी,
मग तुझे आठव चाळतो..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

दिवस सरतो सारा..

Submitted by दुसरबीडकर on 12 August, 2013 - 07:30

दिवस सरतो सारा,
सरत नाही कातरवेळ.
तुझे माझे क्षण असे,
जुळत नाही कसला मेळ.
आठवांचा प्रवास आणि,
जिवघेण्या जखमांनी..
भळभळतेय जिंदगानी,
किती काळिजवेदनांनी.
तू निघुन गेलीस अवचित,
आयुष्याचा शेणसडा झाला,
ऒळखीचं नव्हतं गाव,
जिव थोडा वेडा झाला.
आता होईल संध्याकाळ,
मग थोडं बर वाटेल,
रात्र झोपेल आणि माझी,
पहाटे मात्र धीर सुटेल..
असा खेळ रोज चालतो,
मी मात्र कायदे पाळतो,..
पोटापाण्याचं बघतो आधी,
मग तुझे आठव चाळतो..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..

.. शुभ्रकळ्या... जगती सार्‍या...

Submitted by शशिकांत ओक on 28 May, 2011 - 06:11

.. शुभ्रकळ्या... जगती सार्‍या...

गुलमोहर: 
Subscribe to RSS - मराठी काव्य