‘रात’
आज पुन्हा रात जागी
काळोखात नहायलेली
वाट पहात उद्याची
दमलेली भागलेली
आज प्रसवली रात
आज उगवला चांद
त्याच्या स्पर्शाने मोहरे
रात झाली धुंद धुंद
तिला गवसला सूर
माजे सत्याचे काहूर
आज जरी रात जागी
तरी चांदणे टिपूर
रात माझी ही आगळी
घाले स्वप्नांची रांगोळी
आज डोळे उघडून
रात पूर्ण विसावली
- प्रज्ञा
नुकताच वाहून आलेला गाळाखाली
अन पाण्याखाली दबलेल्या असंख्य बाभळी
त्यांच्या नबुडालेल्या शेंड्यांवर आधार घेणाऱ्या
प्लास्टिकच्या पिशव्यांसारख
पाण्याला स्पर्श करत तग धरून राहण
जमत का कुणाला?
.
इतक्या दिवस कोरड्या बसलेल्या पात्रातून
काँक्रीटच्या बांधांना उखडून टाकणाऱ्या
मातीच्या घाटांना विरघळून पिणाऱ्या
नुकत्याच अंकुरलेल्या शेतांना संजीवनी देणाऱ्या जलप्रपातासारख
स्वतःला वाहून घेणं
जमत का कुणाला?
.
इथ सगळ सोसाव लागत
ना कोरडं राहता येत ना मोकळं वाहता येत
निरव रात्रीच्या शांत प्रहरी
स्ट्रीटलॅम्प च्या शांत, पिवळ्या प्रकाशात
तो रस्ता जणू शांतपणे वाहणाऱ्या नदीगत भासतो
त्या पाण्याच्या चादरीला विस्कटून,
त्याच्या शांततेला भंग करणाऱ्या
एका पाठोपाठ एक जाणाऱ्या गाड्यांच्या
इंजिनाची घरघर,
हॉर्नचे कर्कश आवाज
या सर्वांच्या मध्ये कधी ऐकू येते,
कधीतरी
कुणीतरी
कुठेतरी
शेजारच्या पायवाटेने
शिशिराची पानगळ तुडवत चाललेलं
मी खिडकीत उभा राहून
ते पानांचं साग्रसंगीत ऐकत असतो
समोरच्या चंद्राला बघून स्ट्रीटलॅम्प त्याचा हेवा होत असेल ना?
व्हेंटिलेटरवर ती
इसीजी चा टूनग, टूनग आवाज
उरात भीती, घश्यात अडकलेले श्वास
वातावरणात पसरलेला औषधी वास
“वाचेल का हो ?” -मी
.
व्हेंटिलेटरवर - ती
फाटलेले ओठ , रक्ताळलेल शरीर
असंख्य जखमा घेऊन, खचलेला धीर
तशी ती चुरगळुन बिरगळुन टाकलेली
रस्तावर कचऱ्याच्या ढिगाच्या काठी
पण खरच कुणी नाही आज तिच्या पाठी
.
व्हेंटिलेटरवर ती
“डॉक्टर प्लिज वाचवा ना तिला” -मी
कस घडल? कुणी केल? तू कोणते कपडे घातले होतेस?
किती पिलेली होतीस? वगैरे वगैरे
एक इंटरव्ह्यू पाहिजे मला फक्त
थोडा वेळ बोलली तरी चालेल
एक अशीच कविता
अविरत साथ दिली मजला
पिऊनी कित्येक पावसाळे
नेहमीच माझ्या सोबत होते
माझ्या पायी माझे जोडे
दरवाज्या बाहेर उभे नेहमी
तरी ना कसली तक्रार करती
निमूट माझा भार झेलुनी
बाहेर पडती माझे जोडे
गुपचूप नजर असे तुझ्यावर
पण मोजमाप करती माझे
कौतुक शब्द न बोलती
लांबून पाहुनी माझे जोडे
सोबत होती ठायी ठायी
अगणित खाचा, काटे खाऊनी
माझ्यासाठी झिजले ते
माझ्याहुनी जास्त माझे जोडे
आज पुन्हा उडावेसे वाटले
पंखाना जरा विहारावेसे वाटले
दगदग काय रोजचीच
आज उसंतीला चाखावेसे वाटले
घोटभर शांततेसाठी
हे मायाजाल हटवावेसे वाटले
आज पुन्हा उडावेसे वाटले
आकाशात हरवावेसे वाटले
धावपळीत विरघळलेल्या मला
अलगद ओढावेसे वाटले
आज पुन्हा उडावेसे वाटले
नभीचे तरंग वेचावेसे वाटले
विस्मृतित गेलेल्या बालपनाला
परत जगावेसे वाटले
त्या निरगसतेत
झोकून द्यावेसे वाटले
तुझ्या येण्याने
तुझ्या येण्याने...
ऋतू बदलणार नाहीत
...हे मलाही आहे माहित
पण पानगळीतही आतल्या आत
बहरत राहील झाड
तेव्हा गळणाऱ्या पानांचं पिवळं मन
त्याला विचारणार नाही प्रश्न
‘कसं रे सहायचं आता हे जग उष्ण”
तू येऊनही...
ग्रीष्माचा दाह तसाच असेल टिकून,
पण गोड होईल स्वप्न
आतल्या आत पिकून ...
पिवळ्या केशर आंब्यासारखं
काळ्याभोर कोकिळेसारखं
गात राहू उन्हात
कुठेतरी बनात
असेल निवारा
परक्याचा का होईना
राहू एखाद महिना
... पुन्हा नवा ऋतू ...
तुझ्या येण्याने ...
मीही भिजून जाईन पावसात
एकाकी वाटणार नाही
कितीतरी दिवसात
तुझ्या सोबतीनं
घडत जाईल सारं