कुणी आहे का नदी बनायला तयार?
Submitted by प्रतिक सोमवंशी on 25 August, 2019 - 01:04
नुकताच वाहून आलेला गाळाखाली
अन पाण्याखाली दबलेल्या असंख्य बाभळी
त्यांच्या नबुडालेल्या शेंड्यांवर आधार घेणाऱ्या
प्लास्टिकच्या पिशव्यांसारख
पाण्याला स्पर्श करत तग धरून राहण
जमत का कुणाला?
.
इतक्या दिवस कोरड्या बसलेल्या पात्रातून
काँक्रीटच्या बांधांना उखडून टाकणाऱ्या
मातीच्या घाटांना विरघळून पिणाऱ्या
नुकत्याच अंकुरलेल्या शेतांना संजीवनी देणाऱ्या जलप्रपातासारख
स्वतःला वाहून घेणं
जमत का कुणाला?
.
इथ सगळ सोसाव लागत
ना कोरडं राहता येत ना मोकळं वाहता येत
शब्दखुणा: