Submitted by लतांकुर on 2 September, 2013 - 10:01
आज पुन्हा उडावेसे वाटले
पंखाना जरा विहारावेसे वाटले
दगदग काय रोजचीच
आज उसंतीला चाखावेसे वाटले
घोटभर शांततेसाठी
हे मायाजाल हटवावेसे वाटले
आज पुन्हा उडावेसे वाटले
आकाशात हरवावेसे वाटले
धावपळीत विरघळलेल्या मला
अलगद ओढावेसे वाटले
आज पुन्हा उडावेसे वाटले
नभीचे तरंग वेचावेसे वाटले
विस्मृतित गेलेल्या बालपनाला
परत जगावेसे वाटले
त्या निरगसतेत
झोकून द्यावेसे वाटले
उंचावरच्या जगात
मला आजमावेसे वाटले
अंहपणाचा जप सोडून
आज पुन्हा उडावेसे वाटले
फार झाली आता
अस्तित्वाची लढाई
त्या गोड पाखरसारखे
आज जगावेसे वाटले.....
जगावेसे वाटले.......
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान कल्पना
छान कल्पना
खूप खूप धन्यवाद.....!!!!
खूप खूप धन्यवाद.....!!!!