लेखनसुविधा

डाॅ.कुमार1 यांचे जाहीर आभार.

Submitted by पुरंदरे शशांक on 7 August, 2023 - 11:26

डाॅ.कुमार1 यांचे जाहीर आभार.

आपल्या मायबोलीवर वैद्यकीय विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण लेखन करणारे डाॅ.कुमार 1 - हे आपणा सर्वांना सुपरिचित आहेतच.

याच डाॅ.नी हार्ट अॅटॅकवर शिक्का मोर्तब करणारे ट्रोपोनिन यावर एक लेख इथे लिहिलेला आहे - जो मी आधीच वाचलेला होता.

एक उंबरा

Submitted by पुरंदरे शशांक on 12 November, 2024 - 00:12

एक उंबरा

एक उंबरा घरा,मनाचा
जरा जरासा वाट अडवुनि
स्वस्थ बसावा

एक कोपरा घरा,मनाचा
गर्द ताटवा, अजाण वेडा
बहरुन जावा

एक अंगण घरा,मनाचे
उदारतेने अनाहूताला
देत विसावा

एक मार्ग हा घरा,मनाचा
हात धरोनी, माणुसकीचा
स्पर्शत जावा

एक झरोका घरा,मनाचा
स्वच्छ प्रकाशे लखलखणारा
तेवत जावा

एक पायरी घरा,मनाची
जाता येता, अवचितवेळी
आधार व्हावी

एक पोकळी घरा,मनाची
अथांगता अन तरीही स्तब्धता
देत विसावा

एक असोशी घरा, मनाची
अविरत धारा, उगेउगेची
देत रहावी

असे भास होती

Submitted by पुरंदरे शशांक on 27 August, 2024 - 02:36

असे भास होती

असे भास होती उन्हासावलीचे कळेना कुठे तो उभा ठाकलो
अकस्मात सारे उभे अंतरंगी खुळावे कसा मी नभी रंगलो

रमावे तरी येथ नाही असे की नसे राम येथे पुरा गुंतलो
निघावे तरी स्वैर जावे कुठे मी जगावेगळ्या या घरी थांबलो

नसे गीत ना सूर काही जरासे कसा यात का व्यर्थ नादावलो
असे भास निर्जिव होती कशाला सुरावेगळा फक्त भांबावलो

कळेना जिवाला खरे काय भासे मृगांबू न सारे किती शोष तो
कसा भास तो स्पर्शताचि जिभेला कसा शांत होता पुन्हा जागलो

पॉझ..अनपॉझ

Submitted by कविन on 3 July, 2024 - 06:30

दिवस कुठचातरी. मेडीटेशनचा ऑनलाईन वर्ग मध्यात आलाय. प्रि रेकॉर्डेड व्हिडीओ समोरच्या स्क्रिनवर सुरु आहे. पार्श्वसंगीत म्हणून हरिप्रसाद चौरसियांची बासरीची धून वाजतेय.

व्हिडीओमधे प्रशिक्षक पद्मासनात बसून सुचना देतोय, "डोळे मिटा…अंग सैल सोडा"

प्रि रेकॉर्डेड व्हिडीओ बघताना एकाचवेळी कनेक्टेड आणि डिसकनेक्टेड वाटतं मला, no strings attached type काहीसे. पण ते चांगलं आहे की नाही हे मात्र अजून कळले नाहीये.

चुकलं तरी हरकत नाही

Submitted by कविन on 18 June, 2024 - 03:14

होतं असं, चुकतं काही
फसतं गणित, सुटत नाही
पुन्हा पुसून गिरव पाटी
नव्याने मांड अंक लिपी
हातचे नीट मिळवून बघ
ऋण, धन निरखून बघ
सुटत जाईल हळूहळू
तुझे तुलाच लागेल कळू
चुकणं म्हणजे, विराम निव्वळ
तो ही स्वल्पच, पूर्ण नाही
चुकलं तरी हरकत नाही
फार काही बिघडत नाही

'ती' मी नव्हेच!

Submitted by कविन on 5 June, 2024 - 23:26

ती, संवेदनशील..कलाकार वगैरे
मी? प्रॅक्टिकल.. रुक्ष..स्वार्थी वगैरे
ती, गाते..नाचते.. भाव प्रकटते
मी? अभावानेही व्यक्त न होते
ती, नि:शब्दालाही वश करते
मी? शब्दांमधेही चाचपडते
ती, मोत्याचे दाणे पेरते
मी? उगवेल ते आपलं म्हणते
ती, देहात अडकूनही मुक्त
मी? मुक्त असूनही बांधलेली
ती, अस्वस्थ झाली कि साद घालते
मी? तिच्या अस्वस्थतेला वाट देते
ती, येते माझ्या स्वप्नात कधीकधी
मी? उतरवते तिची स्वप्न कधीकधी
ती, व्यक्त होऊन माझ्यापाशी, परत रिती होते
मी? तिच्या व्यक्त होण्याला, 'माझी कविता' म्हणून मोकळी होते

मन कुठेच लागत नाही

Submitted by पुरंदरे शशांक on 11 March, 2024 - 00:49

मन कुठेच लागत नाही

निवळुनी नभ सावरले
रानात भरारे वारा
गर्दावा दाटून आला
गंधाळून कंच पिसारा.... 1
पण भुलवित नाही काही
मन कुठेच लागत नाही

त्या दूर दूरशा वाटा
ना खुणाविती ते काही
निश्चलशी डोंगरमाथी
काजळीत बुडूनी राही....2
एकटा उसासून जाई
मन कुठेच लागत नाही

मी स्तब्ध उभा माझ्यात
शोधी ना काही त्यात
तळहात निरखिता नाही
उरले ना तरीही पाही....3
ना खंत न काही सरले
मन कुठेच लागत नाही

पहेलवान आणि मराठी म्हणी

Submitted by ASHOK BHEKE on 12 January, 2024 - 10:37

आखाड्याच्या मैदानात पहेलवानाला किमंत होती. दगडाला धोंडा म्हणा किंवा धोंड्याला दगड म्हणा. शेवटी आमचा पहेलवान म्हणजे सरतेशेवटी दगडच. धोंडया हे टोपण नांव. बिनामिशीचा पहेलवान..आंधळ्या गायीत लंगडी गाय शहाणी म्हणतात ना.. तसा आमचा पहेलवान,पोटात एक अन ओठात एक होतं.त्याचे आचार भ्रष्ट होते. आज तो जिंकला असेल किंबहुना अंबारीत बसायचा योग आला असेल. त्याला अर्थ नव्हता.पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवला की काय.. लोक विचारात पडले होते. कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले काय, तरी ते कडुच.

माझा एक प्रश्न ........अशोक भेके

Submitted by ASHOK BHEKE on 16 September, 2023 - 01:32

मराठा आहेत म्हणून सरकार आहे..... हा माझा लेख मायबोलीवर delete का करण्यात आला. उत्सुकता आहे. उत्तर जाणून घेण्याची.

Pages

Subscribe to RSS - लेखनसुविधा