उधाणलेल्या दर्यासारखी
उधाणलेल्या दर्यासारखी
घुसळण करीत खालीवर
हेलकावणारे एक होडकं
अलगद ठेवील वाळूवर
चमचमणार्या तार्यांसारखी
लाखोमैल दूरवर
किरकिरणार्या रात्रीतही
पाखर घालील डोळ्यांवर
मस्तमौला वार्यासारखी
उधळत जाईल क्षणभर
निळे निरभ्र नीरव काही
मागे ठेवील ओंजळभर
खोल निगूढ डोहावाणी
काजळ लावीत डोळाभर
सावळ काळी एक सावली
पसरत जाईल ह्रदयावर
सरसर सरसर थेंबांसारखी
ओघळत थेट मनभर
लसलसणारी कोवळ पाती
उगवून येतील भुईवर
अज्ञात घनदाट अरण्यातून तो वाटसरू झरझर पावले टाकत चालला होता.
वरवर पाहता तो घाईत चालला आहे, असे पाहणाऱ्यास वाटले असते. पण जवळून निरीक्षण केल्यास तो कुठल्यातरी अनामिक भीतीने ग्रासलेला होता.
'त्या जंगलात अनेक नरभक्षक आहेत. सांभाळून राहा.'
त्याला गुरुजींचे शब्द आठवले.
आता मात्र त्याला चालता चालता धाप लागली. त्यामुळे एका डेरेदार वृक्षाखाली तो बसला, व आपल्या झोळीतून त्याने पाण्याची बाटली बाहेर काढली, व तो घटाघटा पाणी पिऊ लागला.
"आम्हासही पाणी मिळेल का?"
त्याने चमकून आवाजाच्या दिशेने बघितले.
एक वृद्ध माणूस त्याच्याकडे याचना करत होता.
©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रण, अनुवादन किंवा कुठल्याही माध्यमात रूपांतरण करताना लेखकाची परवानगी आवश्यक!
अज्ञातवासी या प्रदीर्घ कथेचा हा एक टप्पा इथे पूर्ण होतोय. असे अनेक टप्पे अजून बाकी आहेत. पण वाचकांना (आणि मलाही) थोडीशी उसंत मिळावी, म्हणून इथे खंड घेतोय. मात्र इतर धाग्यांवर भेटेनच.
यानंतरचा भाग एका आठवड्यानंतर प्रकाशित होईल.
हिटलर मनाची केवढी बेबंदशाही !
होकार देण्याऐवजी म्हणतेय नाही
वृद्धाश्रमांमध्ये अताशा जात नाही
येथेच नंतर यायचे आहे मलाही
नजरेत त्याच्या कैद होते नजर माझी
साध्या गुन्ह्याची केवढी मोठी सजा ही !
प्रत्येक येणारा ऋतू येतो नि जातो
त्याच्या स्मृती रेंगाळलेल्या बारमाही
प्रतिबिंब दिसते आपल्याला त्याप्रमाणे
न्याहाळतो ऐन्यात कोनातून ज्याही
जेव्हा नदीचे पात्र बघते आटलेले
सहवेदना माझ्यातली होते प्रवाही
अस्थिर जगाला का उगाचच दोष द्यावा
स्थित्यंतरे माझ्यातही झालीच ना ही ?
सुप्रिया मिलिंद जाधव
मायबोलीवरील हस्ताक्षर स्पर्धेचा सगळ्या मबोकरांचा उत्साह बघून मलाही 4 ओळी लिहायचा मोह आवरला नाही.
गट ब
मायबोली आयडी -- वर्णिता
मायबोलीवरील स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना संग्रह ह्या धाग्यावरील एक स्तोत्र .
।। श्री गणेशाय नमः ।।
| गणपती बाप्पा मोरया |
|| मंगलमूर्ती मोरया ||
मी या अगोदर एक प्रवेशिका दिली असल्याने ही प्रवेशिका ग्राह्य धरली जाऊ नये.
| गणपती बाप्पा मोरया |
| मंगलमूर्ती मोरया |
संयोजकांना विनंती आहे की प्रवेशिका स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाऊ नये.