©संततधार - भाग १ - भेट!
©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.
या कथेचा पुढील भाग भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवार, दिनांक २८ मे रोजी रात्री ९ वाजता प्रकाशित होईल.
©सर्व हक्क लेखकास्वाधीन. कुठल्याही प्रकारे पुनर्मुद्रित अथवा रूपांतरण करताना लेखकाची परवानगी अनिवार्य राहील.
या कथेचा पुढील भाग भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवार, दिनांक २८ मे रोजी रात्री ९ वाजता प्रकाशित होईल.
चाल दैवाची कुणा कळली कधी
वाट ही दुःखाकडे वळली कधी
का दुरावा मागते मज रात्र ही
सांगना तृष्णा तिची शमली कधी
मी न झालो वृक्ष वाटे बाजूचा
तू न त्याखाली तरी रमली कधी
पापणी ओली कशी होते तुझी
चाल ही नाही मला जमली कधी
ही कहाणी आपुली नाही जरी
ती मला नाही कशी कळली कधी
©प्रतिक सोमवंशी
1) आपण मायबोलीकर रामायण बघत आहेत का?
2) तुमचा काय विचार आहे रामा बदल?
3) रामायण मध्यली कोणती गोष्ट तुम्हाला भावली?
4) हा आधी बघील होत का रामायण?
5) अस म्हणतात की रामायण प्रत्येक वेळेस वेगळे समजते म्हणून मग तुमाला काय वेगळे वाटले हा वेळेस?
6) श्रीराम बदल आपले विचार?
7) श्री सीता बदल आपले विचार?
8) श्रीराम भक्त हनुमान बदल आपले विचार?
मला अस वाटत की रामायण हे समजून घेणाचा ग्रंथ आहे म्हणून विचारात आहे तुमचे मते. म्हणून जास्तीत जास्त विचार नोंदवा.
याआधीचे भाग!
भाग ८
https://www.maayboli.com/node/71963
भाग ७
https://www.maayboli.com/node/71844
दुसरीत / तिसरीत असतांना, म्हणजेच ९/१० वर्षाचा असताना मी सायकल चालवायला शिकलो.प्रथम हातात सायकल धरून , एक हात हँडलला व एक हात सीटला धरून,घरापुढील अंगणात गोल गोल चकरा मारता, मारता,मध्येच दांड्याखालून तिरका पाय टाकून तोल सावरता/सावरता सायकल चालवायला माझा मीच शिकलो.सर्वात प्रथम जेव्हा तोल सांभाळत , उतारावरून जायचो तेव्हा स्वनिर्मितीचा, आपण कांहीतरी केल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला .
गुढी
ना वाजले कधी
पैंजण तिचे
ना वाजले कंकण तिचे
सहवासात तिच्या उजळले
परम भाग्य माझे
ना ल्यायली कधी
भरजरी नव वस्त्रे तिने
लज्जास्तव फटे पुराने
ना मधु शर्करा मुखी
ना कडूलिंबाचे गाऱ्हाणे
ताठ मानेने उभी कुडी
माझ्या अंगणी गुढी
नतमस्तक मी त्यापुढे
सुखी ठेव एवढेच साकडे
चैत्री पाडव्याकडे
राजेंद्र देवी
ती येते
अगदी आपसूक
कधीही, कुठेही
न सांगता ....
ती आल्याशिवाय राहत नाही
ती वेळ काळ पाहत नाही
कितीही प्रयत्न करूनही
ती टाळता काही येत नाही
घड्याळाच्या काट्याला तर
ती जरासुद्धा घाबरत नाही
कधीच एकटंराहू देत नाही
दूर तिच्यापासून जाऊच देत नाही
वाट्टेल तेव्हा येऊन जाते
जे द्यायचं ते देऊन जाते
घेता घेता आपल्याला
आपलसं हि करून घेते
स्वीकारलं कि बांधून ठेवते
धिक्कारल्यावर हरवून जाते
हसवून जाते गालातल्या गालात
कधी डोळ्यातून वाहून जाते
© अनुप साळगांवकर - दादर
नमस्कार!
माझ्या एका मैत्रिणीचे MBA पूर्ण झालेले असून घरातल्या काही जबाबदाऱ्यामुळे ती बाहेर काही जॉब करू शकत नाहीये. तिचं MBA मार्केटिंग मध्ये झालेले आहे.
तर ती ऑनलाइन फ्रीलान्सर म्हणून काम करू इच्छिते. याविषयी मला काहीही माहिती नसल्याने हे बेसिक प्रश्न.
१. हे काम कुठून शोधता येईल, व कुठून चांगला स्टार्ट मिळेल?
२. त्यासाठी काय करावे लागेल.
३. मार्केटिंग रिलेटेड वर्क कुठे जास्त मिळेल.
४. या कामासाठी अजून काही एक्स्ट्रा सर्टिफिकेशन करावं लागेल का?
आणि अजून काही माहिती, गरजेची असल्यास.
जाणकारांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत.
पाणीपुरी
आपलं नातं म्हणजे मित्रा
आहे चवदार पाणीपुरी
तिखट, गोड, आंबट, तुरट
जिभेला चव येते न्यारी
जास्त पाणी भरता जशी
कोलमडून पडते पुरी
मैत्रीचंही तसंच काहीसं
ती जपण्याचीच कसरत खरी
उतावीळपणे घाई करता
तिखटाचा हा जातो ठसका
भांडण, तंटा, रुसवे, फुगवे
मैत्रीत थोडा मारू मस्का
सगळे जिन्नस प्रमाणात असता
जिभेवर चव रेंगाळते भारी
आपलेपणाने वाद घालायलाही
संवादाची गरज खरी
"अरे, तिखा कम करो !"
भैयालाही देऊ दम
तुझ्या माझ्या मैत्रीत राहूदे
थोडी ख़ुशी, थोडा गम