Submitted by पूर्वी on 20 April, 2020 - 12:27
1) आपण मायबोलीकर रामायण बघत आहेत का?
2) तुमचा काय विचार आहे रामा बदल?
3) रामायण मध्यली कोणती गोष्ट तुम्हाला भावली?
4) हा आधी बघील होत का रामायण?
5) अस म्हणतात की रामायण प्रत्येक वेळेस वेगळे समजते म्हणून मग तुमाला काय वेगळे वाटले हा वेळेस?
6) श्रीराम बदल आपले विचार?
7) श्री सीता बदल आपले विचार?
8) श्रीराम भक्त हनुमान बदल आपले विचार?
मला अस वाटत की रामायण हे समजून घेणाचा ग्रंथ आहे म्हणून विचारात आहे तुमचे मते. म्हणून जास्तीत जास्त विचार नोंदवा.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
मायबोली वर रामायण?
मायबोली वर रामायण?
नाही नाही, इथे फक्त महाभारत घडत असते.
मायबोली वर पण रामायण घडावे
मायबोली वर पण रामायण घडावे म्हणून तर लिहलंय ना पाथफाईंडर... प्रतिसाद बदल धन्यवाद
रामायणात आदर्श "पात्र" असतात.
रामायणात आदर्श "पात्र" असतात. इथे ते शक्य नाही.
घ्या टाकली ठिणगी. आता माझ्या वाक्यावरून पेटवा इथे रामायण.
उत्तर रामायण काहींच्या काही
उत्तर रामायण काहींच्या काही बोरिंग आहे...
(आता बहुतेक धागा धावेल
तेव्हा तो सुजलेला नव्हता, पण
तेव्हा तो सुजलेला नव्हता, पण माणसाने तेव्हापासून आतापर्यंत आपल्या अभिनयात काडीमात्र बदल केलेला नाही हे विशेष!
रामायणात आदर्श "पात्र" असतात.
रामायणात आदर्श "पात्र" असतात. इथे ते शक्य नाही.>>>
आम्हीच कसे आदर्श आहोत हे दाखवायची शर्यत चालते की !
अजिंक्यराव
1) आपण मायबोलीकर रामायण बघत
1) आपण मायबोलीकर रामायण बघत आहेत का?>>>
कधीमधी
2) तुमचा काय विचार आहे रामा बदल?>>>
मोकाका !
3) रामायण मध्यली कोणती गोष्ट तुम्हाला भावली?>>>
पुष्पक विमान !
4) हा आधी बघील होत का रामायण?>>>
थोडंफार
8) श्रीराम भक्त हनुमान बदल आपले विचार?>>>>
शाकाका !
आनंद. मेकाका आणि शाकाका
आनंद. मेकाका आणि शाकाका म्हणजे काय???
उत्तर रामायण काहींच्या काही
उत्तर रामायण काहींच्या काही बोरिंग आहे... पण सीता चे खूप हाल झाले पूर्ण रामायणात.
1) आपण मायबोलीकर रामायण बघत
1) आपण मायबोलीकर रामायण बघत आहेत का?
मी लहानपणी देखील रामायण महाभारत फारसे बघितले नाही. कारण त्याआधी मी हे ग्रंथ वाचले होते. व्यास आणि वाल्मिकींनी लिहिलेल्या ग्रंथवाचनानंतर डोळ्यासमोर जे चित्र होते त्याला या मालिका पुर्ण न्याय देऊ शकल्या नाही असे वाटले. जसे सुशींचे दुनियादारी पुस्तक वाचलेल्यांना दुनियादरी चित्रपट फारसा रुचला नाही तसेच झाले थोडेफार.. तरी घरी लागायचे म्हणून डोळ्याण्वर पडायचे अध्येमध्ये.
2) तुमचा काय विचार आहे रामा बदल?
राम बस्स भक्तों के ना शत्रू के भी चिंतन मे है
राम तेरे मन मे है राम मेरे मन मे है
मन से रावण जो निकाले राम ऊसके मन मे है
- शाहरूख खान, स्वदेश
3) रामायण मध्यली कोणती गोष्ट तुम्हाला भावली?
कुंभकर्णाचे बंधुप्रेम. झोपेतून उठला लढायला उतरला. बिभिषणगिरी करत बसला नाही.
4) हा आधी बघील होत का रामायण?
नाही. वर लिहिले आहे कारण..
5) अस म्हणतात की रामायण
5) अस म्हणतात की रामायण प्रत्येक वेळेस वेगळे समजते म्हणून मग तुमाला काय वेगळे वाटले हा वेळेस?
वाचताना प्रत्येक वेळेस वेगळे वाटले. हळूहळू रावण बिभिषण कुंभकर्ण वाली सर्वांची बाजू समजू लागली. हुमायुन नेचर माणसांनाच नाही तर राक्षसांना आणि वानरांनाही लागू होते हे समजले. ते त्या त्या परिस्थितीत तसे का वागले असावेत हे उमगले.
6) श्रीराम बदल आपले विचार?
वर झालाय हा प्रश्न
7) श्री सीता बदल आपले विचार?
दुर्दैवाने सीतेला रामायणात स्वतंत्र स्थान नाही. राम आहे म्हणून सीता आहे. आजही सीतेचे नाव घेताच सोबत राम आठवतोच कारण ती रामायणातील सीता आहे. सीतायणातली नाही. म्हणताना लोकं म्हणतात की रामायण महाभारत एका स्त्री मुळे घडले. पण या दोन्ही कथा स्त्री प्रधान वा समसमान नसून संपुर्णत: पुरुषप्रधान आहेत.
8) श्रीराम भक्त हनुमान बदल आपले विचार?
जय बजरंगबली तोड दे दुश्मन की नली.
@ऋन्मेऽऽष खूप सुंदर प्रतिसाद
@ऋन्मेऽऽष खूप सुंदर प्रतिसाद दिला आहे आपण.
1) आपण मायबोलीकर रामायण बघत
1) आपण मायबोलीकर रामायण बघत आहेत का?
- रामायण तीनदा संपूर्णपणे बघून झालेल आहे. उत्तर रामायण बघायची बिलकुल इच्छा नाही.
2) तुमचा काय विचार आहे रामा बदल?
- महादेव रामाला भजतात. एक सीतेची अग्निपरीक्षा हा पार्ट सोडल्यास संपूर्ण रामायणात रामात एकही अवगुण आढळत नाही. म्हणून रामाला पुरुषोत्तम का म्हणतात हे कळते. उत्तर रामायण मला खरंसुद्धा वाटत नाही. मध्येच पाणी टाकून घुसडल्यासारखं वाटतं.
3) रामायण मध्यली कोणती गोष्ट तुम्हाला भावली?
- निष्ठा. दोन्ही बाजूंची त्यांच्या सर्वोच्च नेत्यावर असलेली निष्ठा. विभीषण हा अपवाद वगळता.
4) हा आधी बघील होत का रामायण?
- हो. दोनदा
5) अस म्हणतात की रामायण प्रत्येक वेळेस वेगळे समजते म्हणून मग तुमाला काय वेगळे वाटले हा वेळेस?
- लहानपणी रामायण बघताना राममधील देवत्व आणि रावणामधील राक्षससत्व शोधलं. यावेळेस दोघांचा मानव म्हणूनच विचार केला.
यावेळेस इंद्रजित आणि कुंभकर्ण यांविषयी अपार सहानुभूती वाटली. भरत, लक्षण आणि हनुमान यांच्याविषयी असलेला आदर आणखीन दुणावला. रावणाविषयी आधीच आदर होता, तो अजून वाढला.
6) श्रीराम बदल आपले विचार?
- राम ते श्रीराम हा मानवाचा देवत्वाकडे झालेला प्रवास आहे. या प्रवासात अनेक घाव सोसून शेवटी देवत्व प्राप्त झालेला एक पुरुषोत्तम, असं श्रीरामाचं वर्णन करता येईल.
7) श्री सीता बदल आपले विचार?
- त्याकाळचा समाज लक्षात घेता सीतेने कायम आदर्श पत्नीव्रत निभावाल, आणि रामायण घडवण्यात महत्वाची भूमिका निभावली. अगर सीता ना होती, तो राम कभी श्रीराम नही बन पाते!
8) श्रीराम भक्त हनुमान बदल आपले विचार?
- देवापेक्षा भक्त मोठा! हनुमानात शोधूनही अवगुण सापडत नाही. एक बुद्धिवान,बलशाली आणि तितकाच परमभक्त. जय हनुमान! स्वतःच्या शक्तीची जाणीव असलेला, पण त्याचा मिथ्या गर्व नसलेला.
1) आपण मायबोलीकर रामायण बघत
1) आपण मायबोलीकर रामायण बघत आहेत का?
>>> नाही
2) तुमचा काय विचार आहे रामा बदल?
>>> रामाच्या मंदिरात प्रसन्न वाटते.
3) रामायण मध्यली कोणती गोष्ट तुम्हाला भावली?
>>>रामाचे पितृप्रेम.
4) हा आधी बघील होत का रामायण?
>> नाही
5) अस म्हणतात की रामायण प्रत्येक वेळेस वेगळे समजते म्हणून मग तुमाला काय वेगळे वाटले हा वेळेस?
>> आधी पाहिले नाहीय.
6) श्रीराम बदल आपले विचार?
>>> सर्वगुणसंपन्न. बाली हत्या पटली नाही मात्र.
7) श्री सीता बदल आपले विचार?
>>> सीता माता ...
8) श्रीराम भक्त हनुमान बदल आपले विचार?
>>> बोल बजरंग बलीकी जय !!!
@अज्ञातवासी छान विचार आहेत.
@अज्ञातवासी छान विचार आहेत.
) आपण मायबोलीकर रामायण बघत
) आपण मायबोलीकर रामायण बघत आहेत का?
अजिबात नाही.
2) तुमचा काय विचार आहे रामा बदल?
मर्यादापुरुषोत्तम
3) रामायण मध्यली कोणती गोष्ट तुम्हाला भावली?
जटायू, वानरांची फौज रामाने घेतली याचं नवल वाटलं. जटायूला (गरूड) सोबत घेतल्याने कदाचित कोब्रा वगैरे सर्प प्रजातीला सोबत घेता आलं नसावं..
4) हा आधी बघील होत का रामायण?
हो... म्हणूनच आता पाहत नाही.
श्री सीता बदल आपले विचार?
पतिव्रता
@ maheshp जटायू हा गरुड
@ maheshp जटायू हा गरुड नव्हता तो तर गिधाड होता
मला असं वाटतं की रामायण
मला असं वाटतं की रामायण नेहेमी आपल्याला आपण कसे वागावे, आपले कसे आचार-विचार असावेत हे शिकविते...
महाभारत मात्र बरोब्बर आपण कसे उद्दाम, बेफिकिर वागू नये, हे सांगते...
1.घरातले नको असलेले वारस साम
छान
प्रसन्न हरणखेडकर @ हो मलाही
प्रसन्न हरणखेडकर @ हो मलाही असच वाटते. रामायण आणि महाभारत हे ग्रंथ समजून घेणयासाठी आहेत.
BLACKCAT@आपले मत नोंदवा.
BLACKCAT@आपले मत नोंदवा.
1) आपण मायबोलीकर रामायण बघत
1) आपण मायबोलीकर रामायण बघत आहेत का?
हो मी रामायण आणि महाभारत हे लहानपणापासून पहिले आहे. आधी ते जास्त समजले नव्हते पण आता चांगले समजते.
2) तुमचा काय विचार आहे रामा बदल?
श्री राम. रामायण मध्ये श्री राम सांगतात की माणूस म्हणून कस जगावे लहान वयात आलेली समाज, नम्रता, सेवाभाव, असा अनेकगोष्टी तसेच प्रत्येक नाते कशे असावे पती, भाऊ, मुलगा हा नातात येत असणारे संस्कार, मर्यादा, कर्तव्य सगळेच कशे असावे हे हा चरित्र मध्ये शिकणा सारखे आहे. आणि अजून एक रावणाला मरणाचे असेन तर श्री राम असाव लागते.