Submitted by salgaonkar.anup on 22 January, 2020 - 05:46
पाणीपुरी
आपलं नातं म्हणजे मित्रा
आहे चवदार पाणीपुरी
तिखट, गोड, आंबट, तुरट
जिभेला चव येते न्यारी
जास्त पाणी भरता जशी
कोलमडून पडते पुरी
मैत्रीचंही तसंच काहीसं
ती जपण्याचीच कसरत खरी
उतावीळपणे घाई करता
तिखटाचा हा जातो ठसका
भांडण, तंटा, रुसवे, फुगवे
मैत्रीत थोडा मारू मस्का
सगळे जिन्नस प्रमाणात असता
जिभेवर चव रेंगाळते भारी
आपलेपणाने वाद घालायलाही
संवादाची गरज खरी
"अरे, तिखा कम करो !"
भैयालाही देऊ दम
तुझ्या माझ्या मैत्रीत राहूदे
थोडी ख़ुशी, थोडा गम
मैत्रीत नसतं तुझं माझं
वाटून खाऊ मसाला पुरी
एकमेकांना समजून घेतले
तरच टिकेल मैत्री निरंतरी
© अनुप साळगांवकर - दादर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाहाहा मस्त!!! सध्या एका
हाहाहा मस्त!!! सध्या एका मैत्रीणीशी बेबनाव झालेला असल्याने, ही कविता अगदी पटली![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)