देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)
नमस्कार! सर्वसाधारणपणे अापण नेहमी अमुक शब्दाचा ‘अपभ्रंश’ तमुक अाहे असे म्हणतो. जसे की अॉफिस चा अपभ्रंश होअुन हापिस हा शब्द. हॉस्पिटल चे अीस्पितळ, िअ. वरील अुदाहरणे िअंग्रजी शब्दांची अाहेत. मात्र मराठी शब्दांतही असे बदल घडुन येतात. जसेः जाहला – झाला. पण हे सर्व अपभ्रंश अुच्चाराबाबत अाहेत. अपभ्रंशाची सोपी व्याख्या म्हणजे ‘भ्रष्ट नक्कल’. भ्रष्ट म्हणजे जी मूळ प्रतिशी समरुप नाही अशी.
मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरणार्या ऑटो करेक्ट म्हणजे काय हे नव्याने सांगायला नको. त्यात adn असे टंकित केले की आपोआप and असे होते. अशीच सुविधा ओपन ऑफिसमध्ये इंग्रजीसाठी देखील उपलब्ध आहे. मराठीत स्वयंसुधारणा (एटो करेक्ट) ही सुविधा ओपन ऑफिससाठी मोफत व मुक्त स्रोत पद्धतीने वितरीत करायचा माझा प्रयत्न आहे. हे सॉफ्टवेअर आता ८०% पूर्ण झाले असून मोफत उपलब्ध आहे.
http://extensions.services.openoffice.org/en/project/AutocorrectMarathi
वर दिलेल्या पत्त्यावरून acor_mr-IN.dat ही फाइल उतरवून घ्या. व ती खाली दिलेल्या फोल्डरमध्ये साठवून ठेवा. आणि रायटर पुन्हा चालू करा.
मराठीत काही टंकायचे म्हणजे शुद्धलेखन ही एक कायमची डोकेदुखी बनून राहते. फायरफॉक्स हा न्याहाळक वापरत असाल तर मात्र यातून एक मार्ग आहे. फायरफॉक्समध्ये शुद्धलेखन कसे तपासायचे ते पाहूया.
फायरफॉक्स वापरत असाल तर खालील पानावर जाऊन मराठी डिक्शनरीचे एड-ओन जोडून घ्या.
https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/12797/