लेखनसुविधा

मायबोली गणेशोत्सव २०१३ : पूर्णब्रह्म - पाककला स्पर्धा - प्रवेशिका स्विकारणे बंद करत आहोत

Submitted by संयोजक on 28 August, 2013 - 09:46

purnbrahm 2.jpgमुख्य पदार्थ :-
चीज/पनीर + फळ
चीज/ पनीर +मका
चीज /पनीर+ फळ+ मका

या स्पर्धेचे नियमः
१) प्रमुख जिन्नसांमध्ये यापैकी एक समूह असणे गरजेचे आहे.
उरलेले उपपदार्थ आपल्या आवडीचे घेता येतील.
चीज किंवा पनीर मुख्य पदार्थ म्हणून घेतल्यास घ्यायचे असल्यास अनुक्रमे पनीर किंवा चीज उपपदार्थ म्हणून घेता येईल.
२) वरील समुहातील एखादी गोष्ट केवळ सजावटीकरिता वापरल्यास ग्राह्य धरली जाणार नाही.
३) वरील जिन्नस वापरून एकच गोड किंवा तिखट पदार्थ बनवू शकता.

पोहताना ...

Submitted by पुरंदरे शशांक on 20 August, 2013 - 23:46

पोहताना ...

अस्थिरतेच्या लाटांवरती
वरती खाली झुलताना
एक लागले लाकुड हाती
जरा-जरासे बुडताना

जाते पाणी नाकातोंडा
जीव पुरा घुसमटताना
कोण देतसे हात जरासा
मधेच काढुन घेताना

जाणिव होता आधाराची
मनात आशा फुलताना
भासचि येथे आधाराचा
संशयात मन बुडताना

दूरदूर ते दिसते कोणी
मजेत येथे तरताना
कसे जमुन हे येते त्याला
किंचितही ना डुलताना

"असा कसा रे पूर्ण निराळा
दिसतो ना तडफडताना
लाट एकही भिववित नाही
जाणु शके का तुझ्या खुणा ?"

"वेड्या घुसळण होते अवघी
जिवानिशी धडपडताना
पडुन रहा की स्वस्थ जरासा
सहजपणाने तरताना"

"व्यर्थ येथली धडपड सारी
नकोत त्या हाकाहि कुणा

शब्दखुणा: 

एकदा वेदना प्यायला पाहिजे

Submitted by वैवकु on 19 August, 2013 - 11:40

जीवनाला सजा द्यायला पाहिजे
ते जरा नीट वागायला पाहिजे

मागता , जे हवे ते मिळाले कधी
जे नको तेच मागायला पाहिजे

जाणिवा सोडती माग काढायचे
या मनाला तिथे न्यायला पाहिजे

लागते ती म्हणे अमृतासारखी
एकदा वेदना प्यायला पाहिजे

घ्यायची ना...पुन्हा भेटण्याची ..मजा ?
...मग मला आजही जायला पाहिजे !

गुणाऽची मनी ..

Submitted by पुरंदरे शशांक on 9 August, 2013 - 01:02

गुणाऽची मनी ..

मने माकडे, किती गं लोळते ?
नऊ वाजून गेलेत तरीही झोपते ??

तुला ना शाळा, अभ्यास काही
दिवसा - रात्री लोळतात बाई !!

सापडत नाहीए हेअरबँड माझा !!!
तुला काय त्याचे, वाटत असेल मजा ...

कित्ती तो इथे झालाय पसारा ...
अगं, तुझी आधी शेपूट आवर जरा ..

उठ आधी माझ्या दप्तरावरून
जायचंय शाळेत बाईऽ, सारं आवरुन

जातेय मी शाळेत, आल्यावर भेटू
तोपर्यंत आपली न्हेमीची टाटू

कित्ती गं माझी गुणाऽची मनी
बाय बाय कर्ते शेपूट ऊंचाउनी ... Happy

शब्दखुणा: 

चिवचिव चिवचिव चिमणी छान

Submitted by पुरंदरे शशांक on 8 August, 2013 - 01:34

चिवचिव चिवचिव चिमणी छान

चिवचिव चिवचिव चिमणी छान ... चिमणी छान
वळून बघते तिरकी मान ..... तिरकी मान

चिव चिव चिमणी सांगे काय ..... सांगे काय
मऊ मऊ भातू मला हवाय .... मला हवाय

चिव चिव चिमणी टिप्ते दाणे ... टिप्ते दाणे
थुई थुई नाचत गाते गाणे ... गाते गाणे

चिव चिव चिमणी आहे गुणी .... आहे गुणी
बाळ खेळे रिंगणपाणी .... रिंगणपाणी

चिव चिव चिमणी जाते ऊडून ... जाते उडून
म्मं म्मं संपली मजेत फिरुन ... मजेत फिरुन

मायबोलीवर कॉमेंटची लिंक कशी द्यावी?

Submitted by सुसुकु on 7 August, 2013 - 03:31

यासाठी गा. पै. यांचे शतशः आभार. त्यांचे बघून (आणि त्यांनी हे कसे करावे ह्याबद्दल लिहिलेल्या एका प्रतीसादावरून मला ह्याची स्फूर्ती लाभली. )

सानी यांनी मला प्रश्न विचारला की प्रतीसादामधे आधीच्या प्रतीसादाची लिंक (अनुबंध) कशी देतात? त्यावर हे कसे करावे असे सांगणारा लेख लिहील्यास सर्वानाच याचा लाभ होयिल असे वाटले म्हणून ह लेखन-प्रपंच. सानी यांचे लेखनासाठी प्रवॄत्त करण्यासाठी आभार.

उदास श्रावण ??

Submitted by पुरंदरे शशांक on 6 August, 2013 - 23:29

उदास श्रावण ??

खळखळणारा खुशाल श्रावण
रानी फिरतो अन् वस्तीवर
नाचून थकतो, बसतो आणिक
आठी होउन कधी भाळावर

धाव धावतो वस्तीमधुनी
सांडपाणीही तसेच निश्चल
उदासवाणा कसा थिरकतो
अरुंद गल्ली शोधत दुर्बल

रंग उधळतो कसे कधीही
सप्तरंगही ये जमिनीवर
भाकरीतही कधी झळकतो
चंद्र होऊनी असाच सुंदर

झोपडीतल्या छतामधुनिया
हसतो निळसर भावूक सुंदर
भकास विद्रूप कळकटलेला
डबक्यामधली ओंगळ थरथर

असेच येती जाती श्रावण
जगणे करती अतिच अवघड
दाट काजळी क्षितीजावरती
पापणीत ना आता गहिवर...

शब्दखुणा: 

कृष्णसखा .... सावळसा

Submitted by पुरंदरे शशांक on 6 August, 2013 - 06:42

कृष्णसखा .... सावळसा

नितळ सुखद ...... भिरभिरता
पान पान ........ रसरसता

पाचूसम ....... चमचमता
पारिजात ...... टपटपता

गवतातून .... सळसळता
वार्‍यातून ..... भुरभुरता

थेंबातून ..... दुडदुडता
श्रावण हा ..... रिमझिमता

गीत नवे ..... किलबिलता
आसमंत ..... रुणुझुणुता

जाईजुई ..... मोहरता
धुंदगंध ...... उधळता

देई दान ..... सात्विकता
दशदिशात .... मंगलता

लावी पिसे ...... कृष्णकथा
राधा मनी ..... व्याकुळता

भान असे ...... हरपता
अंतरात ....... झिरपता

दूर करी ..... खिन्नता
दे पुन्हा ..... प्रसन्नता

लावी का ...... हुरहुरता
साजण हा ....... अद्भुतसा

बेरकी कावळा !!

Submitted by पुरंदरे शशांक on 31 July, 2013 - 10:14

बेरकी कावळा !!

एक कावळा मोठा बेरकी, घरात येऊन बसतो काय !!
हे काय नि ते काय प्रश्न मुळी संपतच नाय...

मासे सगळे टँकमधले झोपलेत का आज असे ??
शिक्षा केली का कुणी एकाजागी बसलेत कसे ??

मस्त वास सुटलाय खास, फोड्णीची पोळी केलीए का ??
काहीच आवाज नाहीत आज बाहेर जेऊन आलात ना ??

पाव्हणे कुठे गेले इथले, येणारेत ना बाहेर फिरुन ??
कुठला खाऊ आण्तील बरं, कंटाळलोय मी बिस्कीट खाऊन ...

सगळे हस्तात जोरात मग, आवरा आवरा कावळेराव
लवकर द्या कॅडबी यांना, तरच थांबेल काव काव .....

(बागेश्रीच्या गोजिरवाण्या चिऊला खुन्नस आहे हां आमची Happy Wink )

शब्दखुणा: 

|| विरळा वारकरी ||

Submitted by पुरंदरे शशांक on 26 July, 2013 - 05:32

|| विरळा वारकरी ||

तुका ज्ञानियाचा |
शब्द अमृताचा |
तोचि एक साचा |
मानूनिया ||

अभ्यासितो नित्य |
कळावया सत्य |
येर सारे मिथ्य |
सांडूनिया ||

राहतो जागृत |
आत दिनरात |
बळ ते राखीत |
भक्तिचेच ||

ध्यातसे निर्गुण |
पूजीतो सगुण |
मानूनी वचन |
संतांचेच ||

न जाता तीर्थासी |
न सोडी गृहासी |
तद्रूप विठूसी |
होत भला ||

जीवभाव सारी ।
हीच मानी वारी ।
ऐसा वारकरी ।
विरळाच ।।

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेखनसुविधा