यासाठी गा. पै. यांचे शतशः आभार. त्यांचे बघून (आणि त्यांनी हे कसे करावे ह्याबद्दल लिहिलेल्या एका प्रतीसादावरून मला ह्याची स्फूर्ती लाभली. )
सानी यांनी मला प्रश्न विचारला की प्रतीसादामधे आधीच्या प्रतीसादाची लिंक (अनुबंध) कशी देतात? त्यावर हे कसे करावे असे सांगणारा लेख लिहील्यास सर्वानाच याचा लाभ होयिल असे वाटले म्हणून ह लेखन-प्रपंच. सानी यांचे लेखनासाठी प्रवॄत्त करण्यासाठी आभार.
ज्यांना HTML वषयी माहिती आहे त्यांच्यासाठी - (firefox browser suggested but any other broswer is ok) फायर-फॉ़क्स वापरून (comment-id) कॉमेंट-आयडी शोधा आणि (page-url) पेज-युआरल वापरून (anchor) अँकर तयार करा.
इतरांसाठी (उ. दा. - http://www.maayboli.com/node/44492 बघा)
१) तुम्ही (firefox browser) फायर-फॉ़क्स जालदर्शक वापरा.
२) जो प्रतीसाद निर्देशीत करायचा आहे त्यावर उजवी टिचकी मारा. (उ. दा. - गा. पै यांचा प्रतीसाद बघा आणि त्यावर उजवी टिचकी मारा)
३) मग "show inspect element" निवडा.
हे केल्यावर फायर-फॉ़क्सची (window) चौकट विभाजित होईल. खालील चौकटीत HTML दिसेल.
४) आता त्यामधे (comment-id) कॉमेंट-आयडी शोधा. हेच जरा त्रासदायक आहे. (उ.दा. - वरील उदाहरणामधे comment-2822819 शोधा).
५) आता (page-url) पेज-युआरल निवडा आणि त्यासमोर #comment-id टंका. (उ. दा. - http://www.maayboli.com/node/44492 हे आहे page-url.
comment-2822819 हे आहे (comment-id)
म्हणून http://www.maayboli.com/node/44492#comment-2822819 ही झाली त्या प्रतिसादाची लिन्क.
प्रतीसाद देताना ज्या शब्दावर तुम्हाल लिन्क द्यायची आहे त्याशब्दावर
वापरून लिन्क द्या.
प्रश्न.
१) मल्टीपल पाने असलेल्या धाग्यांत काय करावे?
उत्तर ( मंजूडी यांच्याकडून) - http://www.maayboli.com/node/44473?page=2#comment-2822236 अशी लिंक द्यावी.
२) फायरफॉक्स नसताना काय करता येईल?
उत्तर (भास्कराचार्य यांच्याकडून) - कुठल्याही ब्राउझरमध्ये पेज सोर्स मध्ये कमेंटच्या वरती कमेंट आयडी दिसेल. फायरफॉक्समध्ये हे जरा जास्त सोपे जाते असे दिसते.
३) मायबोली काही लिंका आपणहून बदलते. त्याचे काय करावे?
मग हरी हरी म्हणण्याशिवाय (किंवा शिव्या देण्याशिवाय) दुसरा पर्याय नाही. (तांत्रिक मुद्दा - comment-id बदलणार नाही असे वाटते कारण comment-id हा database-id आहे असे वाटते. पण दुवा/लिंक मात्र बदलेलच.)
छान माहिती. मल्टीपल पाने
छान माहिती.
मल्टीपल पाने असलेल्या धाग्यांत काय करावे?
मायबोली काही लिंका आपणहून बदलते. त्याचे काय करावे?
ही माहीती देखिल लिहिलीत तर लेख संपूर्ण होईल.
(फायरफॉक्स नसताना काय करता येईल, हा एक उपप्रश्नही आहेच.)
अॅक्चुली लेआऊटमधेच प्रत्येक प्रतिसादाची लिंक मिळेल अशी सोय करता येते. अनेक इतर फोरम्स वर अशी सोय असते, त्याशिवाय प्रतिसाद 'कोट' देखिल करता येतात.
माबो च्या वेमा यांनी मनावर घेतले तर कदाचित ही सोय उपलब्ध करून देता येईल. (जुन्या मायबोलीत ही सोय होती)
आभार...हे तुमच्यासाठी हि एक
आभार...हे तुमच्यासाठी
हि एक कमेंट
फायरफॉक्स नसताना काय करता
फायरफॉक्स नसताना काय करता येईल, हा एक उपप्रश्नही आहेच. >>>
कुठल्याही ब्राउझरमध्ये पेज सोर्स मध्ये कमेंटच्या वरती कमेंट आयडी दिसेल. फायरफॉक्समध्ये हे जरा जास्त सोपे जाते असे दिसते.
मल्टीपल पाने असलेल्या
मल्टीपल पाने असलेल्या धाग्यांत काय करावे?
>>>
http://www.maayboli.com/node/44473?page=2#comment-2822236
अशी लिंक द्यावी.
मी क्रोम वापरते.क्रोममध्ये
मी क्रोम वापरते.क्रोममध्ये इंस्पेक्ट एलिमेंट करता येते. त्यानंतर बरेच कमेंट आयडी नुसतेच दिसतायत. आपल्याला हव्या त्या कमेंटचा आयडी शोधणे फारच वेळखाऊ प्रकरण वाटले.
उजवीकडे वर असलेल्या पानाच्या चिन्हावर क्लिक - टूल्स - व्ह्यू सोर्स असे केले तर प्रतिसादही येत आहेत त्यावरुन नंबर शोधणे त्यामानाने ठीक वाटतेय.
* जमत नाहीये. नंतर वेळ असेल तेव्हा करुन बघेन.
त्यावरुन नंबर शोधणे >> अगो,
त्यावरुन नंबर शोधणे >> अगो, तिकडे आयडीचं नाव कॉपी-पेस्ट करून 'फाईंड' करू शकतेस. शोधमोहिमेची रुंदी कमी होईल
कमेंट सिलेक्ट करून इंस्पेक्ट
कमेंट सिलेक्ट करून इंस्पेक्ट एलिमेंट केले तर कमेंट आयडी ओळखणे सोपे जाते.
.
.
सुसुकु, धन्यवाद! खुपच
सुसुकु, धन्यवाद!
खुपच उपयुक्त माहिती आहे ही.. विशेषतः एकाच व्यक्तीच्या अनेक प्रतिक्रिया असतांना संबंधित प्रतिक्रियेकडे निर्देश करण्यासाठी, तसेच हवी ती प्रतिक्रिया संग्राह्य ठेवण्यासाठी याचा खुपच उपयोग व्हावा.
मस्त आणि उपयुक्त माहिती.
मस्त आणि उपयुक्त माहिती. धन्यवाद, सुसुकु.
इब्लिस <<माबो च्या वेमा यांनी
इब्लिस <<माबो च्या वेमा यांनी मनावर घेतले तर कदाचित ही सोय उपलब्ध करून देता येईल. (जुन्या मायबोलीत ही सोय होती)>>
हो. अशी लिंक (दुवा) देणे तसे वेळखाउ आहे म्हणून मीसुद्धा टाळाटाळ करतो. माबो च्या वेमा नी मनावर घेतले तर हे खूपच सोपे होईल.
अगो - एकदा करून बघा. जरा वेळ
अगो - एकदा करून बघा. जरा वेळ लागेल पण मग आयुष्यभराचा प्रश्न सुटेल!!
नाही जमते
नाही जमते
हम्म ... बरचसं डोक्यावरुन
हम्म ... बरचसं डोक्यावरुन गेलं. तसही HTML वगैरे भानगडी कळतच नाही. असो. उदाहरण म्हणुन टाइम्स ऑफ इंडीया (किंवा इतर कोणतेही तत्सम वृत्तपत्रात) मध्ये जसं दिलेल्या प्रतिसादावर प्रतिक्रिया देता येते, तसं करणे सोपं आहे का? तसेच फेसबुकला जसं like च बटन आहे, ते सगळ्याच लेखांसाठी करता येईल का? कारण बरीच मंड्ळी वाचतात, पण प्रतिसाद देत नाही. त्यापेक्षा लाईकच बटन दाबणे कोणालाही सोपं जाईल.
छान माहिती सुसुकु ....
छान माहिती सुसुकु ....
विजय हो. हे (सहज) करता येईल.
विजय हो. हे (सहज) करता येईल.
सुसुकु :- करुनच टाका मग...
सुसुकु :- करुनच टाका मग...
वरील सर्व प्रकार केला तरी
वरील सर्व प्रकार केला तरी नेमकी संबंधीत कॉमेंट आय डी कशी ओळखायची? त्यापेक्षा वेमा ने जर मनावर घेतले तर पटापट संदर्भ द्यायला सोपे जाईल. काही लोकांना हा सूर्य हा जयद्रथ अशी सोय पण होईल.:)
आपल्याकडे ब्रायटनचे पैलवान
आपल्याकडे ब्रायटनचे पैलवान नेहेमी जयद्रथ काखोटीला मारून फिरत असतात त्यांना सूर्य दिसला रे दिसला, की ताबडतोब त्यांचा जयद्रथ दाखवतात ते
इब्लिस गा.पै. खरेच कसे
इब्लिस
गा.पै. खरेच कसे एवढ्या लिंका टाकतात हा प्रश्न मलाही पडायचा खरा.. त्यांना विचारायचा विचार पण होता सवडीने ..
आपण हा लेखनप्रपंच केला ते उत्तमच झाले.. आयतीच माहिती मिळाली..
हे जरा प्रयत्न करावा लागेल.. मला अजून झेपल नाहीये , पण झेपेल ..
सर्वांचे आभार __/\__
लोकहो, हा सूर्य हा जयद्रथ
लोकहो,
हा सूर्य हा जयद्रथ स्क्रिप्ट फायरफॉक्स वर कसे चालवायचे त्यासंबंधी सूचना इथे आहे : http://www.maayboli.com/node/7676#comment-3570363
आ.न.,
-गा.पै.
फक्त कॅापी -पेस्ट वापरून
फक्त कॅापी -पेस्ट वापरून HTMLचा उपयोग न करता वरच्या प्रकाशरावांची नोंद उधृत केली आहे.शिवाय त्या धाग्यावर प्रत्येकाने जाऊन येण्याचे श्रम वाचतात. धाग्याला बुकमार्क करून त्यातून पेज नंबरसकटच लिंक कॅापी होते.
HTML न येणाय्रांनीच हा प्रश्न विचारलेला असणार कारण ज्यांना HTML चे शेत कसे नांगरायचे माहित आहे ते कोणतेही पीक काढतात.
पुन्हा काही उपप्रश्न -अमुक ब्राउजर असेल /नसेल तर ,मोबाइल ,ट्याब ,स्लो इंटरनेट वगैरे सर्वच निकालात निघतात.
वेबमास्टर ,संपामंडळाचेही दार ठोठवायवला नको.
उदाहरणार्थ :-
""प्रकाश घाटपांडे | 1 May, 2015 - 13:07
वरील सर्व प्रकार केला तरी नेमकी संबंधीत कॉमेंट आय डी कशी ओळखायची? त्यापेक्षा वेमा ने जर मनावर घेतले तर पटापट संदर्भ द्यायला सोपे जाईल. काही लोकांना हा सूर्य हा जयद्रथ अशी सोय पण होईल.""
ही कॅामेंट""http://www.maayboli.com/node/44508""।
"मायबोलीवर कॉमेंटची लिंक कशी द्यावी? "या धाग्यातून आहे.
स्वत:च्याच कॅामेंटची लिंक काढणे सोपे आहे. आता माझ्या नोंदीखाली संपादन बटण दाबून त्याला बुकमार्क करून लिंक कॅापी केली ती :""http://www.maayboli.com/comment/edit/3570489"" आली.परंतू लिंक कॅापी केली "History" तून---
""http://www.maayboli.com/node/44508#comment-3570489""
.
.
(No subject)
(No subject)
कॉमेंटची लिंक देण्यासाठी
कॉमेंटची लिंक देण्यासाठी काहीतरी user friendly सोय करा बुवा.
फायर फॉक्समधे काहीतरी प्लगईन
फायर फॉक्समधे काहीतरी प्लगईन आहे, नाव आता आठवत नाही. मात्र हे प्लगईन फायर फॉक्सला जोडल्यास ज्याने ती कॉमेंट केली आहे त्या सदस्याचे नाव त्याच्या बाजूला असलेले तारिख व वेळ सर्व हायलाईट होते, मग त्या कॉंमेंटवर माऊसची राईट क्लिक करुन " Copy Link Location " करुन जिथे हवी तिथे ती पेस्ट करता येते.