Submitted by पुरंदरे शशांक on 20 August, 2013 - 23:46
पोहताना ...
अस्थिरतेच्या लाटांवरती
वरती खाली झुलताना
एक लागले लाकुड हाती
जरा-जरासे बुडताना
जाते पाणी नाकातोंडा
जीव पुरा घुसमटताना
कोण देतसे हात जरासा
मधेच काढुन घेताना
जाणिव होता आधाराची
मनात आशा फुलताना
भासचि येथे आधाराचा
संशयात मन बुडताना
दूरदूर ते दिसते कोणी
मजेत येथे तरताना
कसे जमुन हे येते त्याला
किंचितही ना डुलताना
"असा कसा रे पूर्ण निराळा
दिसतो ना तडफडताना
लाट एकही भिववित नाही
जाणु शके का तुझ्या खुणा ?"
"वेड्या घुसळण होते अवघी
जिवानिशी धडपडताना
पडुन रहा की स्वस्थ जरासा
सहजपणाने तरताना"
"व्यर्थ येथली धडपड सारी
नकोत त्या हाकाहि कुणा
धीर धरुनि मग जाणून घे रे
जळ कुठले, आभास मना....."
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चांगली आहे..!
चांगली आहे..!
वा ! आवडली
वा ! आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पोहण्याचे रूपक वापरून
पोहण्याचे रूपक वापरून आत्मशोधाची तळमळ सुंदर व्यक्त केली आहे.कविता खूप आवडली.
फार सुंदर कविता ,भारतीताईशी
फार सुंदर कविता ,भारतीताईशी सहमत .
छान जमलेय. तिसरे आणि शेवटचे
छान जमलेय.
तिसरे आणि शेवटचे कडवे विशेष.