मराठी लिहिण्यासाठी विविध पद्धती आहेत. पूर्वी बरहा म्हणून एडिटर होता. बराच लोकप्रिय झाला होता. सवयीमुळे अजूनही अनेक लोक तो वापरत असतील.
एका गप्पांच्या धाग्यात याबाबत एका प्रश्नाला उत्तर देता देता हे सगळे लिहिले गेले. याचा इतरानाही उपयोग होईल असे वाटल्याने हा धागा. या छोट्याश्या लेखात गुगलच्या सर्विसेस द्वारे मराठी कसे लिहिता येईल हे मांडत आहे. गेली अनेक वर्षे मी स्वत: या सर्विसेसचा वापर करत असल्याने व मला त्या फारच उपयुक्त वाटल्याने त्याबाबत इथे लिहित आहे. मायक्रोसॉफ्ट, ऍपल व इतर कंपन्यांच्या सुद्धा अशा सेवा असतील. पण मला त्याबाबत फार कल्पना नाही.
हे येथे आधीच लिहिल्या गेले आहे के ते माहीत नाही, पण अॅण्ड्रॉईड वर देवनागरी लिहा-वाचायचे कसे हे मी आज शिकलो आणि ते येथे देतो आहे.
(१) मार्केट वरून मिनी-ओपेरा डाऊनलोड करा
(२) ते ब्राऊजर उघडुन "opera:config" या संकेतस्थळावर जा
(३) “Use bitmap fonts for complex scripts” या वाक्यासमोरील "No" ला "Yes" मध्ये बदला. बदल "save" करा.
आणि खुशाल मायबोली सारख्या संकेतस्थळांचा आनंद लुटा.
देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)
नमस्कार! सर्वसाधारणपणे अापण नेहमी अमुक शब्दाचा ‘अपभ्रंश’ तमुक अाहे असे म्हणतो. जसे की अॉफिस चा अपभ्रंश होअुन हापिस हा शब्द. हॉस्पिटल चे अीस्पितळ, िअ. वरील अुदाहरणे िअंग्रजी शब्दांची अाहेत. मात्र मराठी शब्दांतही असे बदल घडुन येतात. जसेः जाहला – झाला. पण हे सर्व अपभ्रंश अुच्चाराबाबत अाहेत. अपभ्रंशाची सोपी व्याख्या म्हणजे ‘भ्रष्ट नक्कल’. भ्रष्ट म्हणजे जी मूळ प्रतिशी समरुप नाही अशी.
(विशेष सूचनाः खालील लेखात जिथे जिथे युनिकोड असा उल्लेख आहे तिथे संदर्भाप्रमाणे युनिकोड आधारित सध्याच्या सर्व उपप्रणाल्या अंतर्भूत आहेत. फक्त युनिकोड कंझॉर्टियम नव्हे. ह्या उपप्रणाल्या म्हणजे Input Method Editor (IME)/Keyboard, Unicode encoding, serialization, storage, retrieval systems, operating systems, rendering engine, support for Complex scripting, fonts, uniscribe or equivalent for character sequencing, display systems and end user applications)