तगमग
देणे पावसाचे कसे
वेडे ओलावले मन
पान पान आठवांचे
गेले पार बिथरून
मेघ गर्जती बाहेर,
आत विजेचा थरार
वारा फोफावला स्वैर,
उर धपापला पार
पडे पाऊस जोरात,
आत उसळे आकांत
झाकोळले सारे काही,
मन काळोखी नहात
पडे पाऊस पाऊस
जरा शांत स्थिरावला
थेंब थेंब रुते आत,
डोह पुरा डहुळला........
बाळासोबत
छान छोटी चिऊताई
कित्ती गोड गाणे गाई
कावळेभाऊ येतात तडक
खाऊवर मारती झडप
राणीसाहेब मनीमाऊ
दूध आणा लवकर पाहू
पोपटराव हिरवे पाटील
मिठू मिठू गजर करतील
भू भू येते इवले सान
बाळासोबत खेळे छान
चांदो येतो गोड हसत
बाळ झोपे खुसखुसत...
दोनदा कशी काय प्रकाशित झालीये ??? कृपया याच शीर्षकाखालील दुसरी कविता पहा.
म्मं म्मं, म्मं म्मं
वरण-भाताची शिट्टी झाली
बाळाची कळी खुलली खुलली
फोडणी खमंग तडतडली
आणा आणा सोनूची ताटली
आमटी-भात तुपाची धार
मधून आंबट टमाटु सार
चिऊचे घास काऊचे घास
म्मं म्मं होईल खासम खास
पापा थोडा घुटुक घुटुक
चूळ भरा खुळुक खुळुक
एक येता ढेकर मस्त
ढाराढुर्र गुडुप सुस्त....
अजून एक चिऊतै...
चिऊतै चिऊतै
....नाचतात थुई थुई
चिव चिव किती बाई
....अंगणभर बाग्डत जाई
दाणा खाई पाणी पिई
....गोड गोड गाणे गाई
घरटे छान छोटे सही
....पिल्लू इव्लू ओरडत राही
अंधार जरा होताच
.....पंखाखाली गाईगाई ....
.....(आई-कुशीत गाईगाई)
सदिच्छा ..
असे उजाडावे | मनाच्या क्षितीजी |
नुरावी काळजी | नावालाही ||
लख्ख व्हावे सारे | हृदय गाभारी |
प्रकाशाची झारी | बरसावी ||
मोकळे मोकळे | होताच आकाश |
कुठला आवेश | नसो तेथे ||
स्वैर वारा वाहे | किंवा झरा मुक्त |
व्हावे बंधमुक्त | चित्त तसे ||
असावा तयात | प्रेमाचा ओलावा |
सुखाचा गारवा | सदोदित ||
हीच एक आस | मनी तोचि ध्यास |
न करी उदास | जगदीशा ||
काव काव..
काव काव करतं कोण ?
कावळेदादा आण्खी कोण
तेलबिल लावलंय का
चकाचक कस्ले वॉव
तिरकी करतात मान अशी
झेप घेतात झटदिशी
डोळे फिरती गरागरा
कावकावचा एकच नारा
भातपोळी अग्दी नको
शेव जरा टाका म्हण्तो
(इथे आई-बाबा इ. मंडळींनी आपापल्या सोईनुसार "हवे नको" ते टाकावे -जसे
भात भरवायचा असल्यास
हे मनोगत बरेच दिवसांपासून लिहायचे होते. मायबोलीमधे काय सुधारणा करता येतील या बाफवर लिहायचे निश्चित केले होते. पण गझलविषयक असल्याने विचारांती स्वतंत्र लेख म्हणून पेश करत आहे.
मायबोलीसारख्या संकेतस्थळावर बहुतेक सर्व लोक ब्राऊजरमध्येच ऑनलाईन लेखन करत असावेत. पण जर आपल्याला ऑफलाईन लेखन करायचे असेल तर त्यासाठी बरीच डोकेफोड करावी लागते. ऑफलाईन लेखनाचे फायदेही बरेच आहेत. आपण आपले लेखन नीट सेव्ह करू शकतो, स्पेल चेक करू शकतो. अॅटो करेक्ट, अॅटो टेक्स्ट वापरू शकतो. पानेच्या पाने लिखाण करायचे असेल तर ऑफलाईनला पर्याय नाही. खाली दिलेली सॉफ्टवेअर वापरून मराठीत टंकलेखन करणे अगदी सुलभ आहे. हे सॉफ्टवेअर उतरवून घ्यायला काही मिनिटांपासून ते काही तासांपर्यंत वेळ लागू शकतो. (इंटरनेटच्या स्पीडवर अवलंबून) पण एकदा का डाऊनलोड झाले, की इन्स्टॉल मात्र काही मिनिटांत होईल.
ओढणी.. साजणी..
माथा गळ्यास झाकते
एक ओढणी सजून
काय कवतिक तिचे
घे गं जरा समजून
उन्हा तान्हात साजणी
येते सावली बनून
कोणी नवखा दिसता
घेते अंगही झाकून
सार्या अंगा-खांद्यावर
कशी दिसते शोभून
एकटीने जाता येता
धीर देई उमजून
भंवताल दिसे नवा
जेव्हा ओढणी आडून
निरख तू वास्तवाला
नको जाऊस भुलून
किती जणी सख्या तुझ्या
देती ओढणी फेकून
क्षणिकाच्या सुखाला त्या
गेल्या भुलून फसून
ओढ लागते जीवाला
निसर्गाचे सारे देणे
घेई पारखून नीट
दान पदरात घेणे