नवीन
षड्ज
षड्ज म्हणजे शांत
षड्ज म्हणजे समाधान
षड्ज म्हणजे समाधी
षड्ज म्हणजेच ध्यान
षड्ज म्हणजे आत्मरूप
षड्ज म्हणजे मूलतत्व
षड्ज म्हणजे ओंकार
षड्ज म्हणजेच सत्व
षड्ज म्हणजे निर्विकार
षड्ज म्हणजे निसर्ग
षड्ज हाच दीपस्तंभ
षड्ज विना कुठला राग
जगणे जणू षड्ज व्हावे
षड्जात अखंंड रहावे
ह्रदयी असावा षड्ज
मनात नांदावा षड्ज
पहारेकरी
मध्यरात्रीच्या प्रगाढ शांततेत
मनातले वादळ शमवत
विचारांचा कोलाहल निववत
खडा पहारा देत
उभा आहे जोवर हा
माझ्या अस्थिर अस्तित्वात
अचल आणि अभेद्य
तोवर कसली तमा
अडथळ्यांची, संकटांची
काळीज पोखरणार्या
विदारक चिंतांची
चक्रावून सोडणार्या
अविरत शंकांची
थोपवेल तो ह्या सर्वांस
अन् झोपेन मी शांतपणे
राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालय
भाग्य
प्रत्येकाचे भाग्य वेगळे
प्रत्येकाची वेगळी कथा
सर्व चेहर्यांवरी हसू
अंतरात दडली व्यथा
माणसाचा जीवनपट
कधी पूर्ण कोणा कळला
यशामागे किती कष्ट
कोण किती कसा शिणला
तरी मन करी तूलना
केवढे हे अज्ञान
आपल्या रस्त्याने जावे
हेच असे शहाणपण
आपल्यास जे लाभले
मनी असावा कृतज्ञभाव
हेवा, मत्सरास कधीही
द्यावा मनी न शिरकाव
पुन्हा एकदा
शेवटची चढण चढून ती कड्याच्या टोकाशी येऊन उभी राहिली. खालच्या खोल दरीत तिने डोकावून पाहिले. बस्स, आता एक उडी आणि संपेल एकदाचे सर्व काही. दारूण निराशा, दु:ख, वेदना....सगळ्याला पूर्णविराम. कायमचा.
तिने मान वर करून पाहिले. अनंत निळे आकाश सर्वदूर पसरले होते. केवढी अफाट आहे ही सृष्टी! थांगच लागत नाही. अंतराळात अशा किती सृष्टी आहेत त्याची गणतीच नाही. क्षितिजापर्यंत तिची नजर जाऊन भिडली. त्या भव्यतेपुढे तिला तिचे दु:ख फार क्षुद्र वाटू लागले. अशी होते का मी? पराभव स्वीकारणारी, पळपुटी? कधीच नाही. संघर्षाला मी कधीच घाबरले नाही. मग आज इथे का आले आहे?
अ परफेक्ट मर्डर
काही दिवसांपूर्वी "अ परफेक्ट मर्डर" हे नाटक पाहिले. अल्फ्रेड हिचकाॅकचा गाजलेला चित्रपट "Dial M for murder" चे हे सुंदर नाट्यरूपांतर. पहिल्या क्षणापासून खिळवून ठेवणारे. चित्रपट खूप वर्षांपूर्वी पाहिला असला तरी पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळाला. नाटकाचे लेखन फार उत्तम झाले आहे. अनिकेत विश्वासराव व पुष्कर श्रोत्री ह्यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. विशेषत: पुष्करने पोलिस ऑफिसरची भूमिका मस्तच केली आहे. हे नाटक ते भूमिकांची अदलाबदल करून सुद्धा सादर करतात. त्यामुळे तुम्ही नाटक बघाल तेव्हा पुष्कर वेगळ्या भूमिकेत बघायला मिळण्याची शक्यता आहे.
पाऊस
मी बनवलेली पहिली शॉर्टफिल्म !!!
माझा पहिला लघुपट! ☺
नक्की पहा.
Watch, like n subscribe.
400+ views & 40+ likes completed.
मितवा (सिनेरिव्ह्यू)
प्रेम हा एक असा विषय आहे, जो चॉकलेट सारखा आहे. कितीही वेळा खाल्लं तरी आपल पोटहि भरत नाही आणि त्या चॉकलेटचा गोडवाहि कमी होत नाही. मितवा हा हि एक असाच चित्रपट. प्रेमात भिजलेला. शिवम सारंग एक मोठ्ठा बिझनेसमन. पण अय्याश, बिघडलेला. जगातल्या सगळ्या मुली आपल्याला पाहिल्यावर आपल्यावर फिदा होतील, असा त्याच्या ओव्हर कॉन्फीडन्स. पण एक मुलगी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करते, आणि तिथे तोच तिच्या प्रेमात पडतो. प्रेम, लग्न, कमीटमेंट यावर त्याचा विश्वासचं नाही. पण प्रेम त्याला कस बदलत, त्याच जीवन कसं बदलत हेच त्यालासुद्धा कळत नाही. आणि त्यावरच हा चित्रपट आहे.