आई जेव्हा रागावते ....
आई जेव्हा रागावते ....
घरात पाऊल टाकले तरी
आईच्या नावाने ओरडा नाही ???
का बाई शांत दिस्तयं घर ???
किती ते बावरं माझं मन ....
झालंय काय या सोनूला
मार्गच नाही कळायला
खोलीत पसरलेत वाटतं म्हाराज
सुस्त कस्काय सारं कामकाज ??
काय रे असा गप्प गप्पसा
पडलास का कुठे? बोल पटापटा
डोळे हे सांगतात वेगळेच बरं
तुझं हे लक्षण नव्हे रे खरं
दिस्ताएत मला तुकडे अजून
कुठली बरणी ठेवलीस फोडून ??
कारट्या, कितीदा सांगितलंय तुला
किती रे छळशील अजून मला
कामाने जातीये मी आधीच वैतागून
अन तू ठेव अजून पसारा मांडून
बास कर आता ते झटक नि फटक