नवीन
गोरखचिंच (नवीन फोटोसह)
गोरखचिंच (Adansonia digitata)- पुण्यातील अभिनव कॉलेज चौकातील (टिळक रोड ) मेहेंदळे अँड सन्स यांच्या दारासमोरील ३२५ वर्षे वयाचा हा वृक्षराज -आता बहरला आहे. मेहेंदळे यांच्या घराच्या गच्चीतून या फुलांचे, कळ्यांचे व पानांचे झालेले हे लोभसवाणे दर्शन.
(सर्व फोटो मोबाईलच्या कॅमेर्याने काढलेले आहेत.)
सावळी चैतन्यकळा-२
थेंबाथेंबातून आला
आला पाऊस कोवळा
चहूबाजूंनी धावला
मेघ सावळा सावळा
थेंबाथेंबाची ही साद
पाखरांच्या कंठी येई
स्वर आलाप सावळे
रानभरी मुक्त होई
थेंबाथेंबांचे हे गाणे
गाता गाता थरथरे
एका सावळ्या नादाने
आसमंत लुब्ध सारे
थेंब थेंब येता रानी
रत्न मोती झळाळती
पाचू सौंदर्य सावळे
अलंकार मुक्त होती
थेंबाथेंबांची कहाणी
नित्य सफळ संपूर्ण
सावळ्याच्या अंगस्पर्शी
झाली झाली परिपूर्ण
थेंबाथेंबांनीच केला
गुंता मोकळा कळेना
हिरवे का रान सारे
सावळे का आकळेना
जादू पावसाची ....
जादू पावसाची....
जादू वळिव सरींची .... मातीत अत्तर सांडायची
जादू काळ्या ढगांची.... मनमोर फुलून यायची
जादू थेंबाथेंबांची.... दोन मने जुळायची
जादू लखलख वीजेची... घट्ट मिठीत मिटायची
जादू फास्ट राइडची.... बिलगत भुर्रS जायची
जादू खोडकर वाऱ्याची... रेशीमबटा उडवायची
जादू ओल्या ओठांची... ओठांनीच टिपायची
जादू साथीत भिजायची... पंख नसता उडायची
जादू चिंब क्षणांची.... मनात जपून ठेवायची
एक चतुर फार....
एक चतुर फार....
चतुर किंवा ड्रॅगन फ्लाय हे आपण नेहेमीच पहातो. पण फोटो मिळवणे म्हणजे फार अवघड काम किंवा लक (luck) पाहिजे. आजच संध्याकाळी हे महाशय आमच्या बागेत दिसले व निवांत फोटो ही काढून दिले की. या आधी मी तरी याच्या पंखावर असे काही ठिपके पाहिले नव्हते- जाणकारांनी कृपया काही माहिती (पंखांवरील नक्षी / ठिपके या संबंधात) असल्यास जरुर सांगणे -
अंगण
अंगण
छान सुबकसे जर्जर अंगण
मऊ मुलायम कुठे न खडवण
ओलावा अलवार राखते
धूळ न उसळे कधीही तेथून
छुमछुमले पैंजण कधी येथे
कंकण हिरवे चमकत होते
चिउ-काउच्या गोष्टी ऐकून
पिले उडाली सोडून घरटे
गर्द सावली उन्हे तळपली
ऋतुमानाची चाके फिरली
वादळवर्षा सुसाटवारे
सुरकुत थोडी दिसू लागली
दिसू लागता सांजसावल्या
अंगण अंतरी कातर कातर
तुळशीवृंदावन सामोरी
मंद मंद ज्योतीची थरथर
एकाकी त्या कातरवेळी
उरे साथीला सखी आगळी
एकमात्रचि ती रांगोळी
कणाकणांची केवळ जाळी
वास्तव.. ?
वास्तव...?
इंद्रधनुचे रंग रेखण्या येथ जाहले कुणी सज्ज
तलम झुळुक वार्याची हाती तरल प्रतिभेची समज
सागरतळ शोधित कुणी गेले गगनभरार्या मारी कुणी
सरस्वतीचा आशिष कोणा प्रासादिक इतुकी वाणी
निसर्गातले कुतुहल कोणा जनमानस शोधे कोणी
वैश्विकतेशी नाळ जोडण्या उत्सुकसे झाले कोणी
कौतुक वाटे प्रतिभेचे अन् कलागुणादी सकलांचे
वास्तव नजरेआड न होते पाय सकळचि मातीचे
..........................पाय परि ते मातीचे
आमच्या बागेतील फुले
आमच्या बागेतील फुले -
आलामांडा
बेलाची चैत्रपालवी
निळा चिमिन (Thunbergia)- भुंग्यासह
याचे नाव कुणी सांगेल का?
भोग दुर्दैवाचे ..... (तृतीयपंथी)
भोग दुर्दैवाचे ..... (तृतीयपंथी)
४-५ वर्षांपूर्वीची गोष्ट ....... पुण्यातील एका प्रख्यात endocrinologist समोर रीतसर appointment घेउन नुकताच त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसतोय तोच.....
धाडकन दरवाजा उघडून... एक महिला आत आली.....माझ्या आधी येऊन गेलेली.....ग्रामीण भागातील, कावर्या - बावर्या चेहर्याची........
"माझ्या पोराला आता खरंच काही इलाज करता यायचा नाही का हो ?"
मी अवघडून उभा राहिलो व बाहेर जायला निघालो.
डॉ. नी खुणेनेच मला बसायला सांगितले. डॉ. चांगले professional असले तरी त्या महिलेशी सह्रदयतेने १-२ मिनिट बोलले.
अजून त्याची नाही चाहूल..
अजून त्याची नाही चाहूल
रेखून बसले मेंदी हातावर
नजर सततचि ती मार्गावर
मनातले जळ डुचमळ डुचमळ
अजून त्याची नाही चाहूल
नको नको त्या कोकिलताना
काग आज तरी सांगे शकूना
सूकून गेले गाली ओघळ
अजून त्याची नाही चाहूल
दर्पणी बघता तूचि तिथे रे
मिटता नयनी तू दिसशी रे
कशी ही वंचना होते व्याकूळ
अजून त्याची नाही चाहूल
समोर जेव्हा येशील सखया
विरघळेन मी मिठीत तुझिया
स्वप्न मनी ना राहो केवळ
अजून त्याची नाही चाहूल...