नवीन
रेड व्हिस्कर्ड बुलबुल व अॅशी
स्पॉटेड मुनिया
व्हाईट रम्प्ड मुनियाचे पिल्लू
व्हाईट रम्प्ड मुनियाचे पिल्लू -
बिसलेरी बाटलीच्या झाकणावरून त्या पिल्लाचा आकार लक्षात येईल
घननीळा लडिवाळा ............
पिल्लू घरी येता.....
पिल्लू घरी येता.....
वळवाची जोरदार सर नुकतीच पडून गेलेली. इतका वेळ बंद केलेली घराची दारे- खिडक्या उघडली. दारातून बागेत पाउल ठेवले तर समोरच एक पक्ष्याचे पिल्लू उताणे पडलेले दिसले..... पाय वर .... चोच वासलेली ....
मी जवळ जाऊन नीट निरखले तेंव्हा लक्षात आले अरे हे मेलेले नाही. अजून धुगधुगी आहे तर ! पण याला कसे वाचवायचे?
त्याला उचलले व घरात आणले. त्याला उब कशी आणावी बरे? एक जाड कापड शोधले. त्यावर त्याला ठेवून दुसऱ्या कोरड्या फडक्याने ( ईस्त्रीवर गरम करून) त्याला हळू हळू शेकत राहिलो.
पाण्यावरच्या रेघा
शब्दातून सांगायाचे
आजवर कधी न जमले
वंचना साहू कुठवर
शब्द ही मजवर रुसले
ह्रदयाच्या माजी दडले
उलगडले ना उमटले
अश्रुंना सांगून झाले
कोरडेच निर्झर ठरले
लेखणी हाताशी धरता
उमटता मधेच थिजले
रेघांचा गुंता अवघा
गुंताव्यात ना गवसले
अव्यक्ता व्यक्त करावे
हे स्वप्न उराशी धरले
पाण्यावरी मारी रेघा
हे असे काहिसे घडले
मन हिंदोळा
मन हिंदोळा
मन हिंदोळा मन हिंदोळा
कधी आकाशी कधी धरणीवर
मन कवडसा मन कवडसा
कधी अंधारी कधी प्रकाशमय
मन विहरते मन विहरते
कधी गृधासम कधी भृंगासम
मन लाटांवर मन लाटांवर
कधी नभात तर कधी रेतीवर
मन नर्तन हे मन नर्तन हे
तांडव कधी, कधी नयनमनोहर
मन कंपन हे मन कंपन हे
अणुगर्भातले की विश्वबीजातले
चैत्रवैभव
चैत्र - वैभव
ही उजाड दिसती राने भूमीही चिराळलेली
चैत्राची येता साद झाडे ही पालवलेली
निष्पर्ण रानातून ही गुलमोहर फुलारलेला
सोनसळ लेऊन अंगी बहावा रसरसलेला
स्वागत या ऋतुराजाचे होतसे पक्षीगणात
कोकिळ तो उच्चरवाने साद घाली पंचमात
तिन्हीसांजा टाकी मोहून मोगरा शुभ्र कळ्यांचा
कृष्णवस्त्री शोभे कशिदा गंधितसा काय हिर्यांचा
चैत्रवेल राती दिसते आकाशी बहारलेली
चांदण्यातून ओघळलेली शीतलता दयाघनाची
हे सकलमतिप्रकाशिनी.....
हे सकलमतिप्रकाशिनी......
तारकात तूचि दिप्ती कला शशिची दाविसी
प्रकाशू दे मति मदीय ठाव देई मानसी
धरेवरि नभातही विहरसी मनस्विनी
शब्दवस्त्र लेऊनि कधि होई हंसगामिनी
सहज सुलभ सलग सरळ आशयासी येऊ दे
जळ वाहे झुळुझुळु का अर्थवाही शब्द दे
नाद मधुर करित जासी तूचि निसर्गातुनि
पदरव तव येऊ दे काव्यातुनि मधु गुंजुनि
भ्रांति ती नसो कदा "कवि" उपाधी ही जळो
अवतरिता तूचि देवि मतिमंदीर मम उजळो
आवाहना प्रतिसाद देई दुर्बळ मी याचक
वर मागे हाचि पायी व्हावे न मी कधी निंदक