नृत्यमुद्रा
आपल्याकडे दुर्मिळ असलेला गोरखचिंच हा वृक्ष, इथे अंगोलात नाक्यानाक्यावर दिसतो. इथे तो असतो बाओबाब.
याचा आकारच अनोखा असतो. नीट बघितल्यास बुंध्याच्या पसार्याच्या तूलनेत वरचा पर्णविस्तार छोटा वाटतो.
आपल्याकडे पुराणात जो कल्पवृक्ष म्हणून गौरवला आहे तो कदाचित हाच असावा. कारण खाद्य गर असलेली फळे, सालीच्या वाखापासून मिळणारे धागे, पाण्याची गरज भासल्यास खोडातून पाणी आणि इतकेच नव्हे तर विशाल खोड कोरून आत निवारा.. अशा सर्वच गरजा हा बाओबाब पुरवतो. इथे त्याला पवित्र मानतात.
माझ्या घराजवळच्या एका वृक्षाचे खोड ५ मिटर व्यासाचे आहे. त्या एकाच झाडाच्या सावलीत अख्खा बाजार भरतो.