नृत्यमुद्रा

Submitted by दिनेश. on 19 June, 2013 - 06:02

आपल्याकडे दुर्मिळ असलेला गोरखचिंच हा वृक्ष, इथे अंगोलात नाक्यानाक्यावर दिसतो. इथे तो असतो बाओबाब.
याचा आकारच अनोखा असतो. नीट बघितल्यास बुंध्याच्या पसार्‍याच्या तूलनेत वरचा पर्णविस्तार छोटा वाटतो.
आपल्याकडे पुराणात जो कल्पवृक्ष म्हणून गौरवला आहे तो कदाचित हाच असावा. कारण खाद्य गर असलेली फळे, सालीच्या वाखापासून मिळणारे धागे, पाण्याची गरज भासल्यास खोडातून पाणी आणि इतकेच नव्हे तर विशाल खोड कोरून आत निवारा.. अशा सर्वच गरजा हा बाओबाब पुरवतो. इथे त्याला पवित्र मानतात.

माझ्या घराजवळच्या एका वृक्षाचे खोड ५ मिटर व्यासाचे आहे. त्या एकाच झाडाच्या सावलीत अख्खा बाजार भरतो.

सध्या मात्र आमच्याकडे शिशिर असल्याने यांची पानगळ झालीय. जूलै मधे नवीन पालवी आणि मग
कमळासारखी पांढरीशुभ्र फुले अंगभर लेवून, हा शृंगारीत होईल.

पण या अवस्थेतही मला याच्या आ़कृतीबंधात एखाद्या नृत्याच्या मुद्रा दिसतात.
१)

२)

३)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्चा... खरच की! भरतनाट्यमच्या मुद्रा दिसताय्त त्यात.

किती गोड कल्पना.. निरखल्यावर खरंच मुद्रा वाटायला लागल्यात..>>>>>>>>>>>त्याला पाहिजे जातीचे आमच्या सारख्यांचे काम नव्हे. Proud

आभार दोस्तांनो, इथे मोकळ्या आवारात ती झाडे असल्यामूळे लांबून पुर्णपणे दिसतात. म्हणून असे आकार भासतात.
हो सुनिल, इथे वाळवंट असले तरी भरपूर झाडे आहेत.

दिनेशदा, सुंदरच प्रचि (प्रकाशचित्र अन त्याआत लपलेलं ,तुम्हाला दिसलेलं प्रत्ययचित्रही Happy )
>>कारण खाद्य गर असलेली फळे, सालीच्या वाखापासून मिळणारे धागे, पाण्याची गरज भासल्यास खोडातून पाणी आणि इतकेच नव्हे तर विशाल खोड कोरून आत निवारा >>
- यातलं खोडातून मिळणारं पाणी विशेषच, पहिल्यानेच ऐकलं मी तरी. बाओबाब चा हा विशेष गोरखचिंचेला लागू होतो का ?

बाओबाब म्हणजेच गोरखचिंच. आपल्याकडे हे झाड पोर्तुगीजांनी आणले असे म्हणतात पण गोरख ऋषींनी या झाडाखाली तपस्या केली, असेही म्हणतात. ( म्हणून हे नाव. ) मुंबईत राणीच्या बागेत, वसईच्या किल्ल्यात ही झाडे आहेत. सीप्झ मधे पण आहेत.

मस्तच दिनेशदा.
अस पहायला तशी नजर हवी..... + १

बाओबाब म्हणजेच गोरखचिंच. आपल्याकडे हे झाड पोर्तुगीजांनी आणले असे म्हणतात पण गोरख ऋषींनी या झाडाखाली तपस्या केली, असेही म्हणतात >>>

तुम्हाला दिनेश दा एनसायक्लोपीडिया हा आयडी बहाल करण्यात येत आहे ( यात पुणेरीपणा नसून मनापासून आहे. प्लीज नोट )

शीर्षक वाचून मला वाटले की तुम्ही काढलेल्या चित्राचा फोटो टाकणार आहात.
सुरेख प्र.चि.

नृत्यंमुद्रेत एक प्रकारची लय असते...
मुद्रा अस्ली, त्याला स्थीरत्वं असलं तरी ते ज्या गतीतलं आहे, ती लय नृत्यंमुद्रेत दिसते.

ह्या प्रचिंचं असंच आहे. लय आहे...
सुंदर ... क्या बात है, दिनेशदा.

तुम्हाला दिनेश दा एनसायक्लोपीडिया हा आयडी बहाल करण्यात येत आहे >>>++++++११११

अप्रतिम !
<< अशा सर्वच गरजा हा बाओबाब पुरवतो. इथे त्याला पवित्र मानतात. >> दिनेशदा, म्हणूनच 'कल्पतरु' ही संज्ञा 'नारळा'च्या झाडापेक्षां खरं तर सुरवातीस या झाडालाच [बाओबाब /गोरखचिंच] दिली असावी, असंही कुठेतरी वाचल्याचं आठवतं .

एकदम झकास!
'ब्युटी लाइज इन द आईज ऑफ द बिहोल्डर...!' हे मराठीत कसे सांगणार?
मला पण 'मालावी च्या वास्तव्यात दर्शन झाले. ते व लेक न्यासा (लेक मालावी) कायम लक्षात राहील.