हे मनदेवा !!
Submitted by पुरंदरे शशांक on 7 March, 2013 - 00:20
हे मनदेवा !!
लख्ख प्रकाशानं जाई
कधी उजळुनी मन
काळोखात बुडुनिया
जातं तेच वेडं मन
कधी सामोरं जातंया
येईल त्या क्षणांनाही
तेच पाठ फिरवूनी
कसं दाही-दिशा होई
अशा लाटा-तरंगात
पार काढी बुडवूनी
घुसमटे जीव असा
नाकातोंडा शिरे पाणी
विनवितो तुम्हालागी
मनदेवा कृपा करा
घुसळून काढताना
जरा दाखवा किनारा..
शब्दखुणा: