पेडर रोडवर नॅशनल म्यूझियम ऑफ इंडियन सिनेमाच्या दोन भव्य इमारती आहेत. एकात तळमजल्यावर दोन ऑडिटोरियम आणि वरच्या मजल्यांवर पाहण्यासारखे असे चित्रपट विषयक म्यूझियम आहे. तर दुसर्या महाल सदृष इमारतीत दादासाहेब फाळक्यांनी वापरलेली विविध उपकरणे ठेवली आहेत.
पहिल्या इमारतीत २०-२६ सप्टेबर दरम्यान युरोपियन चित्रपट महोत्सव आयोजित केला होता. शेवटच्या दिवशी मी "Beside me" हा रूमेनियन चित्रपट पाहिला. एका सबवे ट्रेनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती बंद पडते. आतले प्रवासी चुळबूळ करू लागतात व काही वेळाने एकमेकांशी बोलू लागतात. सर्व वयोगटातले विविध क्षेत्रातले प्रवासी एकत्र आलेले असतात. ह्यांच्यात एक पाद्रीसुद्धा असतो. हळूहळू प्रत्येकाचे अधुरेपण, खोटेपण सर्वांच्या नजरेत येऊ लागते. ह्याला तो पाद्रीसुद्धा अपवाद नसतो. शेवटी तो पाद्री सर्वांना उद्देशून एक भाषण करतो जे खूप सुंदर आहे. त्यानंतर सगळे एकमेकांना समजून घेतात. तेवढ्यात सबवे चालू होते व स्टेशन येताच हसर्या चेहर्याने सगळे आपापल्या मार्गाने जातात. असे मजेशीर कथानक चित्रपटाला लाभले आहे व उत्तम दिग्दर्शन सुद्धा.
आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. १९ जानेवारी २०१९ ला पंतप्रधानांच्या हस्ते ह्या संग्रहालयाचे उद्घाटन झाले.
चित्रपट संग्रहालयाबद्द्ल आणखी
चित्रपट संग्रहालयाबद्द्ल आणखी लिहा की! तुम्ही तिकडे पाहिलेल्या फिल्म विषयीच लिहिलत.
मोठ्या उत्सुकतेने धागा उघडला.
मोठ्या उत्सुकतेने धागा उघडला.
संग्रहालयाविषयी अजून माहिती द्या की!
संग्रहालय जिथे आहे, त्या
संग्रहालय जिथे आहे, त्या ’आलिशान महाला’चं नाव गुलशन महाल. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला तो बांधण्यात आला. तेव्हा त्याचं नाव ’गुलशन आबाद’ असं होतं. पीरभॉय खलकदिना या खोजा व्यापार्यानं तो बांधला होता. त्या काळी या बंगल्याच्या थेट मागे समुद्र होता. किंबहुना तो समुद्रकिनाराही पीरभॉय यांच्या मालकीचा होता. पीरभॉय यांच्या नातवानं खुर्शीद राजाबाली या बर्मी तरुणीशी लग्न केलं. तिनं या बंगल्याचं नवं प्रवेशद्वार पेडर रोडच्या दिशेनं बांधलं. खुर्शीद उत्तम सतार वाजवी. या बंगल्यात तिच्या आजेसासर्यांच्या काळापासून पार्ट्या होत, त्यांचं प्रमाण खुर्शीदमुळे वाढलं. १९३२ साली खुर्शीद मक्केला गेली आणि तिथे तिनं तिथली दृश्यं चित्रीत केली आणि त्याची एक छोटी फिल्म तयार केली. त्यामुळे खुर्शीद ही भारतातली पहिली स्त्री डॉक्युमेंटरी मेकर. त्या सुमारास देविकाराणी त्या बंगल्याच्या एका भागात भाड्यानं राहत असत. त्यांच्या प्रभावामुळे खुर्शीदनं ती फिल्म तयार केली असावी.
१९५० साली खुर्शीद पाकिस्तानात गेलेली असताना भारत सरकारनं तिचा बंगला आणि इतर प्रॉपर्टी ताब्यात घेतली. तिची मुलंही तेव्हा परदेशी होती. ती लगेच भारतात परतली, पण तिला तिची मालमत्ता परत मिळाली नाही. तिला पाकिस्तानात परतावं लागलं. त्यानंतर १९८९ साली तिच्या मृत्यूपर्यंत तिला मर्यादित व्हिसावर काहीवेळा भारतानं मुंबईत येऊ दिलं. तिची मुलं वेगवेगळ्या देशांमध्ये स्थायिक झाली कारण त्यांना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी परवानग्या नाकारल्या.
गुलशन महालमध्ये एकेकाळी दवाखाना होता, जयहिंद कॉलेजचं ऑफिस होतं. मग फिल्म्स डिव्हिजनच्या ताब्यात ही इमारत आली. बंगल्याच्या शेजारी आता दोन सुसज्जा चित्रपटगृहं बांधली आहेत, तिथे चित्रपटमहोत्सव होतात. एरवी सेन्सॉरसाठीच्या शोसाठी ती वापरली जातात.
*
गेल्या वर्षी आमच्या एका सेन्सॉर स्क्रिनिंगसाठी तिथे गेलो, तर संग्रहालयाचं उद्घाटन व्हायचं होतं. पण चित्रपटगृहाच्या प्रोजेक्शन रूमचा दरवाजा संग्रहालयाच्या एका मजल्यावर आहे. तिथे चित्रपटांच्या विविध विभागांची माहिती लहान मुलांच्या दृष्टीनं सुरेख मांडली आहे. मला ती इन्स्टॉलेशन्स फार्फार आवडली. आता एकदा पुन्हा तिथे जायला हवं. खुर्शीदच्या फिल्म्सचा मात्र तिथे उल्लेख नाही, असं सेन्सॉरच्या एका अधिकार्यांकडून कळलं. प्रत्यक्ष बघायला हवं.
माहितीसाठी धन्यवाद चिनूक्स!
माहितीसाठी धन्यवाद चिनूक्स!
यात फिल्म इंडस्ट्रीविषयी काही मनोरंजक गोष्टी बघायला मिळतील का?
अज्ञातवासी,
अज्ञातवासी,
तशी अपेक्षा आहे. मी संग्रहालय सगळं पाहिलेलं नाही. उद्घाटनापूर्वी एक मजला तेवढा पाहिला होता आणि तो आवडला होता.
गुलशन महालच्या अर्धवट उघड्या खिडक्यांमधून आतलं काही धड दिसलं नव्हतं.
धन्यवाद!
धन्यवाद चिनूक्स!
मी संध्याकाळी युरोपियन
मी संध्याकाळी युरोपियन महोत्सवातील चित्रपट पाहण्यास गेलो होतो. तेव्हा संंग्रहालय बंद झाले होते. ११ ते ५ अशी वेळ आहे. तेथे असलेल्या महिला सुरक्षा अधिकारींनी जी माहिती दिली तीच मी पोस्ट मध्ये दिली आहे. गुलशन महाल हा बाहेरून अतिशय सुंदर दिसतो. तसेच ृृृृृृृृृऑडिटोरियमही खूप चांगले आहे. तिथे जुन्या काळापासूनची चित्रपटातली दृृृृृृृश्ये ओळीने लावली आहेत. वरच्या ३-४ मजल्यांवर संग्रहालय आहे.