प्रेम हा एक असा विषय आहे, जो चॉकलेट सारखा आहे. कितीही वेळा खाल्लं तरी आपल पोटहि भरत नाही आणि त्या चॉकलेटचा गोडवाहि कमी होत नाही. मितवा हा हि एक असाच चित्रपट. प्रेमात भिजलेला. शिवम सारंग एक मोठ्ठा बिझनेसमन. पण अय्याश, बिघडलेला. जगातल्या सगळ्या मुली आपल्याला पाहिल्यावर आपल्यावर फिदा होतील, असा त्याच्या ओव्हर कॉन्फीडन्स. पण एक मुलगी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करते, आणि तिथे तोच तिच्या प्रेमात पडतो. प्रेम, लग्न, कमीटमेंट यावर त्याचा विश्वासचं नाही. पण प्रेम त्याला कस बदलत, त्याच जीवन कसं बदलत हेच त्यालासुद्धा कळत नाही. आणि त्यावरच हा चित्रपट आहे.
अवनीच्या चित्रात प्रार्थना बेहेरेनी असे काही गहिरे रंग भरलेत कि, कदाचित दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्रीला ते जमलं नसत. Hats Off to her!! चित्रपट बघताना, ती या दोघांपुढे नवीन आहे, अस चुकून सुद्धा वाटत नाही.
स्वप्नील बद्दल काय बोलणार? तो तर माझा आवडता हिरो आहे, एका लग्नाची दुसरी गोष्ट पासूनचा ! आणि सोनाली कुलकर्णी सुद्धा चित्रपटात चांगला अभिनय करते.
या चित्रपटातील गाणी खूप आधीपासूनच आपल्या मोबाईलवर रिंगटोनच काम करतात. त्यामुळे गाण्यांची मेलोडी मस्त आहे, हे वेगळ सांगायला नको.
‘दूर – दूर’ नावच sad सॉंग सुद्धा मस्त जमलेलं आहे.
चित्रपट का आवडला:-
सोनाली आणि स्वप्नीलची केमिस्ट्री खूप मस्त जुळून आलीये.
प्रार्थना बेहेरे चा अभिनय, दिसण, चित्रपटातील संपूर्ण वावर.... सगळंच अप्रतिम आहे.
मराठी चित्रपट असूनही हिंदी चित्रपट पहिल्याचा फील यावा याची त्यांनी काळजी घेतलेली आहे.
का नाही आवडला:-
माझी आवडती स्वप्नील-मुक्ताची जोडी यात नाही.
या चित्रपटाची गाणी ऐकली आहेत
या चित्रपटाची गाणी ऐकली आहेत . छान आहेत
चित्रपट पाहायचा योग नाही आला अजून
प्रार्थना बेहेरे साठी आणि
प्रार्थना बेहेरे साठी आणि स्वप्निल साठी पाहावाच.
मराठी चित्रपट असूनही हिंदी
मराठी चित्रपट असूनही हिंदी चित्रपट पहिल्याचा फील यावा याची त्यांनी काळजी घेतलेली आहे.>>>>>>
फील भाषेवर depend आहे? जर तुम्हाला हिंदी चित्रपट पाहिल्याचा फील हवा आहे तर हिंदी चित्रपटच पाहा ना,
(गाभ्रीचा पाउस, जोगवा, विहीर यांना दिलेला हिंदीचा फील.... बाप्रे imagine पण करवत नाही.)
मला तरी ही फिल्म बकवास वाटली. कितीही संपत्ती उतू गेलेली दाखवली तरी ते बेअरिंग पकडायला यायला हवे. स्वप्नील कडे बघून अजिबात तसे वाटत नाही. (उदा. 'सपने साजन के' फिल्म मध्ये, गरीब करिश्मा आईने शिवलेले कपडे घालून जशी मिजास मारत असते, तसे काहीसे वाटले)
१०० वेळा शिवम सारंग ऐकुन कान पकले, शेवट पूर्णतः भरकटलाय किंवा त्याला काहीच अर्थ नाही,
म्हणजे फक्त हिंदीचा फील दिल्यावर मराठी प्रेक्षकांना फिल्म आवडेल, बाकी त्याच्यातल्या content चा बट्ट्याबोळ झाला तरी चालेल, हे असे आहे.
(माझे वैयक्तिक मत )
चित्रपट बघण्यासाठी स्वप्नील
चित्रपट बघण्यासाठी स्वप्नील जोशी हे कारण पुरेसे ठरावे..
गाणी मस्त आहेत प्रश्नच नाही!
चित्रपट बघण्यासाठी स्वप्नील
चित्रपट बघण्यासाठी स्वप्नील जोशी हे कारण पुरेसे ठरावे..>>>>>>>>
बघितला, स्वप्निल स्वतःच एक
बघितला, स्वप्निल स्वतःच एक चान्गला अभिनेता आहे( एलदुगो प्रुव्हड ईट) तरी त्याचे शाखा ला कॉपि करणे मला कळत नाही.
ते बर्याच लेव्हल वर अतिशय इरीटेटिन्ग होते. बाकी चित्रपट चित्रिक्रणाबाबत सरस आहे, काही गाणि जमुन आलियेत, चकाचक ,फ्रेश टेन्किन्ग अस जमुन आलय.
वेगळा विशय निवडला असताना एवधा अ.अ. अतिरन्जित शेवट दाखवायचे कारण कळले नाही. त्याने सगळ्या चित्रपटाचा इफेक्ट धुळिस मिळालाय.
यात भुमिकेला न्याय देण्याच काम कुणि चोख बजावल असेल तर ते प्रार्थना ने, सहज आणि फ्रेश वावर आहे तिचा..
सोनाली मात्र तितकिशी अपिलिन्ग वाटली नाही. तिला तिचे डायलॉग ही निट म्हणता येत नाही.
तरी त्याचे शाखा ला कॉपि करणे
तरी त्याचे शाखा ला कॉपि करणे मला कळत नाही.
>>>>
हो अॅक्चुअली, तो शाहरूखचा चाहता आहे हे त्याने मराठी कार्यक्रमात कबूल करत त्याचा एक डायलॉग सुद्धा मारला होता...
पण सिनेमात कॉपी करायची गरज नाही.. किंबहुना मुंबई-पुणे-मुंबई या प्रेमकथेत त्याने तसे केले नव्हतेच..
कदाचित दिग्दर्शकाचीच तशी डिमांड असेल..
दस्तुरखुद्द स्वप्नीलच जर
दस्तुरखुद्द स्वप्नीलच जर लेखकाच्या भूमिकेत पण असेल तर दुसर काय होणार?
विषय भरकटणे, 'शेवटा'चे वाट्टोळे होणे या गोष्टी समजू शकतो. एक ना धड भाराभर चिंध्या
प्रशू, हिंदी चित्रपटाचा फिल
प्रशू,
हिंदी चित्रपटाचा फिल म्हणजे हिंदी चित्रपटाचे glamor त्यांनी या सिनेमात आणले आहे, असे म्हणायचे होते.
प्राजक्ता, Agree with you.
प्राजक्ता,
Agree with you. +100
प्रशुशी सहमत.. इतका ट्टुकार
प्रशुशी सहमत.. इतका ट्टुकार चित्रपट.. का पाहिला हा प्रश्न अजुनही माझा मलाच पडतोय.
नशीब घरी लॅपटॉपवर पाहिला. पैसे देऊन पाहिला असता तर..
स्वप्नीलने या चित्रपटात स्वतःची जेवढी लाल केलीये तेवढी शाखासुद्धा करत नसेल.
१०० वेळा शिवम सारंग ऐकुन कान पकले >> +१
मला तरी ही फिल्म बकवास वाटली. कितीही संपत्ती उतू गेलेली दाखवली तरी ते बेअरिंग पकडायला यायला हवे. स्वप्नील कडे बघून अजिबात तसे वाटत नाही.>> +१
स्वप्नीलने कॅमेरा आणि एकुणच कथेचा फोकस सारखा स्वतःवर ठेवल्याने त्याच्या चुका आणि फसलेले बेअरींग जरा जास्तच तीव्रपणे अंगावर येते.
सोनाली विजय कुलकर्णीचा आवाज मला समहाऊ खुप जास्त इरिटेटींग वाटला. सर्दी आणि खोकला एकदमच झाल्यासारखा.
प्रार्थना या पात्राचे काही स्वभावविशेष अगदीच चक्रावुन टाकणारे आहेत.
बघितला. फारसा आवडला नाही.
बघितला. फारसा आवडला नाही.
स्वप्निलला श्रीमंतीचा , रोमँटिकपणाचा, एक्झीक्युटीव्ह असण्याचा असा कुठलाच आव धडपणे आणता आला नाहीये. हेलिकॉप्टरनी जाऊन मीटींग अटेंड करण्याचा सीन प्रचंड खुळा झालाय. हेलि. जिथून उडते तिथेच उतरते. ( दुसरे हेलिपॅड भाड्यानी घ्यायला परवडत नाही तर असले सीन टाकायचे कशाला? तेव्हड्यानीचश्रींमंती व्यक्त होते का?)
सो. कु. (नवी), अभिनयात बरीच कच्ची आहे. तिचं फटफटीत पांढरं गोरेपण आणि आवाज तिच्यात नसलेल्या अभिनयाला अजुनच मारक ठरतो.
अवनीचं काम करणारी प्रार्थना बेहेरे भाव खाऊन जाते. तिचा रोलही आवडला.
एक प्रश्नः एखाद्याचा दिवसातल्या दोन तासांपूरता स्मॄतीभ्रंश होऊ शकतो का?
हेलिकॉप्टरनी जाऊन मीटींग
हेलिकॉप्टरनी जाऊन मीटींग अटेंड करण्याचा सीन प्रचंड खुळा झालाय. हेलि. जिथून उडते तिथेच उतरते.>>
हो हो!! ते फार फनी वाटत, स्वप्निल च सुटलेल पोट कितिही सुटाखाली लपवल तरी दिसत राह्त...
सो. कु. (नवी), अभिनयात बरीच कच्ची आहे. तिचं फटफटीत पांढरं गोरेपण आणि आवाज तिच्यात नसलेल्या अभिनयाला अजुनच मारक ठरतो.
अवनीचं काम करणारी प्रार्थना बेहेरे भाव खाऊन जाते. तिचा रोलही आवडला. >>> किन्बहुना दोघिच्या रोलची अलटापलट केली असती तर जास्त बर झाल असत असही वाटल.
कथा तर मलाही फारशी नाही पटली,
कथा तर मलाही फारशी नाही पटली, पण कलाकारांनी आणि विशेषतः प्रार्थना नी खूप मेहनत केलेली आहे. प्रार्थनाची आता मी पंखा झालीये.
तद्द्न भंपक, टुकार आणि भंगार
तद्द्न भंपक, टुकार आणि भंगार चित्रपट .. थेटरात पाहिला त्यामुळे अजून जास्त चिड्चिड झाली..
कालच बघितला …एक नम्बर टुकार
कालच बघितला …एक नम्बर टुकार मुव्हि...
एक प्रश्नः एखाद्याचा
एक प्रश्नः एखाद्याचा दिवसातल्या दोन तासांपूरता स्मॄतीभ्रंश होऊ शकतो का?
द शिवम सारंग आणि नंदिनीचा
द शिवम सारंग आणि नंदिनीचा किसिंग सीन भारी झालाय, मराठीत एवढा बोल्ड पणा त्या हॉटेलात बघ्यांना जसा अचंबित करणारा होता त्याच्या पेक्ष्या कितीतरी पट्टीने पिक्चर बघणार्याच्या अंगावर येतो (आवर रे तू ह्याला आवर रे $$$$$)
वेगळा विशय निवडला असताना >>
वेगळा विशय निवडला असताना >> हा खरच वेगळा विषय आहे
बापरे..
अज्याबात बघाणार नै..
बोदलेबुवांचा मुखडा पाहूनच न
बोदलेबुवांचा मुखडा पाहूनच न पाहण्याचं ठरवलं होतंच!
मराठी चित्रपट असूनही हिंदी
मराठी चित्रपट असूनही हिंदी चित्रपट पहिल्याचा फील यावा याची त्यांनी काळजी घेतलेली आहे.
हिंदी चित्रपटाचा फिल म्हणजे हिंदी चित्रपटाचे glamor त्यांनी या सिनेमात आणले आहे >>>>
याचा अर्थ glamor फक्त हिंदी चित्रपटालाच असते? Or
glamor असले की चित्रपट हीट होतो??
तद्दन भिकार, टुकार चित्रपट.
तद्दन भिकार, टुकार चित्रपट. कोण कोणाचा मितवा हेच कळायला मार्ग नाही. अवनी शिवमवर प्रेम करतेय. शिवम नंदिनीवर प्रेम करतोय. नंदिनी कोमात गेलेल्या fiance वर प्रेम करतेय. वर तिला शिवमही हवाय. आणि शेवट तर अ अ अ अ
प्रशु, शुगोल>>>> +११११
तो बघायला गेलो होतो पण "दम
तो बघायला गेलो होतो पण "दम दगा के "बघितला ,बरे झाले,मितवा पाहिला नाही फूकट तीन तास डोक्याला त्रास झाला असता
चित्रपट बघण्यासाठी स्वप्नील जोशी हे कारण पुरेसे ठरावे..> कै च्या कै
त्याचा तोच तोच अभिनय आता रटाळ वाटतोय , एका ठराविक इमेजच्या बाहेर तो आलाच नाही अजून फिटनेसकडे तर अजिबात लक्ष नाही (बहुतेक सर्वच मराठी पुरुष कलाकारांचा तोच प्रॉब्लेम असतो),
फिटनेसकडे तर अजिबात लक्ष नाही
फिटनेसकडे तर अजिबात लक्ष नाही (बहुतेक सर्वच मराठी पुरुष कलाकारांचा तोच प्रॉब्लेम असतो),
>> +१०० अनुमोदन
पोस्ट्स वाचून चित्रपट नाही
पोस्ट्स वाचून चित्रपट नाही बघितला ते बर केल अस वाटतंय
<< फिटनेसकडे तर अजिबात लक्ष
<< फिटनेसकडे तर अजिबात लक्ष नाही (बहुतेक सर्वच मराठी पुरुष कलाकारांचा तोच प्रॉब्लेम असतो) >>
राजेश श्रुंगारपुरे ला पाहिलेत का?
राजेश श्रुंगारपुरे ला पाहिलेत
राजेश श्रुंगारपुरे ला पाहिलेत का?>>>>>
राजेश कलाकार आहे?
अभिनयातला 'अ' येत नसला की, compensate करायला या असल्या गोष्टी कराव्या लागतात.
कोण राजेश श्रुंगारपुरे .. आधी
कोण राजेश श्रुंगारपुरे .. आधी कुठला चित्रपट केलाय का याने ? खरेच माहित नाही आणि बहुतेकांना माहितीही नसेल
आपण जनरली फेमस कलाकाराबांबत बोलत होतो,
rajesh shringarpure
rajesh shringarpure
तद्दन भिकार, टुकार चित्रपट.
तद्दन भिकार, टुकार चित्रपट. कोण कोणाचा मितवा हेच कळायला मार्ग नाही. अवनी शिवमवर प्रेम करतेय. शिवम नंदिनीवर प्रेम करतोय. नंदिनी कोमात गेलेल्या fiance वर प्रेम करतेय. वर तिला शिवमही हवाय. आणि शेवट तर अ अ अ अ + १११११
बाकी ती अवनी मात्र खुप खुप आवडली.
स्वप्निलला बघताना शाहरुखची भ्रष्ट कॉपी बघतेय असे वाटत होते.
सोनालीबद्दल ना बोललेलच बरं. प्राजक्ताला अनुमोदन.
आणि मुख्य म्हणजे सिनेमात सुरवात वर्तमानकाळात नंतर फ्लॅशबॅक परत चालुकाळ परत फ्लॅशबॅक ही एकच संकल्पना आधी दुनियादारी मग क्लासमेट आणि आता मितवा या सिनेमांना वापरली आहे मला ह्या संकल्पनेचा आता कंटाळा येऊ लागलाय :रागः
Pages