मितवा (सिनेरिव्ह्यू)

Submitted by मी मधुरा on 6 March, 2015 - 01:03

प्रेम हा एक असा विषय आहे, जो चॉकलेट सारखा आहे. कितीही वेळा खाल्लं तरी आपल पोटहि भरत नाही आणि त्या चॉकलेटचा गोडवाहि कमी होत नाही. मितवा हा हि एक असाच चित्रपट. प्रेमात भिजलेला. शिवम सारंग एक मोठ्ठा बिझनेसमन. पण अय्याश, बिघडलेला. जगातल्या सगळ्या मुली आपल्याला पाहिल्यावर आपल्यावर फिदा होतील, असा त्याच्या ओव्हर कॉन्फीडन्स. पण एक मुलगी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करते, आणि तिथे तोच तिच्या प्रेमात पडतो. प्रेम, लग्न, कमीटमेंट यावर त्याचा विश्वासचं नाही. पण प्रेम त्याला कस बदलत, त्याच जीवन कसं बदलत हेच त्यालासुद्धा कळत नाही. आणि त्यावरच हा चित्रपट आहे.

prarthana-behere-swwpanil-joshi-sonalee-mitwa.jpg

अवनीच्या चित्रात प्रार्थना बेहेरेनी असे काही गहिरे रंग भरलेत कि, कदाचित दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्रीला ते जमलं नसत. Hats Off to her!! चित्रपट बघताना, ती या दोघांपुढे नवीन आहे, अस चुकून सुद्धा वाटत नाही.
स्वप्नील बद्दल काय बोलणार? तो तर माझा आवडता हिरो आहे, एका लग्नाची दुसरी गोष्ट पासूनचा ! आणि सोनाली कुलकर्णी सुद्धा चित्रपटात चांगला अभिनय करते.
या चित्रपटातील गाणी खूप आधीपासूनच आपल्या मोबाईलवर रिंगटोनच काम करतात. त्यामुळे गाण्यांची मेलोडी मस्त आहे, हे वेगळ सांगायला नको.
‘दूर – दूर’ नावच sad सॉंग सुद्धा मस्त जमलेलं आहे.

चित्रपट का आवडला:-

सोनाली आणि स्वप्नीलची केमिस्ट्री खूप मस्त जुळून आलीये.
प्रार्थना बेहेरे चा अभिनय, दिसण, चित्रपटातील संपूर्ण वावर.... सगळंच अप्रतिम आहे.
मराठी चित्रपट असूनही हिंदी चित्रपट पहिल्याचा फील यावा याची त्यांनी काळजी घेतलेली आहे.

का नाही आवडला:-

माझी आवडती स्वप्नील-मुक्ताची जोडी यात नाही. Wink

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाहरूख स्वप्नील यांचे चाहते क्लास मध्ये मोडतात.. >>> काय्य्य्य्य्य्य्य्य??? मे बी असं(ही) तुम्हाला(च) वाटतं.

शाहरूख स्वप्नील यांचे चाबूक अभिनयाचे उदाहरण देऊ शकाल?

चूक
रा-वन = अर्जुन रामपाल
जी-वन = शाहरूख खान
>>
कसला बोअर आहेस रे तू Uhoh

ऋन्मेऽऽष, क्लास आणि मास या शब्दांचे तुम्हाला अभिप्रेत असणारे अर्थ बरोब्बर उलट आहेत हे उघड आहे. Lol

शाहरूख स्वप्नील यांचे चाहते क्लास मध्ये मोडतात>>>
अरे हो असु द्या ना क्लास लिह्लय फर्स्ट, सेकंड की थर्ड ते कुठे लिहिलय आपापल्या सोयी प्रमाणे समजुन घ्या.. Wink हाकानाका..
आणि हो, शाखा आणि त्याचे चाहते 'लाल' करुन घ्यायची एकबी संधी सोडत नाही मग तुम्ही ठरवा संधी द्यायची की नाही ते???

रश्मी.. | 25 March, 2015 - 17:53 नवीन
झबा= झपाटलेला बाहुला.
<<<<<<<वाह रश्मी !!! तो खरच त्या प्यारवाली लव स्टोरी मध्ये बोलक्या बहुल्यासारखा (विग लावलेला माठ) वाटत होता.

<<<अन बाय द वे, मुंबई पुणे मुंबई मध्ये मुक्ताच भाव खाउन गेली होती.>>> +१०००
स्वप्निल तर बालिश वाट्तो मुंबई पुणे मुंबई मध्ये.

वरती फिटनेस चा मुद्दा आला होता. स्टुडंट ऑफ द इयर मी आता सिडीवर बघितला, बाकि सगळे ( आणि आलिया ) जाऊ द्या. पण सिद्धार्थ आणि वरुण दोघेही किती फिट आहेत ! त्यातल्या प्रत्येक स्पोर्ट इव्हेंटमधे त्यांच्या हालचाली, उर्जा, जोश आणि फिटनेस .. उल्लेखनीय आहे. शिवाय कॉलेजकुमार म्हणूनही ते शोभले. ( याचा अर्थ असा नाही कि तो चित्रपट चांगला आहे. )

फिटनेस हे दुय्यम आहे. जाहीरातीसाठी वा मॉडेलिंग साठी ठिकाय पण चित्रपटांमध्ये अभिनयानंतर कश्याची गरज लागते ते फिटनेस नाही तर एक्स फॅक्टरची..

आणि तो अर्थातच बॉलीवूडमध्ये शाखाकडे आहे आणि मायबोलीवूडमध्ये स्वजोकडे आहे.

*मायबोलीवूड = मराठी चित्रपटसृष्टी

आणि तो अर्थातच बॉलीवूडमध्ये शाखाकडे आहे आणि मायबोलीवूडमध्ये स्वजोकडे आहे.>>>>>>आत्ता ग बया!

याला म्हणतात दिल लगा गधीसे तो परी क्या चीज है.

उत्कृष्ट अभिनय करणारे सगळेच घोरत पडलेत वाट्ट. ( गरगरुन चक्कर येऊन पडलेली बाहुली.)

Pages