मितवा (सिनेरिव्ह्यू)

Submitted by मी मधुरा on 6 March, 2015 - 01:03

प्रेम हा एक असा विषय आहे, जो चॉकलेट सारखा आहे. कितीही वेळा खाल्लं तरी आपल पोटहि भरत नाही आणि त्या चॉकलेटचा गोडवाहि कमी होत नाही. मितवा हा हि एक असाच चित्रपट. प्रेमात भिजलेला. शिवम सारंग एक मोठ्ठा बिझनेसमन. पण अय्याश, बिघडलेला. जगातल्या सगळ्या मुली आपल्याला पाहिल्यावर आपल्यावर फिदा होतील, असा त्याच्या ओव्हर कॉन्फीडन्स. पण एक मुलगी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करते, आणि तिथे तोच तिच्या प्रेमात पडतो. प्रेम, लग्न, कमीटमेंट यावर त्याचा विश्वासचं नाही. पण प्रेम त्याला कस बदलत, त्याच जीवन कसं बदलत हेच त्यालासुद्धा कळत नाही. आणि त्यावरच हा चित्रपट आहे.

prarthana-behere-swwpanil-joshi-sonalee-mitwa.jpg

अवनीच्या चित्रात प्रार्थना बेहेरेनी असे काही गहिरे रंग भरलेत कि, कदाचित दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्रीला ते जमलं नसत. Hats Off to her!! चित्रपट बघताना, ती या दोघांपुढे नवीन आहे, अस चुकून सुद्धा वाटत नाही.
स्वप्नील बद्दल काय बोलणार? तो तर माझा आवडता हिरो आहे, एका लग्नाची दुसरी गोष्ट पासूनचा ! आणि सोनाली कुलकर्णी सुद्धा चित्रपटात चांगला अभिनय करते.
या चित्रपटातील गाणी खूप आधीपासूनच आपल्या मोबाईलवर रिंगटोनच काम करतात. त्यामुळे गाण्यांची मेलोडी मस्त आहे, हे वेगळ सांगायला नको.
‘दूर – दूर’ नावच sad सॉंग सुद्धा मस्त जमलेलं आहे.

चित्रपट का आवडला:-

सोनाली आणि स्वप्नीलची केमिस्ट्री खूप मस्त जुळून आलीये.
प्रार्थना बेहेरे चा अभिनय, दिसण, चित्रपटातील संपूर्ण वावर.... सगळंच अप्रतिम आहे.
मराठी चित्रपट असूनही हिंदी चित्रपट पहिल्याचा फील यावा याची त्यांनी काळजी घेतलेली आहे.

का नाही आवडला:-

माझी आवडती स्वप्नील-मुक्ताची जोडी यात नाही. Wink

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छे..तुमच्या प्रतिक्रिया न वाचता काल चित्रपट पहिला आणि Angry
स्वप्नील जोशी कशाला त्या शाहरुख ची नक्कल करतो..सोनाली कुलकर्णी चे तर अतिशय भंकस काम...
कथा त्याहून वाईट..एकूण चित्रपट वाईट..ज्यांना चित्रपट आवडला त्यांचे कौतूक आहे मला..

अजिंक्य देव ची आठवण काढल्याबद्दल अनेक जण खुश झालेले दिसतात. त्याचा अभिनय (लहान भाऊ नव्हे) जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिला असेल तर आता जवळपास त्याच्या शैलीत (म्हणजे अगदी नक्कल करतोय असे मला म्हणायचे नाही पण शैली जुळतेय असा) अभिनय करणारा एक अभिनेता उपग्रह वाहिन्यांवरील हिंदी कार्यक्रमांत दिसतो. तो कोण हे कुणाला ओळखता येईल काय? [म्हणजे फक्त मला एकट्यालाच तसे वाटते की अजूनही कुणाला असेच वाटते हेही मला कळेल.]

अजून खूप मेहनत घ्यायला हवी लुक आणि बिहेविअर वर>>>>> ते ठीक आहे हो, पण अभिनयाचे काय?

आजही टिपीकल, मध्यमवर्गीय, संसारी बाई म्हणून श्यामला टिपरेच डोळ्यासमोर उभी राहते, अग्निहोत्र मधील मुक्ता अजूनही भाव खाउन जाते, सवत माझे लाडकी-उत्तरायण मधील नीना कुलकर्णी अजूनही आठवते. आजही सचिन कुंडलकर गंध साठी अमृता सुभाषने घेतलेल्या मेहनती बद्दल भरभरून बोलतो. Happy

आज लोक मल्टीप्लेक्स मध्ये जाऊन चित्रपट पाहतात, चित्रपटांचे बजेट करोडोंच्या घरात पोहचले आहे. जाहिरातीसाठीही अमाप पैसा खर्च होतो. आणि यातून आपल्याला मिळत काय... silver wrapping foil मध्ये शिळ, बेचव अन्न.
Any way,

मला एक प्रश्न असा पड्लाय, की 'मितवा' हा इतका बकवास, टुकार चित्रपट असुनही या चित्रपटाने त्याची Success Party कशी काय celebrate केली? Uhoh

मला एक प्रश्न असा पड्लाय, की 'मितवा' हा इतका बकवास, टुकार चित्रपट असुनही या चित्रपटाने त्याची Success Party कशी काय celebrate केली? <<<<<<<<<< होटेलात जावुन Uhoh

नक्कल करतोय असे मला म्हणायचे नाही पण शैली जुळतेय असा>>>> जाउ द्या हो, उपग्रह वाहिन्या, त्यातले कलाकार(?) त्यांचा अभिनय (?) आणि वर शैली(???) बापरे या बाबत न बोललेलेच बरे.

मला एक प्रश्न असा पड्लाय, की 'मितवा' हा इतका बकवास, टुकार चित्रपट असुनही या चित्रपटाने त्याची Success Party कशी काय celebrate केली>> दिखाउ पणा आहे निव्वळ.

अहो पार्टी करायला सक्सेस व्हायला हवंच असं नाही. नुसतं सांगायचं सक्सेसफुल झाला सिनेमा म्हणून.

हा हा, सलमान खानाचे सध्याचे सारेच चित्रपट भंपक हून अधिक भंपकक्क्क्क्क्क्क्क्क्क्क आहेत तरीही त्यांनी विक्रमी कमाई केलीच ना, तसच विक्रमी कमाईचा चित्रपट दुनियादारी हाही भंपकच आहे.

दुनियादारी हा भंपक चित्रपट नसून.. भंपकेस्ट चित्रपट आहे. फुकट काय... कुणी पैसे दिले तरी मी पुन्हा बघणार नाही. अंकुश चौधरी दोन पायांवर चालणाऱ्या कोळ्यासारखा (जाळं विणणारा. जाळं पाण्यात फेकणारा नव्हे), स्वप्नील जोशी घरंगळणाऱ्या फुटबॉलसारखा, सई ताम्हणकर चालत्या फिरत्या मख्ख ओंडक्यासारखी असं सगळं दिसतं मला..
म्हणे कॉलेजवयीन !

हे कॉलेजवयीन असतील तर मी डबा घेऊन बाईकवरून ऑफिसला न जाता पाठीवर दप्तर घेऊन बालवाडीत जायला हवं !

Digitisation मुळे प्रसिद्धीसाठी उठसूट कोणीही फिल्म काढतं. कथा, अभिनय, संवाद, गीतांचे शब्द अशा बेसिक गोष्टींवर फार कमी लक्ष दिले जाते. आपसूकच चित्रपट/मालिकांचा दर्जा खालावतो. जेव्हा निर्माता- दिग्दर्शक याना विचारले जाते तेव्हा ते म्हणतात, 'पब्लिकला जे हवे आहे तेच आम्ही देत असतो' आणि पब्लिक पण जे मिळते ते पाहत असते. त्यामुळे experiment घडतच नाहीत.

याला जबाबदार कोणाला धरायचे?

(कन्यादान, होणार सून मी या घराची सारख्या मालिका किती टुकार आहेत यावर ढीगान्या चर्चा होत असतात, तरीही या मालिका दररोज न चुकता पाहणाऱ्यांची संख्या मात्र कमी झाली नाही)

टीप - मायबोलीवरील प्रतिसाद वाचूनच वरील मालिका टुकार आहेत असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

+१००००० टू रसप !
दुनियादारीचे डाय हार्ड फॅन बहुतेक सॉफ्ट झालेत.. नैतर मज्जा आली असती आत्ता .
बाकी झ.बा. महागुरूंचा पुढाचा वारस आहे

अजिंक्य देव ची आठवण काढल्याबद्दल अनेक जण खुश झालेले दिसतात. त्याचा अभिनय (लहान भाऊ नव्हे) जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिला असेल तर आता जवळपास त्याच्या शैलीत (म्हणजे अगदी नक्कल करतोय असे मला म्हणायचे नाही पण शैली जुळतेय असा) अभिनय करणारा एक अभिनेता उपग्रह वाहिन्यांवरील हिंदी कार्यक्रमांत दिसतो. तो कोण हे कुणाला ओळखता येईल काय? [म्हणजे फक्त मला एकट्यालाच तसे वाटते की अजूनही कुणाला असेच वाटते हेही मला कळेल.]
<<<<<<<<<<<<<
याचं उत्तर अजून येणे बाकी आहे. मराठी च्यानेल्स सर्फिंगसाठी तरी मिळतात पण हिंदी नाही हो. त्यामुळे उत्तर प्रश्नकर्त्याकडून अपेक्षित आहे.

<< याचं उत्तर अजून येणे बाकी आहे. मराठी च्यानेल्स सर्फिंगसाठी तरी मिळतात पण हिंदी नाही हो. त्यामुळे उत्तर प्रश्नकर्त्याकडून अपेक्षित आहे. >>

मी प्रश्न याकरिता विचारला होता की, मला जसं वाटतंय तसं आणखी कुणाला वाटतंय का? पण कुणाकडून काहीच अंदाज व्यक्त केला न गेल्याने बहुदा मला एकट्यालाच तसं वाटत असावं आणि ते चूक असावं असं समजून मी हा प्रश्नच मागे घेत आहे.

मी प्रश्न याकरिता विचारला होता की, मला जसं वाटतंय तसं आणखी कुणाला वाटतंय का? पण कुणाकडून काहीच अंदाज व्यक्त केला न गेल्याने बहुदा मला एकट्यालाच तसं वाटत असावं आणि ते चूक असावं असं समजून मी हा प्रश्नच मागे घेत आहे. >>> तुम्ही सांगा तर .
निदान त्यासाठी तरी बघु एखादा भाग . आणि मग ठरवू आम्हाला काय वाटत ते Happy

नाही.......चे सु गु सर असे करू नका.
प्रश्न मागे घेवू नका उत्तर द्या. मला अजिंक्य देव खूप आवडतो लहानपणी त्याचा एक पिक्चर बघितला होता नाव नाही आठवत पण गाण हो गाण "दृष्ट लागण्या दोघे .....घर दोघांचे असेल सुखी स्वर्ग ज्यापुढे फिका पडे" यात तो मरतो मला फार वाईट वाटले होते. शिवाय तो प्रिया तेंडूलकर चा नवरा दाखवला होता त्यात त्याची आई भूत असेते वैगरे वैगरे. तर सांगायचे हे कि अजिंक्याची अक्टिंग करणार कोण असेल हा प्रश्न मनात राहून जाईल. तुम्ही सांगितलात तर पाहीन त्या नटाला . पण उत्तर द्या हो.

त्याचा एक पिक्चर बघितला होता नाव नाही आठवत पण गाण हो गाण "दृष्ट लागण्या दोघे .....घर दोघांचे असेल सुखी स्वर्ग ज्यापुढे फिका पडे" >>>>>> माझे घर माझा संसार

अजिंक्य देव सारखा दिसतो>>> त्याच्या सारखा दिसतो नाही हो, त्याच्या अभिनय शैलीत अभिनय करणारा हा एक अभिनेता उपग्रह वाहिन्यांवरील हिंदी कार्यक्रमांत दिसतो.

तसा दिसत नाही. त्या शैलीत (काही लकबी तर अगदी मिळत्या जुळत्या वाटतात) वावरतो. अर्थात हे असे मला वाटते म्हणजे ते बरोबर असेलच असे नव्हे. मी तसा दावादेखील करीत नाही, उलट माझा अंदाज मी माझ्यापुरताच ठेवित होतो, फक्त स्वस्ति व अपर्णा यांच्या आग्रहास्तव इथे टाकला इतकेच. इतर सदस्यांचा आक्षेप असल्यास तोही काढून टाकतो.

Pages