प्रेम हा एक असा विषय आहे, जो चॉकलेट सारखा आहे. कितीही वेळा खाल्लं तरी आपल पोटहि भरत नाही आणि त्या चॉकलेटचा गोडवाहि कमी होत नाही. मितवा हा हि एक असाच चित्रपट. प्रेमात भिजलेला. शिवम सारंग एक मोठ्ठा बिझनेसमन. पण अय्याश, बिघडलेला. जगातल्या सगळ्या मुली आपल्याला पाहिल्यावर आपल्यावर फिदा होतील, असा त्याच्या ओव्हर कॉन्फीडन्स. पण एक मुलगी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करते, आणि तिथे तोच तिच्या प्रेमात पडतो. प्रेम, लग्न, कमीटमेंट यावर त्याचा विश्वासचं नाही. पण प्रेम त्याला कस बदलत, त्याच जीवन कसं बदलत हेच त्यालासुद्धा कळत नाही. आणि त्यावरच हा चित्रपट आहे.
अवनीच्या चित्रात प्रार्थना बेहेरेनी असे काही गहिरे रंग भरलेत कि, कदाचित दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्रीला ते जमलं नसत. Hats Off to her!! चित्रपट बघताना, ती या दोघांपुढे नवीन आहे, अस चुकून सुद्धा वाटत नाही.
स्वप्नील बद्दल काय बोलणार? तो तर माझा आवडता हिरो आहे, एका लग्नाची दुसरी गोष्ट पासूनचा ! आणि सोनाली कुलकर्णी सुद्धा चित्रपटात चांगला अभिनय करते.
या चित्रपटातील गाणी खूप आधीपासूनच आपल्या मोबाईलवर रिंगटोनच काम करतात. त्यामुळे गाण्यांची मेलोडी मस्त आहे, हे वेगळ सांगायला नको.
‘दूर – दूर’ नावच sad सॉंग सुद्धा मस्त जमलेलं आहे.
चित्रपट का आवडला:-
सोनाली आणि स्वप्नीलची केमिस्ट्री खूप मस्त जुळून आलीये.
प्रार्थना बेहेरे चा अभिनय, दिसण, चित्रपटातील संपूर्ण वावर.... सगळंच अप्रतिम आहे.
मराठी चित्रपट असूनही हिंदी चित्रपट पहिल्याचा फील यावा याची त्यांनी काळजी घेतलेली आहे.
का नाही आवडला:-
माझी आवडती स्वप्नील-मुक्ताची जोडी यात नाही.
असं तुम्हाला(च)
असं तुम्हाला(च) वाटतं.
>>>
शाहरूखलाही वाटतं.
>>>>>>>
मलाही वाटतं रे ऋन्मेष
>>
मलाही वाटतं
ए गपे
ए गपे
नक्की काय वाटतं?
नक्की काय वाटतं?
(No subject)
नक्की काय वाटतं?
नक्की काय वाटतं?
असं तुम्हाला(च)
असं तुम्हाला(च) वाटतं.
>>>
शाहरूखलाही वाटतं.
>>>>>>>
मलाही वाटतं रे ऋन्मेष
>>
मलाही वाटतं फिदीफिदी
>>>>
मला पण
आपल्याकडे एक प्रॉब्लेम
आपल्याकडे एक प्रॉब्लेम आहे,दूसरे लग्न करयचे म्हटले तर घटस्पोट घ्यावा लागतो, आणि फालतू चर्चेला वाव मिळतो,
आता कितीतरी बॉलीवूडचे दिग्ज्जंनी बिनधास्त २,३,४ लग्न केलेली आहेतच कि, स्वजोला कशाला बकरा बनवताय.
स्वजो आवडत नाही तरीही त्याच्या व्ययक्तिक आयुष्यावरील ताशेरे मारल्याचा निषेध
येथील चर्चेमुळे अजिबात
येथील चर्चेमुळे अजिबात अपेक्षा न ठेवता बघितला - किंबहुना ऑनेस्टली सांगायचे तर काहीतरी फालतू असेल असेच डोक्यात घेउन बघितला, आणि पहिली ती श्रीमंती वगैरे सोडले तर उरलेला पिक्चर ओके वाटला! एवढा काही वाईट नाही.
Pages