मितवा (सिनेरिव्ह्यू)

Submitted by मी मधुरा on 6 March, 2015 - 01:03

प्रेम हा एक असा विषय आहे, जो चॉकलेट सारखा आहे. कितीही वेळा खाल्लं तरी आपल पोटहि भरत नाही आणि त्या चॉकलेटचा गोडवाहि कमी होत नाही. मितवा हा हि एक असाच चित्रपट. प्रेमात भिजलेला. शिवम सारंग एक मोठ्ठा बिझनेसमन. पण अय्याश, बिघडलेला. जगातल्या सगळ्या मुली आपल्याला पाहिल्यावर आपल्यावर फिदा होतील, असा त्याच्या ओव्हर कॉन्फीडन्स. पण एक मुलगी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करते, आणि तिथे तोच तिच्या प्रेमात पडतो. प्रेम, लग्न, कमीटमेंट यावर त्याचा विश्वासचं नाही. पण प्रेम त्याला कस बदलत, त्याच जीवन कसं बदलत हेच त्यालासुद्धा कळत नाही. आणि त्यावरच हा चित्रपट आहे.

prarthana-behere-swwpanil-joshi-sonalee-mitwa.jpg

अवनीच्या चित्रात प्रार्थना बेहेरेनी असे काही गहिरे रंग भरलेत कि, कदाचित दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्रीला ते जमलं नसत. Hats Off to her!! चित्रपट बघताना, ती या दोघांपुढे नवीन आहे, अस चुकून सुद्धा वाटत नाही.
स्वप्नील बद्दल काय बोलणार? तो तर माझा आवडता हिरो आहे, एका लग्नाची दुसरी गोष्ट पासूनचा ! आणि सोनाली कुलकर्णी सुद्धा चित्रपटात चांगला अभिनय करते.
या चित्रपटातील गाणी खूप आधीपासूनच आपल्या मोबाईलवर रिंगटोनच काम करतात. त्यामुळे गाण्यांची मेलोडी मस्त आहे, हे वेगळ सांगायला नको.
‘दूर – दूर’ नावच sad सॉंग सुद्धा मस्त जमलेलं आहे.

चित्रपट का आवडला:-

सोनाली आणि स्वप्नीलची केमिस्ट्री खूप मस्त जुळून आलीये.
प्रार्थना बेहेरे चा अभिनय, दिसण, चित्रपटातील संपूर्ण वावर.... सगळंच अप्रतिम आहे.
मराठी चित्रपट असूनही हिंदी चित्रपट पहिल्याचा फील यावा याची त्यांनी काळजी घेतलेली आहे.

का नाही आवडला:-

माझी आवडती स्वप्नील-मुक्ताची जोडी यात नाही. Wink

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मितवा बघीतला. ठीक वाटला. चकाचक आहे, गाणी चांगली आहेत. तरुणाईला आवडणारे कलाकार ( स्वप्नील, सोनाली आणि प्रार्थना ) आहेत. थियेटर मध्ये तरुण लोक जास्त होते. कथेची मांडणी अजून चांगली झाली असती. चित्रपटाचा धंदा चांगला झालाय असे वाचण्यात आले.

टुकार

<< जसे शाहरूख रावणची खेचतो.. >>

रावण = अभिषेक + ऐश्वर्या
रा-वन = शाहरूख + करिना

शाहरुख कुठल्या चित्रपटाची खेचतो? काय खेचतो? का खेचतो?

त्यांना रा-वन म्हणायचं असावं. म्हणजे त्यांचा शाहरुख किनै इतका स्पोर्टिंग आहे किनै की तो त्याच्या स्वतःच्याच सिनेमाची खेचतो - असं त्यांना म्हणायचंय.

तुम्ही अजुण खिंड लढवताय ? >>> प्रशु, "अजून" असे लिहा. व्याकरणाकरता नव्हे. न चा ण झाला की काय होते ते इथेच दिसत आहे Happy

रा-वन = शाहरूख + करिना
>>

चूक
रा-वन = अर्जुन रामपाल
जी-वन = शाहरूख खान

म्हणजे त्यांचा शाहरुख किनै इतका स्पोर्टिंग आहे किनै की तो त्याच्या स्वतःच्याच सिनेमाची खेचतो - असं त्यांना म्हणायचंय.
>>>

हो, हे ना आमीरला जमत ना सलमानला.. ना अक्षयकुमारला ना अमिताभ बच्चनला..

परवाचा मराठी अ‍ॅवार्ड हॉस्ट करताना स्वप्निल स्वतःच मितवाची खेचत होता >>>
यातच सर्वकाही आले. थोडा उशीरच झाला नै, असो. अप्पाकाका आपल्या पोस्टी वाचूनच त्याच्या लक्षात आलं असेल, 'मितवा' किती टुकार आहे ते. Happy आणि त्याबद्दल स्वतःच फिल्म ची खेचून स्वतःला सेफ ठेवतोय तो.

असं तुम्हाला(च) वाटतं. >>> शाहरूखलाही वाटतं.

चला, तुम्हाला एक(च) आणि एकाची तरी कंपनी आहे Proud

प्रशू Lol

मितवा टुकार आहेच....... यात वादच नाही Happy

शाहरूखचा रा-वन देखील टुकार होता... यातही वादच नाही Happy

पण स्वजोशी आणि शाखान यांचे टुकार चित्रपटही बॉक्स ऑफिसवर बरेपैकी पैसे कमावतात.... यातही वाद नसावाच Happy

पण मला अश्या एकाची कंपनी आहे ज्याचे चाहते करोडो आहेत>>>

अरे चाहत्यांचं काय लोणच घालायचं आहे? सिनेमाच्या दर्जा बद्दल काय?
सलमान पासून ते सनी लिओन, कतरिना, राखी सावंत(शाखा, स्वजो) वर जीव ओवाळणारे भरपूर आहेत आणि त्यांचा अभिनयही सर्वश्रुत आहेच.

सलमान पासून ते सनी लिओन, कतरिना, राखी सावंत(शाखा, स्वजो) वर जीव ओवाळणारे भरपूर आहेत आणि त्यांचा अभिनयही सर्वश्रुत आहेच.

>>>>>>>

एक मूलभूत फरक -

सलमान, सनी लिओन यांचे चाहते मास मध्ये मोडतात..
शाहरूख स्वप्नील यांचे चाहते क्लास मध्ये मोडतात..

Pages