मितवा (सिनेरिव्ह्यू)

Submitted by मी मधुरा on 6 March, 2015 - 01:03

प्रेम हा एक असा विषय आहे, जो चॉकलेट सारखा आहे. कितीही वेळा खाल्लं तरी आपल पोटहि भरत नाही आणि त्या चॉकलेटचा गोडवाहि कमी होत नाही. मितवा हा हि एक असाच चित्रपट. प्रेमात भिजलेला. शिवम सारंग एक मोठ्ठा बिझनेसमन. पण अय्याश, बिघडलेला. जगातल्या सगळ्या मुली आपल्याला पाहिल्यावर आपल्यावर फिदा होतील, असा त्याच्या ओव्हर कॉन्फीडन्स. पण एक मुलगी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करते, आणि तिथे तोच तिच्या प्रेमात पडतो. प्रेम, लग्न, कमीटमेंट यावर त्याचा विश्वासचं नाही. पण प्रेम त्याला कस बदलत, त्याच जीवन कसं बदलत हेच त्यालासुद्धा कळत नाही. आणि त्यावरच हा चित्रपट आहे.

prarthana-behere-swwpanil-joshi-sonalee-mitwa.jpg

अवनीच्या चित्रात प्रार्थना बेहेरेनी असे काही गहिरे रंग भरलेत कि, कदाचित दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्रीला ते जमलं नसत. Hats Off to her!! चित्रपट बघताना, ती या दोघांपुढे नवीन आहे, अस चुकून सुद्धा वाटत नाही.
स्वप्नील बद्दल काय बोलणार? तो तर माझा आवडता हिरो आहे, एका लग्नाची दुसरी गोष्ट पासूनचा ! आणि सोनाली कुलकर्णी सुद्धा चित्रपटात चांगला अभिनय करते.
या चित्रपटातील गाणी खूप आधीपासूनच आपल्या मोबाईलवर रिंगटोनच काम करतात. त्यामुळे गाण्यांची मेलोडी मस्त आहे, हे वेगळ सांगायला नको.
‘दूर – दूर’ नावच sad सॉंग सुद्धा मस्त जमलेलं आहे.

चित्रपट का आवडला:-

सोनाली आणि स्वप्नीलची केमिस्ट्री खूप मस्त जुळून आलीये.
प्रार्थना बेहेरे चा अभिनय, दिसण, चित्रपटातील संपूर्ण वावर.... सगळंच अप्रतिम आहे.
मराठी चित्रपट असूनही हिंदी चित्रपट पहिल्याचा फील यावा याची त्यांनी काळजी घेतलेली आहे.

का नाही आवडला:-

माझी आवडती स्वप्नील-मुक्ताची जोडी यात नाही. Wink

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हाला सिनेमा किंवा अभिनेता आवडला नाही म्हणून त्याला दर्जाच नाही असा अर्थ होत नाही ना. प्रत्येकाला आपापली आवड निवड असते.

म्हाला सिनेमा किंवा अभिनेता आवडला नाही म्हणून त्याला दर्जाच नाही असा अर्थ होत नाही ना. प्रत्येकाला आपापली आवड निवड असते.<< बरोब्बर. आयुष्याने चंद्रचूड सिंग, अंजला झवेरी, अरबाझ् खान, विंदू (सन ऑफ दारासिंग), पृथ्वी (दिल का क्या कसूर फेम), वगैरे लोकांचे फॅन्स दाखवलेले असल्याने हे वाक्य जरा जास्तच पटले. (आमच्याच नशीबत असलं मित्रमंडळ का असं अनेकदा देवाला विचारून झालेलं आहे!!!)

तुम्हाला सिनेमा किंवा अभिनेता आवडला नाही म्हणून त्याला दर्जाच नाही असा अर्थ होत नाही ना. प्रत्येकाला आपापली आवड निवड असते. >> हे एक लाखमोलाचे बोललात! आता जोगिंदर, ग्यानेंद्र चौधरी, हरिनाम सिंह इ. च्या पंख्यांना उजळमाथ्याने वावरता येईल Lol Light 1
बाकी मितवा बरा वाटला. तत्सम मराठी कॉप्यांपेक्षा हा किमान चकाचक आहे, कदाचित म्हणून सहनेबल वाटला.

जोगिंदर तर अफलातून कलाकार आहे. त्याच्यासारखा लोटा ड्यान्स करू शकणारा अभिनेता अजून जन्माला यायचाय.

चंद्रचूड सिंग, अंजला झवेरी, अरबाझ् खान, विंदू (सन ऑफ दारासिंग), पृथ्वी (दिल का क्या कसूर फेम), वगैरे लोकांचे फॅन्स >> Lol

चंद्रचूड सिंग >>>>

हा तर मलाही लहानपणी आवडायचा.. मी मोठा होता होता तो गायबच झाला.
तेरे मेरे सपने चित्रपटात हा मला चक्क अर्शद वारसी पेक्षा जास्त आवडलेला..
अर्शद वारसीबरोबरच आणखी एका किडनॅपिंगच्या चित्रपटातही आवडलेला..
माचिसमध्ये मात्र नव्हता आवडला..

"मितवा सिनेरिव्ह्यु" वरती मितवा सोडून ईतरच विषय सुरू झालेत यातच या सिनेमाचं यशापयश दिसतंय :स्मितः

अच्छा सिला दिया पासुन किशनकुमार आवडणारे, तसेच रंग पासुन कमल सदान्हा आवडणारे ही होतेच आमच्या मिमं मधे Happy

I watched Jan Tere Nam in theatre and didn't sleep for one whole night, thinking about Ronit Roy singing first time dekha tumhe love ho gaya Lol

असेल बहुदा. पण थोडा बारीक व्ह्यायला पाहिजे नाहीतर राम कपूर व्ह्याचा. त्याची अक्टिंग आवडते मला मी सोनी वरील त्याची ती एक मालिका चालू आहे ती कधीतरी च्यानेल सर्फिंग मध्ये बघते.

रोनित रॉय मस्त मॅच्युअर अ‍ॅक्टर झाला आहे आता. टू स्टेट्स आणि अनुराग कश्यपचा 'अग्ली' बघायचा, आजच्या रोनित रॉयसाठी. विशेषतः अग्ली.

पण थोडा बारीक व्ह्यायला पाहिजे नाहीतर राम कपूर व्ह्याचा >> Are you serious ?
Ronit Roy is absolutely fit and fine. not even an inch more, than required.

पण थोडा बारीक व्ह्यायला पाहिजे नाहीतर राम कपूर व्ह्याचा >> कैतरीच.

रोनित रॉय मस्त मॅच्युअर अ‍ॅक्टर झाला आहे आता. टू स्टेट्स आणि अनुराग कश्यपचा 'अग्ली' बघायचा, आजच्या रोनित रॉयसाठी. विशेषतः अग्ली.>>>>>>>>>>>>>+१

पण थोडा बारीक व्ह्यायला पाहिजे नाहीतर राम कपूर व्ह्याचा >> Are you serious ?
Ronit Roy is absolutely fit and fine. not even an inch more, than required.

< yes dam serious!!!
लीड पेक्षा नेगेतीवे मध्ये जास्त आवडतो. Boss मध्ये अक्षयपेक्षा तोच आवडला. इतना करो न प्यार मध्ये तर मस्तच आहे तो.

रोनित रॉय यांची बायकोही प्रसिद्ध दिसतेय,
मी कोण रोनित रॉय हे गूगाळायला गेलो तर टाईप करता करता पाठोपाठ रोनित रॉय वाईफ असेही सजेस्ट झाले.
असो, त्याची बायको कोण हे मी गूगाळत बसलो नाही पण रोनित रॉय कोण ते एकदाचे समजले.. फिट आहेत की.. ये अक्खा इंडिया जाणता है हम तुम पे मरता है वाले हेच ना..

Pages