प्रेम हा एक असा विषय आहे, जो चॉकलेट सारखा आहे. कितीही वेळा खाल्लं तरी आपल पोटहि भरत नाही आणि त्या चॉकलेटचा गोडवाहि कमी होत नाही. मितवा हा हि एक असाच चित्रपट. प्रेमात भिजलेला. शिवम सारंग एक मोठ्ठा बिझनेसमन. पण अय्याश, बिघडलेला. जगातल्या सगळ्या मुली आपल्याला पाहिल्यावर आपल्यावर फिदा होतील, असा त्याच्या ओव्हर कॉन्फीडन्स. पण एक मुलगी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करते, आणि तिथे तोच तिच्या प्रेमात पडतो. प्रेम, लग्न, कमीटमेंट यावर त्याचा विश्वासचं नाही. पण प्रेम त्याला कस बदलत, त्याच जीवन कसं बदलत हेच त्यालासुद्धा कळत नाही. आणि त्यावरच हा चित्रपट आहे.
अवनीच्या चित्रात प्रार्थना बेहेरेनी असे काही गहिरे रंग भरलेत कि, कदाचित दुसऱ्या कुठल्याही अभिनेत्रीला ते जमलं नसत. Hats Off to her!! चित्रपट बघताना, ती या दोघांपुढे नवीन आहे, अस चुकून सुद्धा वाटत नाही.
स्वप्नील बद्दल काय बोलणार? तो तर माझा आवडता हिरो आहे, एका लग्नाची दुसरी गोष्ट पासूनचा ! आणि सोनाली कुलकर्णी सुद्धा चित्रपटात चांगला अभिनय करते.
या चित्रपटातील गाणी खूप आधीपासूनच आपल्या मोबाईलवर रिंगटोनच काम करतात. त्यामुळे गाण्यांची मेलोडी मस्त आहे, हे वेगळ सांगायला नको.
‘दूर – दूर’ नावच sad सॉंग सुद्धा मस्त जमलेलं आहे.
चित्रपट का आवडला:-
सोनाली आणि स्वप्नीलची केमिस्ट्री खूप मस्त जुळून आलीये.
प्रार्थना बेहेरे चा अभिनय, दिसण, चित्रपटातील संपूर्ण वावर.... सगळंच अप्रतिम आहे.
मराठी चित्रपट असूनही हिंदी चित्रपट पहिल्याचा फील यावा याची त्यांनी काळजी घेतलेली आहे.
का नाही आवडला:-
माझी आवडती स्वप्नील-मुक्ताची जोडी यात नाही.
vijaykulkarni ते विनोदाने
vijaykulkarni
ते विनोदाने लिहीले होते हो
अवांतरः मी पण इग्रजी माध्यमातूनच शिकलोय. मराठीची आवड असली की सगळं जमतंय बघा.
दुनियादारी सिरिअल आलेली ती
दुनियादारी सिरिअल आलेली ती सिरिअल सुशींना आवडली नव्हती ना? मला कुठेतरी (की पुस्तकातच) वाचल्यासारखे वाटते आहे. हा पिक्चर त्यांनी बघितला नाही हेच बरे..
बस्के +१. पण या बाफवर
बस्के +१. पण या बाफवर दुनियादारी ची चर्चा केली तर मधुरा रागावतील. तेव्हा हवं तर आपण दुनियादारी बाफ रिओपन करूया.
मितवाची पोस्टर्स पाहूनच पिक्चर पाहायची इच्छा झाली नाही. शिवाय नुक्ताच प्यारवाली लव्हस्टोरी ने दिलेला दणका लक्षात होता. आता स्वप्नीलचा थेट MPM 2 च बघण्यात येईल. तो ही राजवाड्यांसाठी.
हे खटकले. >>> काय राव विकु,
हे खटकले. >>> काय राव विकु, फॅन्स च्या मोकळ्या चर्चेत अशी खमंग वाक्ये नसतील तर काय मजा. एवढे सिरीयसली कशाला घ्यायचे? सगळी चर्चा केवळ पॉलिटिकली करेक्ट्च असावी का? त्यात परत तो सल्ला असाही नाही की वाचून कोणीतरी गैरसमज करून घेउन खरोखरच तसे करायला जातील आणि त्यात काही धोका आहे
मला दुनियादारी घरी आरामात डीव्हीडीवर बघायला टाईमपास वाटला होता. अंकुश चौधरी चे काम मस्त होते. कोणीही तरूण बिरूण फार दिसले नाहीत (पण अ.चौ चालून जाईल एवढा वाटला होता). कामे सर्वांचीच बरी वाटली होती. मलाही पुस्तकाची बॅकग्राउण्ड नव्हतीच.
गाणी ऐकायला छान आहेत पण
गाणी ऐकायला छान आहेत पण लिरिक्स मध्ये एक भयंकर चूक आहे. "तु ही रे माझा मितवा" हे खरे तर "तूच रे माझा मितवा" असे हवे. हिंदीचा प्रभाव, दुसरे काय?."तू ही" या शब्दाचे हिंदी आणी मराठी अर्थ एकदम विरुद्ध आहेत.
अहो विकु, आहात कुठे? हल्ली
अहो विकु, आहात कुठे? हल्ली पूर्ण गाणं हिंदीत असतं मराठी पिक्चर्स मधे. आणि तुम्हाला एक 'ही' खटकावा?
तु ही रे माझा मितवा >>> हो ते
तु ही रे माझा मितवा >>> हो ते मी ऐकले तेव्हा मलाही तेच वाटले होते
पण विकु एकूण खटकणे मोड मधे दिसत आहेत आज
अप्पाकाका विनोद पोचला .. पण
अप्पाकाका विनोद पोचला .. पण वाचनाची आवड आणि मराठीचा किंवा मराठी भाषेचा अभिमान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर कोण्या मराठी वाचनप्रेमी माणसाला सुशि ए टू झेड माहीत असतील पण तोच मराठी माणूस जर दुसर्या मराठी माणसाशी बोलताना ईंग्लिशमध्ये वा ईंग्लिश शब्दांची उधळण करत बोलत असेन, आणि याचे त्याला काहीच वाटत नसेल तर मग मला एखाद्या नामवंत मराठी लेखकाबद्दल माहीत नसणे याचे फारसे मनाला लाउन घ्यायची गरज नाही. हे बस्स नावडत्या विषयातील अज्ञान झाले.
इथेही जेव्हा इतर मराठी माणसे एका लोकप्रिय मराठी चित्रपटाला आणि एका लोकप्रिय मराठी अभिनेत्याला नावे ठेवत आहेत तेव्हा हा मराठी माणूस ऋन्मेष त्याच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत पोस्टा टाकत राहील याची खात्री बाळगा.
ओह अप्पाने ऋन्मेष ला उद्देशून
ओह अप्पाने ऋन्मेष ला उद्देशून लिहीले आहे हे माहीत नव्हते :). मला वाटले जनरल लिहीले आहे.
तेव्हा हा मराठी माणूस ऋन्मेष त्याच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत पोस्टा टाकत राहील याची खात्री बाळगा. >>> :). हे वाक्य दीवार मधल्या शशीच्या 'जबेक मुजरिम बोलेगा...' आवाजात वाचावे.
पण वाचनाची आवड आणि मराठीचा किंवा मराठी भाषेचा अभिमान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. >>> सहमत.
तु ही रे माझा मितवा मला पण
तु ही रे माझा मितवा मला पण खटकलंच.
अख्खि ओळ हिंदी करायची. चमचम करता है ये नशिला बदन.. केलं होतंच की हिंदी.
हे ही घेतलं असतं चालवून. हाकानाका
मी पहिले दुनियादारी चित्र्पट
मी पहिले दुनियादारी चित्र्पट पाहिला मग पुस्तक विकत घेउन वाचले तरीही पुस्तकच टेरिफिक आहे. त्यातील मूळ शोकांतिका चित्रपटात आलेलीच नाही असेच फील येते. मी हे सत्तरच्या दशकात कॉलेजात असलेले तरूण तरुणी पाहिले आहेत. त्यांची मानसिकता पर्फेक्ट उतरली आहे पुस्तकात . शे व्टची पाने तर वाचवत नाहित इतकी
शोकात्म आहेत.
ऋन्मेऽऽष, मराठी चित्रपट
ऋन्मेऽऽष,
मराठी चित्रपट हिंदी ब्लॉकबस्टरसारखे एकाच आठवड्यात एकाच वेळी हजारो स्क्रीनवर लागून लोकांना तो सिनेमा बंडल आहे हे समजायच्या आधीच फक्त स्टारकास्टच्या नावावर शंभर करोड क्लब नाही गाठू शकत.
मराठी चित्रपटाला कमाई करायला काही आठवडे चालावा लागतो, त्यात तो कसा आहे हे माऊथ पब्लिसिटीने सर्वांनाच समजते. जर लोकांना आवडण्यासारखा असेल तरच तो चालतो आणि कमाई करतो. >>>>>>
गुड, तर मराठी चित्रपटसृष्टीचा उगवता सुप्परस्टार - स्वप्निल जोशी नाही हे यावरून सिद्ध झाले
जर तो असता तर त्याच्याही फक्त नावावर, without माऊथ पब्लिसिटी चित्रपटाने विक्रमी कमाई केली असती ना.
खूप वर्षात तरुणाई वर बेस्ड असा चित्रपट मराठी मध्ये आला नव्हता, की जो एकाचवेळी जीवनाच्या इतक्या पैलूंवर भाष्य करेल >>>>> यात sarcasam आहे.
Prashu
Prashu
यात sarcasam आहे. >> ओके जर
यात sarcasam आहे. >> ओके
जर तो असता तर त्याच्याही फक्त नावावर, without माऊथ पब्लिसिटी चित्रपटाने विक्रमी कमाई केली असती ना. >>> एक्झॅक्टली, आज नाही, पण येत्या काळात होण्याची क्षमता बाळगून आहे, लक्षणे दाखवतोय, (जसे हा चित्रपट स्वप्नीलचा नसता तर अनुल्लेखानेच मेला असता) म्हणून तर त्याला सुपर्रस्टार न म्हणता मी उगवता सुपर्रस्टार असे घोषित केलेय. आणि ते देखील भारतीय चित्रपटसृष्टीचा नाही तर मराठी चित्रपटसृष्टीचा. कारण स्टारडम आणि व्यावसायिकतेबाबत आपल्याला हिंदी चित्रपटसृष्टीच्या तोडीस जायला खूप मजल मारायची आहे. तुर्तास स्वप्निलची तुलना शाहरूखबरोबर होणे तसेच त्याच्या चित्रपटांची तुलना सलमानच्या चित्रपटांसोबत होणे हे ही नसे थोडके
पण येत्या काळात होण्याची
पण येत्या काळात होण्याची क्षमता बाळगून आहे, लक्षणे दाखवतोय >>> अरे अजुन किती सहन करायचे त्याला, संपली की त्याची कारकीर्द आता
उगवता सुपर्रस्टार >>>> चरित्रात्मक भूमिका करणारा ना?
तुर्तास स्वप्निलची तुलना शाहरूखबरोबर होणे तसेच त्याच्या चित्रपटांची तुलना सलमानच्या चित्रपटांसोबत होणे हे ही नसे थोडके>>>> होऊन जाऊदे, हवे तर त्या category मध्ये अजय देवगण, अक्षय कुमार, सैफ अली खान, सुनील शेट्टी यांनाही सामील करून घ्या.
तेव्हा हा मराठी माणूस ऋन्मेष
तेव्हा हा मराठी माणूस ऋन्मेष त्याच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत पोस्टा टाकत राहील याची खात्री बाळगा. >>
ऋन्मेष,
दिवसेंदिवस मी तुझी पंखा होत चाललेय रे. सगळेजण तुझ्याविरुद्ध उभे राहिले तरी तु मात्र पळुन न जाता नेटाने लढतच राहतोस. (कृपया शब्दशः अर्थ घेऊ नये - इतरांसाठी)
मराठी चित्रपटसृष्टीचा उगवता सुप्परस्टार - स्वप्निल जोशी हे जरी पटत नसले तरी स्वप्निल एलदुगो आणि मुंपुमुं मधे आवडलाय.
आणि दुनियादारीही आवडलाय. मुळात त्यातील पात्रांना मी कॉलेजवयीन दिसत असतील असे गृहीत धरलेच नव्हते.
पण मितवा नाही आवडला कारण स्वप्निलचे शा.खाला कॉपी करणे आणि सोकुचा भयंकर वावर.
निल्सन.. थॅण्क्यू मुळात
निल्सन.. थॅण्क्यू
मुळात त्यातील पात्रांना मी कॉलेजवयीन दिसत असतील असे गृहीत धरलेच नव्हते. >>>>
एक हा वयाचा मुदद्दा, कॉलेजवयीन न दिसणे वगैरे आणि दुसरा तो पुस्तकाचा मुद्दा, मूळ पुस्तकाची सर नाही, त्यात वेगळेच होते यात ते काहीच नाही वगैरे.. हे दोन मुद्दे मायबोली किंवा तत्सम मराठी संकेतस्थळांवरच उगम पावलेत आणि इथेचे चवीने चर्चिले जातात.. माझे मायबोलीबाहेरचे एक मुंबई़कर म्हणून मुंबईकर प्रेक्षकांचे अनुभव बरेच काही वेगळे बोलतात. कोणाच्याही डोक्यात वयाचा मुद्दा येत नाही किंवा चित्रपट बघताना पुस्तकाबदल खरेच किती जणांना ठाऊक असते वा केवळ जनरल नॉलेज म्हणून ठाऊक असते हा संशोधानाचाच मुद्दा ठरेल.
अर्थात हे मुद्दे चुकीचेच आहेत असे मला नाही म्हणायचे., पण हे मुद्दे बहुतांश प्रेक्षकांसाठी मॅटर करत नाहीत असे जरूर म्हणेन.. आणि म्हणूनच या मुद्द्यांमध्ये तथ्य आहे असे मानले तरीही चित्रपट सुपर्रहिट झाला आहे
अरे किती तो कीस पाडता त्या
अरे किती तो कीस पाडता त्या दुनियादारीचा?
दुनियादारी, मितवा वगैरे चित्रपट आवडणार्यांचा पण एक गट असु शकतो.... मास आणि क्लास मध्ये फरक असायचाच!
मास आणि क्लास मध्ये फरक
मास आणि क्लास मध्ये फरक असायचाच! >> स्वरुप
मास आणि क्लास मध्ये फरक
मास आणि क्लास मध्ये फरक असायचाच! >> स्वरुप +१
तरीही पुस्तकच टेरिफिक आहे.
तरीही पुस्तकच टेरिफिक आहे. त्यातील मूळ शोकांतिका चित्रपटात आलेलीच नाही असेच फील येते>>> +१००००००१
प्रशू | 13 March, 2015 -
प्रशू | 13 March, 2015 - 11:53
सहमतच सहमतच सहमतच
पण इथे काहुन दुनियादारी??? ओहो सुपर्र्स्टार चा पिच्चर म्हणुन का?
स्मिते, ऋन्मेष जिथे असेल तिथे
स्मिते, ऋन्मेष जिथे असेल तिथे कधीही कुठलाही विषय येऊ शकतो हे तुला माहीत नाही?
हो ग हो
हो ग हो
<< अमुकतमुक मोड ऑन >> त्याची
<< अमुकतमुक मोड ऑन >>
त्याची चर्चा आता इथे नको. वाटल्यास नंतर नवीन बाफ काढू.
<< अमुकतमुक मोड ऑफ >>
स्मिते, ऋन्मेष जिथे असेल तिथे
स्मिते, ऋन्मेष जिथे असेल तिथे कधीही कुठलाही विषय येऊ शकतो हे तुला माहीत नाही?
>>>>
एक ऋन्मेष गरीब बिचारा भेटला तर त्याच्यावर बिल फाडू नका
वर कोणीतरी दुनियादारीला भंपक म्हणत त्याचा विषय इथे काढला आणि मी माझे कर्तव्य म्हणून मग चर्चेत उतरलो.
मास आणि क्लास मध्ये फरक
मास आणि क्लास मध्ये फरक असायचाच!
>>>>>
क्लास मध्येही फर्स्टक्लास पासून पासक्लास पर्यंत सारे येते.
इथे रेल्वेची किंवा शाळा
इथे रेल्वेची किंवा शाळा कॉलेजच्या निकालाच्या क्लासची चर्चा नाही चाललेली. And I guess you very well know it.
सॉरी रे
सॉरी रे
तुम्हाला सिनेमा किंवा अभिनेता
तुम्हाला सिनेमा किंवा अभिनेता आवडला नाही म्हणून त्याला दर्जाच नाही असा अर्थ होत नाही ना. प्रत्येकाला आपापली आवड निवड असते.
Pages