सचिन ,ममा , विश्वास दादा ,मोहम्मद दादा सर्वांची व्यक्तिरेखा रेखाटून झाली. एका व्यक्तीची राहिली होती. तिची व्यक्तिरेखा रेखाटणं म्हणजे माझ्यासारख्या धसमुसळ्या मुलीने पट्टीशिवाय सरळ रेषा आखणं ! साक्षात ब्रह्मदेवालाही जी गोष्ट शक्य नाही ,ती मी करण्याचं धाडस करते आहे. आमची शोभाताई . श्रवणयंत्राला कुलूप लावून अखंडपणे वाक् यंत्र चालू ठेवणारी ,क्षणात हसून क्षणात गंभीर होणारी , आपल्या हट्टपणाने सर्वांचं पित्त असंतुलित करणारी मात्र तरीही आम्हा सर्वांच्या हृदयाची अधिकारिणी असलेली अशी ही ताई. काळेभोर टपोरे दाक्षिणी ललनेसारखे डोळे तिने ज्याच्यावर रोखले ,त्याच्या पापाची रांजणे भरलीच समजा .
माझे बाबा म्हणजे माझे आजोबा . श्री . आनंद देसाई , नावाप्रमाणेच आनंदी . यांच्याकडे बघून कोणाला सुधीर जोशींचा 'आनंदी आनंद गडे ' हा नाच आठवला नाही तरच नवल ! ऐन तारुण्यातच कॉर्पोरेट विश्वाचा उंबरठा ओलांडल्यामुळे ३ रुपये ५० पैशाचं केळं ५० रुपयाला विकण्याचीही ताकद त्यांच्या अंगी आहे .मानेमागून डोकावणारी पांढरी शुभ्र केस जणू या अंगीकृत गुणांचं आ,णि अनुभवांचं दर्शनच घडवीत असतात. कोणतंही स्थळ ,काळ आणि विषयाचे बंधन नसलेले माझे बाबा जगातल्या कोणत्याही विषयावर कितीही वेळ बोलू शकतात . आजची युवा पिढी google वरून ज्ञान डाउनलोड करून ते आपल्या मेंदूत अपलोड करते. मात्र बाबा यापैकी काहीच करत नाहीत.
ती येते
अगदी आपसूक
कधीही, कुठेही
न सांगता ....
ती आल्याशिवाय राहत नाही
ती वेळ काळ पाहत नाही
कितीही प्रयत्न करूनही
ती टाळता काही येत नाही
घड्याळाच्या काट्याला तर
ती जरासुद्धा घाबरत नाही
कधीच एकटंराहू देत नाही
दूर तिच्यापासून जाऊच देत नाही
वाट्टेल तेव्हा येऊन जाते
जे द्यायचं ते देऊन जाते
घेता घेता आपल्याला
आपलसं हि करून घेते
स्वीकारलं कि बांधून ठेवते
धिक्कारल्यावर हरवून जाते
हसवून जाते गालातल्या गालात
कधी डोळ्यातून वाहून जाते
© अनुप साळगांवकर - दादर
नमस्कार मित्रांनो,
मी शिवम काटे, थोडेच दिवस झाले मला मायबोली वर येऊन. असाच नेट वर surfing करत असताना मायबोली वर आगमन झाले आणि लव्ह at फर्स्ट साईट काय असते हे मला त्या दिवशी कळले.