तू
तू सूर अभंगाचा
मी ताण विणेची
तू गाथा तुकोबांची
मी गीता कृष्णाची
तू थाप डफावरची
मी तार तुनतुन्याची
तू पटका शाहिरीचा
मी डौल फेट्याचा
तू ललकारी तुतारीची
मी हालगी कडकडणारी
तू मर्द मराठी मावळा
मी ज्योत क्रांतीची
जय जिजाऊ!जय शिवराय! जय महाराष्ट्र!
राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
१८/०१/२०१८
भेट तुझी स्मरते...
काय...
कुठं काय..
मग पुन्हा मीच, कायतर..
पुन्हा तूच ,कुठं कायतर...
बोलायला काहीच
न गवसलेल्या
कित्येक भेटी आपल्या
आणि मग
तिथून निघून आलं
की हे राहील सांगायच
ते राहील करित
तासतासभार फोन चालूच
फोन ठेवताना
तू म्हणतोस
बाकीच भेटल्यावर बोलू
मग भेटल्यावर
मी काय
आणि तू पुन्हा
कुठं काय ...
राजश्री शिवाजीराव जाधव-पाटील
०४/०५/२०१८
पश्चिम -पुर्व वाहत जाणारी एक नदी असते .नदी च्या दोन्ही काठावर एक -एक झाडं असते . उत्तर दिशेत निंबाचे झाडं असते तर दक्षिण दिशेत पेरूचं झाडं असते ह्या दोन्ही झाडांवर पोपट बसलेले असतात . निंबाच्या झाडांवरचे पोपट पेरू च्या झाडांवरच्यां पोपटांना म्हणतात की तुमच्यातला एक पोपट आम्हला द्या म्हणजे आमची संख्या तुमच्या पेक्षा दुप्पट होईल तर पेरू च्या झाडांवरचे पोपट म्हणतात की तुमच्यातला एक पोपट आम्हाला द्या आपल्या दोन्ही कळपांची संख्या एक समान होईल.तर एकुण पोपट किती?
नमस्कार मित्रांनो,
मी शिवम काटे, थोडेच दिवस झाले मला मायबोली वर येऊन. असाच नेट वर surfing करत असताना मायबोली वर आगमन झाले आणि लव्ह at फर्स्ट साईट काय असते हे मला त्या दिवशी कळले.