आठवण
Submitted by SharmilaR on 3 September, 2021 - 06:02
ती येते
अगदी आपसूक
कधीही, कुठेही
न सांगता ....
ती आल्याशिवाय राहत नाही
ती वेळ काळ पाहत नाही
कितीही प्रयत्न करूनही
ती टाळता काही येत नाही
घड्याळाच्या काट्याला तर
ती जरासुद्धा घाबरत नाही
कधीच एकटंराहू देत नाही
दूर तिच्यापासून जाऊच देत नाही
वाट्टेल तेव्हा येऊन जाते
जे द्यायचं ते देऊन जाते
घेता घेता आपल्याला
आपलसं हि करून घेते
स्वीकारलं कि बांधून ठेवते
धिक्कारल्यावर हरवून जाते
हसवून जाते गालातल्या गालात
कधी डोळ्यातून वाहून जाते
© अनुप साळगांवकर - दादर