लेखनसुविधा

नव्या युगाची पहाट

Submitted by राजेंद्र देवी on 20 July, 2019 - 12:20

नव्या युगाची पहाट

आल्हाददायक तुझे आगमन
दिनकरा, जसे आमचे बालपण

तळपत असते माध्यान्य
भास्करा, जसे आमचे तरुणपण

मलूल असते संध्याकाळ
दिवाकरा, जसे आमचे म्हातारपण

कापून टाक या किरणांनी
मरिचया, संसाराचे हे मायाजाल

घे कवेत मला हे अग्निरुप
हिरण्यगर्भा, कर पापांचा नायनाट

करून टाक भस्म हा नश्वर देह
अदित्या, उगवू दे नव्या युगाची पहाट

राजेंद्र देवी

ओबडधोबड कविता

Submitted by परत चक्रम माणूस on 19 July, 2019 - 09:00

मला नाही गर्व तरी आहे अभिमान
वंद्य मज धर्म हिंदू गातो मी गुणगान
जात माझी मराठा नाही तिचा ताठा
सर्वांना सोबत घेत झालो मी मोठा
रामदास शिवरायांना देतो मी मान
मिळवून सर्वां वाढवू राष्ट्राची शान
कुणी नाही थोर नाही कुणी सान
हिंदू धर्मात असावे सर्व एकसमान
भेदभाव मिटवून सारे या करू एकी
मनभेद अंतरातले गाडू ना करू बेकी
हिंदू म्हणून घ्यावया वाटेल तेव्हा गर्व
प्रेमानं वागतील जेव्हा एकमेकांशी सर्व

तिचा पुरस्कार

Submitted by प्रतिक सोमवंशी on 17 June, 2019 - 02:51

सभागृहाच्या भिंतींना कापरे भरतील एवढ्या टाळ्यांच्या कडकडाट आज ज्ञानपीठ जाहीर झाला. सभागृह गच्च भरलय, पुढे vip लोकांच्या रांगा, त्यांच्या मागे बसलेली रसिक मंडळी, या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बनायला शेकडोंच्या संख्येने भरलीय. त्या पुढच्या रांगेतून उठून एका व्यक्तीची सगळ्यांना प्रतिसाद देत हळू हळू व्यासपीठाकडे जाणारी पाठमोरी आकृती मला अंधुकशी दिसतेय. हो...तिला मिळालाय ज्ञानपीठ!

विषण्ण संध्या

Submitted by प्रतिक सोमवंशी on 12 June, 2019 - 13:45

होते रात्र अधाशी, सांजही हुलकावण्या देते
औदुंबराला पाठ लावून, पणतीही जीव तोडते

एक आर्त साद येते, दुर क्षितीजापल्याडून मिनमिनतो राऊळातला दिवा, जीव मुठीत धरून

एक घास रात्रीचा घेताना, घश्यात काटा रुततो
या किर्रर्र काळोखात, एक उपाशी पिंगळा दिसतो

आकळेच न मजला, किती आहेत शून्य सोबती
का बोथट जाणिवांचे, शल्य खुपते हृदयामंधी

या विषण्ण संध्यासमयी, कुठे आसरा मिळतो
अन जीर्ण घरट्यापाई, एकटाच पारवा रडतो
©प्रतिक सोमवंशी

जगायला शिका

Submitted by Asu on 31 May, 2019 - 00:37

जगायला शिका

बोलायला शिका
तुम्ही जगायला शिका

भ्याडासारखे दगडावानी
बसायला नका
तुम्ही उठायला शिका
ओव्या गा, शिव्या द्या
तोंड उघडायला शिका तुम्ही
बोलायला शिका
तुम्ही जगायला शिका

मेल्यागत चितेवर
धग सहायला नका
तुम्ही धग द्यायला शिका
पलिता घेवून चितेचा
पेटवायला शिका तुम्ही
बोलायला शिका
तुम्ही जगायला शिका

शब्दखुणा: 

रोमँटिक :- ती आवडते मला

Submitted by प्रतिक सोमवंशी on 17 May, 2019 - 00:27

ती , हो आवडते मला, का प्रेम करतो म्हणून?
नाही हो
आधी आवडली म्हणून तर प्रेम झाला ना
का आवडते ती मला, कारण अनेक आहेत, actually रोज ती नवे कारण देते मला तिच्या प्रेमात नव्याने पडायला
ती आवडते मला सुंदर दिसते म्हणूनच नाही पण मनाने खूपच सुंदर आहे म्हणूनही
ती आवडते मला माझ्यावर प्रेम करते म्हणूनच नाही पण माझी खूपच काळजी करते म्हणूनही
ती आवडते मला लहान मुलीसारखी वागते म्हणूनच नाही पण खूपच maturity दाखवते कधी कधी म्हणूनही
ती आवडते मला लेखणीशी संवाद करते म्हणूनच नाही पण माझ्यावर कविता करते म्हणूनही

ही शुड डाय! - चालवा डोकं!

Submitted by अज्ञातवासी on 4 May, 2019 - 04:59

"ब्रो, नवीन हँडसेट घेतलाय."
"कोणता रे?"
"स्टार्क २१९."
"व्वा!"
"येस, चार्ज इन ५ सेकंडस, ७ इंच फुल स्क्रीन, सोलर पावर, 8g, अँड बेस्ट फिचर, सुपर AI चिपसेट."
"व्हॉट!"
"येस, सुपर AI, वेट, चल फोटोज क्लिक करू."
"ओके."
"बघ फोटो."
"ओ माय गॉड, क्लब च्या अंधारात सनलाईट सारखा प्रकाश टाकलाय याने फोटोत."
"हेच तर मर्म आहे ब्रो, ही नो अवर मूड, अँड इट्स लाईट नाऊ... हीही!!!"
"ब्रो सॉरी पण, मागच्या महिन्यात आपली भांडण झाली, आपली फाईट झाली, आय एम रियली अशेम्ड!"
"इट्स ओके मॅन, तशीही तुझी गर्लफ्रेंड आवडली नाही मला, ही ही!"

Pages

Subscribe to RSS - लेखनसुविधा