आम्ही चार भावंडे मी, गण्या, विण्या,आणि पप्या, पंधरा सोळा वर्ष्याची असू तेंव्हाचा हा प्रसंग. तेंव्हा मस्त पाऊस पडायचा, गावाकडचे डोंगर हिरवा शालू नेसून पाहुण्यांच्या स्वागताला सज्ज असायचे. आमच गाव तस डोंगरांच्या मधोमध वसलेले, एक नदी गावाला वळसा घालून पुढे जायची, तिला बारमाही पाणी असायच. त्यामुळे दुष्काळ वगैरे काय भानगड असते आम्हाला ठाऊकच नव्हतं. डोंगरावरून वाहणाऱ्या ओढ्यांवरून उड्या मारत मारत शाळा गाठायचो, चिखलाने माखलेल्या चपला शाळेच्या प्रांगणात सोडून एकदा वर्गात बसल की थेट संध्याकाळीच घरी, तशी शाळा मात्र दुपारीच सुटायची पण मित्रांसोबत इकडे तिकडे भटकत फिरायचो.
सभागृहाच्या भिंतींना कापरे भरतील एवढ्या टाळ्यांच्या कडकडाट आज ज्ञानपीठ जाहीर झाला. सभागृह गच्च भरलय, पुढे vip लोकांच्या रांगा, त्यांच्या मागे बसलेली रसिक मंडळी, या सुवर्णक्षणाचे साक्षीदार बनायला शेकडोंच्या संख्येने भरलीय. त्या पुढच्या रांगेतून उठून एका व्यक्तीची सगळ्यांना प्रतिसाद देत हळू हळू व्यासपीठाकडे जाणारी पाठमोरी आकृती मला अंधुकशी दिसतेय. हो...तिला मिळालाय ज्ञानपीठ!
विजयी पताका घेऊन रणांगणावर धावणाऱ्या कर्णा, तुला वाटल होत का रे तूच तयार केलेल्या रक्ताच्या चिखलात म्लान होऊन तीच धरती, जिने आजवर तुझा दिग्विजय पाहिला, हो तीच तुझ्या रथाच चाक जागेवर गिळंकृत करेल? तू अतोनात प्रयत्न करशील पण तुझ्या बाहुत असलेल सगळ सामर्थ्य पणाला लावून देखील ते चाक निघणार नाही? तुला वाटल होत कारे जेंव्हा समोर साक्षात मृत्यू उभा असताना तू इतक्या कसोशीने मिळवलेली विद्या तुला दगा देईल? या शाप अभिशापाच्या खेळात तू फक्त एक कवडी बनून जाशील?