शब्दालय

स्वतःशीच बोलायचे राहून गेले ...

Submitted by प्रतिक सोमवंशी on 21 June, 2019 - 09:52

खूप कमवली धन दौलत
खूप कमवली नाती
खूप जपली माणस आपली
खूप जपल्या आठवणी
खूप मिळाले मित्र नवे
खूप जण साथ सोडून गेले
खूप जगलो सुखात आयुष्य
खूप दुःखही सहन केले
खूप हसलो सुखात
खूप दुःखात रडूनही झाले
पण
पण
या सर्वांशी करार करताना
स्वतःशीच बोलायचे राहून गेले ...
©प्रतिक सोमवंशी

कर्णा ssss!

Submitted by प्रतिक सोमवंशी on 16 June, 2019 - 10:37

विजयी पताका घेऊन रणांगणावर धावणाऱ्या कर्णा, तुला वाटल होत का रे तूच तयार केलेल्या रक्ताच्या चिखलात म्लान होऊन तीच धरती, जिने आजवर तुझा दिग्विजय पाहिला, हो तीच तुझ्या रथाच चाक जागेवर गिळंकृत करेल? तू अतोनात प्रयत्न करशील पण तुझ्या बाहुत असलेल सगळ सामर्थ्य पणाला लावून देखील ते चाक निघणार नाही? तुला वाटल होत कारे जेंव्हा समोर साक्षात मृत्यू उभा असताना तू इतक्या कसोशीने मिळवलेली विद्या तुला दगा देईल? या शाप अभिशापाच्या खेळात तू फक्त एक कवडी बनून जाशील?

रोमँटिक :- नजारे हम क्या देखे

Submitted by प्रतिक सोमवंशी on 7 June, 2019 - 13:18

सुधीररराव खिडकीत वृत्तपत्र वाचत बसले होते. समोर टेबलावर वाफाळत्या चहाचा कप थंड होत होता. खिडकीबाहेर पावसाला उधाण आलेल. रेडिओवरील किशोर कुमारांच्या मधुर आवाजात आणखी एका आवाजाची भर पडली. “अहो ऐकता का ss, आपल घर गळतय, तुम्हाला दरवर्षी सांगत असते, एकदाचा गच्चीला गिलावा करून घ्या...पण तुमच आपल बाई, कश्या कश्यात लक्ष नसत.” वृत्तपत्र वाचण्यात मग्न झालेल्या 'सुधी'च्या कानावर जेंव्हा जयश्री बाईंचे पस्तीस पावसाळे एकासुरात बरसले तेंव्हा सुधीला भान आल.

सारेच तारे

Submitted by प्रतिक सोमवंशी on 2 June, 2019 - 08:46

ढिगाने पडलेत ग तारे, रोज ढिगाने वाढतातही म्हणे
पण त्या ढिगात, तू बरोबर बोट करून कस मलाच ओळ्खतेस नेहमी?
बहुदा जास्त चमकत असेल ना मी
की तुझ्या डोळ्यातील आसवे मला पाहून जास्त चमकतात?
इथे एक एक जण खर्ची पडतो
तेंव्हा बहुदा एका ताऱ्याचा जन्म होतो नाही!
की तुम्ही लोकांनीच ही अंधश्रद्धा पाळलीय मनात

मी सांगतोय, मी नाहीय तो तारा
मी काय कुणीच नाहीय कोणता तारा

Subscribe to RSS - शब्दालय