विरह कविता

सारेच तारे

Submitted by प्रतिक सोमवंशी on 2 June, 2019 - 08:46

ढिगाने पडलेत ग तारे, रोज ढिगाने वाढतातही म्हणे
पण त्या ढिगात, तू बरोबर बोट करून कस मलाच ओळ्खतेस नेहमी?
बहुदा जास्त चमकत असेल ना मी
की तुझ्या डोळ्यातील आसवे मला पाहून जास्त चमकतात?
इथे एक एक जण खर्ची पडतो
तेंव्हा बहुदा एका ताऱ्याचा जन्म होतो नाही!
की तुम्ही लोकांनीच ही अंधश्रद्धा पाळलीय मनात

मी सांगतोय, मी नाहीय तो तारा
मी काय कुणीच नाहीय कोणता तारा

सुटले कधी हात...

Submitted by रोहितगद्रे१ on 26 June, 2013 - 02:17

सुटले कधी हात कळलेच नाही
जडले कधी पाश कळलेच नाही

आवरून स्वत:ला तुझे निघणे जहाले
चालणे तुझे ते मी सावरावे म्हणाले

मोहरावे जसे झाड तो तुझा थाट होता
फुले वेचायला ती पण फुलोरा न होता

किती माळल्या त्या स्वप्नील माळा
तुटती तयांच्या त्या मलूल कळ्या

वळणावरी क्षण थांबशील का तू
चोरटा पहारा आज देशील का तू

वळली होतीस तू मी वळलोच नाही
तुटता तुझे पाश उरलोच नाही

होतो जिथे मी तिथे आज आहे
नसण्याची तुझ्या गं मला साथ आहे

राहिलो उभा मी असा मी तुझाच
दिसते येणे तुझे सांगे पारवा उगाच…

दोन क्षण...

Submitted by योगेश र. पवार on 13 May, 2013 - 02:04

!!!.....दोन क्षण दुखचे.....!!!

कधी विरहाचे
कधी प्रेमाचे
वाहुन गेलेल्या आसवांच्या प्रवाहाचे
दोन क्षण दुखचे.....

कधी दिवसाच्या स्वप्नाचे
कधी रात्रीच्या जगन्याचे
पाहीलेल्या त्या तुटलेल्या घराचे
दोन क्षण दुखचे.....

कधी वेड्या संसाराचे
कधी जपलेल्या नात्याचे
सोडुन गेलेल्या तिच्या आठवणींचे
दोन क्षण दुखचे.....

कधी परतीच्या वाटेचे
कधी समुद्राच्या लाटेचे
ओंजलीतल्या त्या ओल्या आसवांचे
दोन क्षण दुखचे.....

--- योगेश र. पवार ( yp )

शब्दखुणा: 

विरह - तान्हूल्याचा

Submitted by देवू on 22 February, 2013 - 06:56

कंठ दाटून आला,
मन ही माझे भरुन आले,
पाऊले माझी जड झाली,
विरहाची ती.... वेळ जवळ आली

हुंकारानी एका तुझ्या
हॄद्याला माझ्या हात घातला
"नको जाऊ तू आई अशी लांब
तान्हुलगं मी तुझं.... तुझाच सहवास बघं हवा मला"

माझ्या डोळ्यांनी तुझ्यासाठी
खुप स्वप्ने अशी बघितलीत बाळा..
राहुदेत कर्तव्यात उभी मला..
सारुदे हा प्रितिचा भाव भोळा...

संध्याकाळ झाली... पाखरांनीही वाट धरली
ओढीची तुझ्या आस लागली...
..... दिसले माझे पाखरुं दारी
भरली प्रेमाने माझी झोळी

शब्दखुणा: 

येऊ नकोस कधीही

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 3 August, 2012 - 13:54

येऊ नकोस कधीही
पुन्हा आता तू
असशील तेथे सदैव
पण सुखी रहा तू

सूर तुझेनी माझे
नच जुळले कधीहि
रिझविणे माझे तुजला
जा विसरून आता तू

गीत आपुले आपण
होते सजविले छान
कडव्यात हरेक सदा
कळेना भांडलीस का तू

प्रत्येक जीत तुझीच
मी दुरावलो दूर
पण जिद्द तुझी का
न सोडलीस तू

तू पशिमेची अन
मी पूर्वेचा सदैव
भेद मिटले कधी न
ना मिटवले कधी तू

आता तरी निदान
ठरवू अखेर आपण
जातो मी माझ्या वाटे
सुख शोध तुझे तू

एक एकटा एकटाच!!!

Submitted by एक नसलेल अस्तित्व on 19 January, 2012 - 02:59

तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मन माझे आजही रडते आहे,
तिच्या आठवणींच्या स्पर्शात आजही वेडे फुलते आहे!
मन माझ तेव्हाही एकाकीच होत आणि आजही एकाकीच आहे,
फरक फक्त एवढा कि आज त्याला माझ्या हृदयाची साथ आहे!
जीवनात माझ्या आता एकही फुल फुलणार नाही,
वेड्या ह्या मनाला कोणीही प्रेम देणार नाही!
एकट्या ह्या वाटेवरून आजपर्यंत मी चालत आलो,
प्रेमाचा प्रत्येक रस्ता आपोआपच विसरत गेलो!
कधीतरी ती आयुष्यात पुन्हा एकदा दिसेल,
डोळ्यामधून पाणी माझ्या गालावर बरसेल!
तिच्याच आठवणीत मी जगलो तिच्याच आठवणीत मरेल,

गुलमोहर: 

१)

Submitted by Ramesh Thombre on 25 December, 2011 - 05:40

रात्री एकटच झोपल्यावर हळूच
छातीवर फुंकर घालणारी बोचरी थंडी ...
अन सकाळी उठल्यावर ...
इस्त्रीच्या शिल्लक राहिलेल्या एकमेव
शर्टची तुटलेली गुंडी.

आठ दिवसांपासून एकाच जागी
झोपलेलं अस्ताव्यस्त अंथरूण ...
अन तिथेच बेडवर कोपऱ्यात
उघडं पडलेलं मळकट पांघरूण

किचनओट्याशेजारील मोरीत
पडलेली खरकटी भांडी ...
अन कधीकाळी ताजी असलेली
फ्रीझमधील सडलेली भाजी.

वर्तमानपत्रांपासून दूर पडलेल्या
रंगीत साप्ताहिक पुरवण्या ...
अन कपाटातील एकावर-एक पडलेल्या
पुस्तकातील अगणित कहाण्या.

झोपेच्या प्रयत्नात हजारदा
बदललेली कुशी ...
अन शेजारीच पडलेली
आणखी एक उशी.

बाथरूम मधील

गुलमोहर: 
Subscribe to RSS - विरह कविता