हे दु:ख ऊरी माझ्या; आसवे डोळ्यात तुझ्या कां?
मी असता दारी त्याच्या; मागणे शब्दात तुझ्या कां?
*
व्यक्त जाहलो कवितेतून; जाणले तुज गझलेतून
सांगत मी माझे असतांना, लाजणे गालात तुझ्या कां?
*
ऋतु आले गेले कितीही, चिंब होतो प्रेमातच तरीही
गात मल्हार मी असतांना; पैंजणे पायात तुझ्या कां?
*
नभ माझे माझ्यापुरते, क्षितिजाचे त्याला कुंपण
हा चंद्र ओंजळीत माझ्या, चांदणे ह्रूदयात तुझ्या कां?
*
-अशोक
दि २६-०५-२०१८
कॅलिडोस्कोप
माझ्याकडे आहे एक कॅलिडोस्कोप
ज्यात काहीही पाहिले तरी मोहकच दिसते
अगदी दु:खही
तसा तो तुमच्याकडेही आहे
फक्त त्याच्या काचा साफ करायच्या
पुटे काढायची
काम , क्रोध ,मद , लोभ , मोह , मत्सर यांची
थोड्या रंगीबेरंगी काचा टाकायच्या
प्रेम , बंधुभाव , त्याग , सेवाभाव , भूतदया
इत्यादीच्या
मग प्रत्येक दु:ख वेगवेगळे मोहक आकार
आणि रंग घेऊन सजते सुखाचा
© दत्तात्रय साळुंके
खात्यात असोन ही पैसे काढता येत नाही
रांगेत तिष्टत असोन ही नंबर येत नाही
गुलाबोचे नोट पाहिल्यावर हर्ष का होत नाही
हजारा ची नोट बाजारात लवकर का येत नाही
मर मर काम करोनी पगार वाढत का नाही
बॉस नामक प्राणि ला समझ का येत नाही
सुट्टया बाकी आहेत पण संपवता येत नाही
तीन दिवसां पेक्षा जास्त सी एल घेता येत नाही
घ्यायचे आहे नवीन लॅपटॉप , पण भाव परवडत नाही
पी एल तीस दिवसांपेक्षा जास्त असेल तर एन्कॅश करता येत नाही
जायचे आहे शिन्मा ला, पण गल्फ्रेंडला नेता येत नाही
चकना शिवाय दारु ला चव का येत नाही
भोगले जे दु:ख त्याला दु:ख तरी म्हणू कसे
हरेक क्षणी सुखाची आस होती
तुझी आश्वासक साथ होती
पण हाय रे , दुर्दैव माझे की
नावातच माझ्या वनवास होता
फक्त त्या वाटेवर उब तुझी यादगार होती
आजही ते दु:ख पांघरावे वाटते
दु:खाचेही साजरे करावे म्हणते सोहळे
कारण तूच फुलवलेस ताटवे वनवासी या
म्हणूनच झेलले हे दु:ख त्याला दु:ख म्हणवत नाही रे
शेवटी तू कितीही टाळलेस तरीही
हेच खरे की , नावातच माझ्या वनवास होता .....
-मैथिली
"आनंदयात्री मी आनंदयात्री" -- कधीतरी लहानपणी वाचलेली मंगेश पाडगावकरांची कविता मध्यंतरी पुन्हा एकदा वाचनात आली आणि शाळेतल्या न-कळत्या वयातला न उमगलेला कवितेचा अर्थ मनाला भिडला. विशेषतः कवितेचे शेवटचे कडवे.
हलके काढून कंटक पायींचे
स्वरांत विणिले सर मीं स्वप्नांचे
हासत दु:खाचा केला मी स्वीकार
वर्षिलें चादंणें पिऊन अंधार
प्रकाशाचें गाणें अवसेच्या रात्रीं
आनंदयात्री मी आनंदयात्री.
घर छोड के चले थे, खुशी की तलाश में, खुशी की तलाश में,
गम राह में खडे थे, वहीं साथ हो लिये,
यूँ हसरतों के दाग मोहोब्बत में धो लिये
खुद दिल से दिल की बात कहीं, और रो लिये
अशाप्रकारे सुखाच्या शोधार्थ घराबाहेर पडलेल्यांच्या वाटेवरच उभी असणारी दुःखे, त्यांची सोबत करू लागतात. मग स्वतःलाच त्या दुःखाचा सल सांगून रडून घ्यायची पाळी येते. त्यामुळे दुःख म्हणजे काय हे कुणालाही सांगावे लागत नाही. जन्म घेणारी बालके तर दुःख सहन न होऊन रडत रडतच ह्या जगात अवतीर्ण होत असतात.
दु:ख, वेदना यांचा अनुभव केवळ एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूमूळेच येत नाही तर इतरही अनेक गोष्टींचा Loss आणि त्यामूळे होणारा त्रास किंवा दु:ख आपल्याला होत असते. मात्र त्याकडे Loss असं म्हणून बघितले जात नाही. मनाला उदास वाटणे, चुकल्या चुकल्यासारखे वाटणे, मनाला न करमणे, चिडचिड यासारखी भावनिक आंदोलने किंवा स्थिती आपण अनुभवतो पण त्याखाली आपल्यासाठी महत्वाची असणारी कुठली तरी गोष्ट आपण गमावलेली असू शकते.
अशा कोणकोणत्या गोष्टी असतात? ज्याने आपल्याला वरील प्रकारच्या भावनांना सामोरे जावे लागते?
पालकाचा किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामूळे मुलांमध्ये दिसणार्या मानसिक समस्यांवरती ग्रिफ थेरपी (Grief Therapy) करतात.
मृत्यू, त्याचा शोक किंवा दु़:ख आणि त्यामधून बाहेर पडणे याला ग्रिव्हिंग (Griving) म्हणतात. जवळच्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो त्यानंतर मुले किंवा प्रौढ व्यक्ती दु:खाच्या वेगवेगळ्या अवस्थांमधून जात असतात आणि ही प्रक्रिया होणं गरजेचं असतं.
दु:ख पुरातन
दु:ख चिरंतन
दु:ख जगाच्या
घरचे अंगण
दु:ख मोहवी
दु:ख बोलवी
दु:ख खुळ्या
पायातील पैंजण
दु:ख उराशी
दु:ख उशाशी
दु:ख सोबती
बनून कांकण
दु:ख चिडचिडे
दु:ख तडफडे
दु:ख सनातन
शाश्वत वणवण
दु:ख एकटे
दु:ख धाकटे
दु:ख थोरल्या
सुखास कारण
दु:ख मल्मली
दु:ख भरजरी
दु:ख सुखाशी
अतूट गुंफण!
येऊ नकोस कधीही
पुन्हा आता तू
असशील तेथे सदैव
पण सुखी रहा तू
सूर तुझेनी माझे
नच जुळले कधीहि
रिझविणे माझे तुजला
जा विसरून आता तू
गीत आपुले आपण
होते सजविले छान
कडव्यात हरेक सदा
कळेना भांडलीस का तू
प्रत्येक जीत तुझीच
मी दुरावलो दूर
पण जिद्द तुझी का
न सोडलीस तू
तू पशिमेची अन
मी पूर्वेचा सदैव
भेद मिटले कधी न
ना मिटवले कधी तू
आता तरी निदान
ठरवू अखेर आपण
जातो मी माझ्या वाटे
सुख शोध तुझे तू