ताणतणाव घालवण्याचे माबोकरांचे फंडे (stressbuster) काय आहेत ?
तुमचे stressbuster फंडे काय आहेत ?
कृपया इथे त्याबाबतचे विचार मांडा, म्हणजे कसं बरं होईल, हो ना ?
मानसिक ताणतणाव (आणि कधी कधी येणारा बौद्धिक ताणतणाव ) घालवण्याचे किल्लीचे काही फंडे आहेत, जसे की :
१. माबो वर वाचन करणे, प्रतिक्रिया देणे , खूपच विचार असह्य झाले तर लिहिणे !!
२. भांडी घासणे (खरंच !! उत्तम stressbuster आहे हा !! एकदा बघाच !!)
३. कोल्ड कॉफी , चोकोलेट किंवा पाणीपुरी हादडणे
४. गाणी ऐकणे , धांगडधिंगा असणारी !!