Submitted by आनंदयात्री on 7 January, 2013 - 04:31
दु:ख पुरातन
दु:ख चिरंतन
दु:ख जगाच्या
घरचे अंगण
दु:ख मोहवी
दु:ख बोलवी
दु:ख खुळ्या
पायातील पैंजण
दु:ख उराशी
दु:ख उशाशी
दु:ख सोबती
बनून कांकण
दु:ख चिडचिडे
दु:ख तडफडे
दु:ख सनातन
शाश्वत वणवण
दु:ख एकटे
दु:ख धाकटे
दु:ख थोरल्या
सुखास कारण
दु:ख मल्मली
दु:ख भरजरी
दु:ख सुखाशी
अतूट गुंफण!
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर पूर्वप्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2012/07/blog-post_30.html)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्या बात है नचिकेत ?.....
क्या बात है नचिकेत ?..... फारच मस्त, सह्हीच......
दु:ख सुखाशी अतूट
दु:ख सुखाशी
अतूट गुंफण!
>>>
हे जास्त आवडलं
दु:ख सुखाशी अतूट गुंफण! >>>
दु:ख सुखाशी
अतूट गुंफण!
>>>
सुंदर!!! दु:ख हवेसे दु:ख
सुंदर!!!
दु:ख हवेसे
दु:ख नकोसे
दु:ख मनाचे
भरीव कोंदण!
मस्त .. आवडली कविता.. !
मस्त .. आवडली कविता.. !
(No subject)
खूप मस्त यात्रीजी खूप खूप
खूप मस्त यात्रीजी
खूप खूप आवडली
वा...सुरेख !
वा...सुरेख !
धन्यवाद
धन्यवाद
फॅण्टॅस्टिक !! दु:ख
फॅण्टॅस्टिक !!
दु:ख मल्मली
दु:ख भरजरी
दु:ख सुखाशी
अतूट गुंफण!
____/\____ !!
क्लास!!
क्लास!!
धन्यवाद!
धन्यवाद!
अरे ही कशी काय राहिली माझी
अरे ही कशी काय राहिली माझी वाचायची?
सगळीच कडवी मस्त
दु:ख जगाच्या घरचे अंगण दु:ख
दु:ख जगाच्या
घरचे अंगण
दु:ख सनातन
शाश्वत वणवण
मस्त!
दु:खाचे विविध पैलू मस्तच
दु:खाचे विविध पैलू मस्तच मांडलेत.
"दु:ख मल्मली
दु:ख भरजरी" >>> हे मला व्यक्तिश: पटलं नसलं तरी
दु:खावर प्रेम करणार्यांच्या दृष्टीकोनातून या ओळी क्लासिक आहेत हे निश्चित.
"दु:ख सुखाशी
अतूट गुंफण!" >>> .... हे वास्तव आहे आणि मांडलंयही मस्तच.
एकूण कविता सहज, सुंदर उतरली आहे.
आवडली छान .
आवडली छान .
धन्यवाद
धन्यवाद