दु:ख

ऋण दु:खाचे

Submitted by राजीव शेगाव on 7 January, 2012 - 02:10

आयुष्यात इथंवर... मी डोळे मिटुनी आलो...
मैफिली धुंद शब्दांच्या... डोळे मिटुनी प्यालो...

गायिले राग त्यांनी जेव्हा... दुख्खी आर्त स्वरांचे...
माझ्याच सार्‍या व्यथा मग... मी अनुभवून गेलो...

डोहात दु:खाच्या माझ्या... मीच बुडताना...
हरेक हात मदतीचा... मी ठोकरून गेलो...

जगलो इथे जरी मी... ताठ मानेने...
जाताना मात्र थोडी... मान झुकवूनी गेलो...

कुठंवर फेडावे... जीवनाने ऋण हे दु:खाचे...
दु:खाच्याच दारात आज... जीवनास विकूनी आलो...!

गुलमोहर: 

दु:ख म्हणजे सावली होती

Submitted by आनंदयात्री on 5 August, 2011 - 06:11

माणसे गावातली होती
वाटले, ती आपली होती

गवगवा नुसताच दानाचा
मूठ त्यांनी झाकली होती

वेदनेच्या भरदुपारीही
आसवे सुस्तावली होती

मी सुखाच्या पुस्तकामधली
खंतही अभ्यासली होती

उंबरा ओलांडला तेव्हा
पावले रेंगाळली होती

मी खुळा समजून घेणारा!
(ती कुठे ओशाळली होती?)

मी जगावर प्रेम केले अन्
जवळच्यांशी जुंपली होती

वादळे नशिबातही होती
छप्परे भेगाळली होती

श्वास झाला उंच झोपाळा
ती अचानक भेटली होती

सुख उन्हासम तळपले होते
दु:ख म्हणजे सावली होती

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 

परीघ

Submitted by आनंदयात्री on 11 May, 2011 - 07:34

एकटेपणाच्या कैदेत कुढत असताना
पहिल्यांदाच जाणवला स्वत:च्या दु:खांचा काळागर्द परीघ -
दिवसांमागून दिवस गिळत
तुझ्यासोबत चक्रामध्ये मी फिरत असताना,
जो लाटेसारखा पायापाशी येऊन फुटायचा अधूनमधून!
पण त्यावेळी हे जाणवलं नाही की-
कधी ना कधी ह्या लाटा
आपल्याला एकट्यालाच पार करायच्या आहेत,
कारण -
शेवटी त्या आपल्या स्वत:च्या आहेत!

इतके दिवस तुझी सोबत होती मला
म्हणून कदाचित ते जाणवलं नसेल!
पण हे खरं नाहीये...
खरं हे आहे की, केंद्राशी इमान राखून
त्या चक्रात फिरतांना तळहातावर जपलेली दु:खं -
तुझी होती!

आणि तुझ्या दु:खांपुढे माझी दु:खं छोटी ठरली,
हे सत्य त्या परिघात शिरण्यापूर्वी

गुलमोहर: 

दु:ख आता फार झाले (तरही)

Submitted by आनंदयात्री on 30 January, 2011 - 23:09

दु:ख आता फार झाले
पापण्यांना भार झाले

वाहिल्या जखमा मुक्याने
आठवांचे वार झाले

भेटली मज माणसे पण
शब्द माझे यार झाले

संकटांशी झुंजताना
संकटच आधार झाले

हरवले घर पाखराचे
हाल दारोदार झाले

पेटणे हातात नाही
कोळसे लाचार झाले

काय झाले आठवेना
भासही हळुवार झाले

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - दु:ख