एकदा आरशा समोर बसा आणि आपल्या नाकपुड्या हलवून पहा. आपण तिथे असलेले स्नायू वापरून नाकपुड्यांचे प्रसरण करू शकतो. पण त्यांचे आकुंचन नाही करू शकत. श्वास आत घेत असताना, बाहेर सोडत असताना आणि रोखलेला असताना असे तिन्ही वेळेस आपण नाकपुड्या फेंदारू शकतो.
आकुंचन करण्यास आपल्याला श्वास खूप जोराने आत ओढावा लागतो. नेहमी सारखा श्वास घेत असताना, श्वास बाहेर सोडत असताना आणि रोखलेला असताना आपण नाकपुड्यांचे आकुंचन करू शकत नाही.
थोडक्यात नाकपुड्यांचे प्रसरण करणे, म्हणजे त्या फेंदारणे यावरच आपला ताबा आहे आणि त्यासाठी आपल्याला स्नायू मिळाले आहेत.
मैत्री मधील हा रुसवा
कसा हा राग असावा.
रागात ही अनुराग असावा.
अबोल तिच्या नजरेला
प्रेमाचा स्पर्श असावा...
.
.
.–Anand
तुझ्या चेहर्यावरचा राग
तुझ्यासारखाच खुप सुंदर आहे.
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकढे ओढ आहे.
तुझं न बोलण्याचा कारण
माझ्यावरील राग आहे.
मग मीही न बोलताच
तुझ्या सोबत लपंडाव खेळतो आहे.
आपलं बनवूनी कोणी
क्षणांत परकं करतो
सांग रे मना का तेवेळी,
मी दु:खात बुडुनी जातो ॥१॥
गोड बोलावे कधी कोणी
मनाला का रोजच वाटते
डोळ्यांत काटेरी शब्दांनी
माझ्या टचकन् पाणी येते ॥२॥
अकारण वादांनी मनात
रागाची भावना उफाळते
संथ लयीच्या श्वासांना
क्षणांत अस्थिर फुलवते ॥३॥
राग येता मन हे सैराट होते
घेण्या प्रतिशोध किती आतुरते!
क्षणभरीच्या प्रक्षुब्ध भावाला
चैतन्य कुठले हे दुर पळवते? ॥४॥
आयुष्यात इथंवर... मी डोळे मिटुनी आलो...
मैफिली धुंद शब्दांच्या... डोळे मिटुनी प्यालो...
गायिले राग त्यांनी जेव्हा... दुख्खी आर्त स्वरांचे...
माझ्याच सार्या व्यथा मग... मी अनुभवून गेलो...
डोहात दु:खाच्या माझ्या... मीच बुडताना...
हरेक हात मदतीचा... मी ठोकरून गेलो...
जगलो इथे जरी मी... ताठ मानेने...
जाताना मात्र थोडी... मान झुकवूनी गेलो...
कुठंवर फेडावे... जीवनाने ऋण हे दु:खाचे...
दु:खाच्याच दारात आज... जीवनास विकूनी आलो...!