विष

भारतात, जुन्या Non Stick भांड्यांची विल्हेवाट कशी लावावी?

Submitted by अभि_नव on 13 September, 2020 - 03:56

या संदर्भातले आंतरजालावरचे बरेचसे लेख परदेशातले असतात व त्यांचा मुख्य भर रिसायकल करण्यावर असतो.

खराब झालेले नॉन स्टीक भांडे घातक ठरु शकतात असे अनेक ठिकाणी वाचले. त्यामुळे ते कोणालाही वापरण्यासाठी देऊ शकत नाही.
भंगारात दिले तर तिथुन ते परत कुणाच्यातरी वापरातच जाण्याची शक्यता अधिक.

परदेशात रितसर रिसायकल करण्याची सोय आहे असे दिसते.

ऋण दु:खाचे

Submitted by राजीव शेगाव on 7 January, 2012 - 02:10

आयुष्यात इथंवर... मी डोळे मिटुनी आलो...
मैफिली धुंद शब्दांच्या... डोळे मिटुनी प्यालो...

गायिले राग त्यांनी जेव्हा... दुख्खी आर्त स्वरांचे...
माझ्याच सार्‍या व्यथा मग... मी अनुभवून गेलो...

डोहात दु:खाच्या माझ्या... मीच बुडताना...
हरेक हात मदतीचा... मी ठोकरून गेलो...

जगलो इथे जरी मी... ताठ मानेने...
जाताना मात्र थोडी... मान झुकवूनी गेलो...

कुठंवर फेडावे... जीवनाने ऋण हे दु:खाचे...
दु:खाच्याच दारात आज... जीवनास विकूनी आलो...!

गुलमोहर: 
Subscribe to RSS - विष