Submitted by अभि_नव on 13 September, 2020 - 03:56
या संदर्भातले आंतरजालावरचे बरेचसे लेख परदेशातले असतात व त्यांचा मुख्य भर रिसायकल करण्यावर असतो.
खराब झालेले नॉन स्टीक भांडे घातक ठरु शकतात असे अनेक ठिकाणी वाचले. त्यामुळे ते कोणालाही वापरण्यासाठी देऊ शकत नाही.
भंगारात दिले तर तिथुन ते परत कुणाच्यातरी वापरातच जाण्याची शक्यता अधिक.
परदेशात रितसर रिसायकल करण्याची सोय आहे असे दिसते.
भारतात असे कुणी केले आहे का? ओरखडे उठलेले व त्यामुळे घातक ठरु शकणारे जुने नॉन स्टीक योग्य रितीने कसे रिसायकल करावे व ते शक्य नसल्यास हे का घातक ठरु शकते याबद्दल माहिती नसणा-या व्यक्तीच्या हाती अनवधानाने पडणार नाही, तो/ती हे वापरणार नाही अशी विल्हेवाट कशी लावावी?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुणे शहर, तुळशीबाग इथे
पुणे शहर, तुळशीबाग इथे नव्याने नॉनस्टिक कोट त्याच तव्यावर करून देणारी अनेक दुकाने आहेत.
तुळशीबाग इथे नव्याने नॉनस्टिक
तुळशीबाग इथे नव्याने नॉनस्टिक कोट त्याच तव्यावर करून देणारी अनेक दुकाने आहेत. >>> पण नॉनस्टिक अजिबात वापरायचीच नसतील आणि डीसकार्ड (डी, ऱ्हस्व कसा लिहायचा?) करायची असतील तर ?
दुसरा प्रश्न - हार्ड anodised तवा आणि कढई (दोन्ही Futura) यांना पण ओरखडे उठले आहेत, किंचित पांढरे आणि काही जाणवेल न जाणवेल असे खड्डे. स्वयंपाकाच्या मावशी आणि मेड दोघींची मिळून करामत. तर नॉनस्टिक सारखे हे पण हार्मफुल असतात का?
मेड क्लेम ठेऊन बसली आहे, पण हे वापरलेले चालणार नसतील तर देणार नाही.
मीरा माझा पण futura hard
मीरा माझा पण futura hard anodized कढई न तवा, दोघेवर ओरखेडे पडले, खाली पांढरे दिसायला लागले. मी भांड्यावाल्याकडे देऊन टाकले मोडीत.. आता लोखंडी न बिडाचा वापर करतेय. पांढरे म्हणजे अलुमिनिमचं न? कि अजून कोणता मटेरियल असता?
पण नॉनस्टिक अजिबात वापरायचीच
पण नॉनस्टिक अजिबात वापरायचीच नसतील आणि डीसकार्ड (डी, ऱ्हस्व कसा लिहायचा?) करायची असतील तर ?
Submitted by मीरा.. on 13 September, 2020 - 15:31
>>
+१
दुरुस्त करुन परत वापरणे हा पर्याय नाही. सद्ध्या तो नको.
पूर्णपणे काढुनच टाकायची आहेत.
D + i = डि
@ mi_anu, तुळशीबागेत कोणतं
@ mi_anu, तुळशीबागेत कोणतं दुकान? नाव ठाऊक नसलं तरी आजूबाजूची खूण सांगता येईल का?
D + i = डि >>> अभि नव,
D + i = डि >>> अभि नव, धन्यवाद.
शीतल, शंका आल्यावर वापरण्यापेक्षा बाजूला ठेवलेलं बरं. पण लगेच मोडीत देण्याऐवजी, जर अपाय नसेल तर मेडला द्यायला हरकत नाही असं वाटतं म्हणून अजून सांभाळून आहे. पण अजून खात्रीशीर माहिती मिळाली नाहीए.
आईकडून नंबर घेऊन देते.
आईकडून नंबर घेऊन देते.
हे परत कोटिंग करून देणारे-
हे परत कोटिंग करून देणारे- काय मटेरिअल वापरतात, कोटिंग प्रोसेसची क्वालिटी काय, जरा शंकाच नव्हे का?
मला वाटतं इतक्या शंका घेऊ
मला वाटतं इतक्या शंका घेऊ नयेत.बीड तवे बेस्ट असले तरी व्यवस्थित काळजी घेऊन नॉन स्टिक वापरायलाही हरकत नाही.
हे परत कोटिंग करून देणारे-
हे परत कोटिंग करून देणारे- काय मटेरिअल वापरतात, कोटिंग प्रोसेसची क्वालिटी काय, जरा शंकाच नव्हे का?
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 13 September, 2020 - 18:41
+१
आपण घरात ह्या भांड्याची काळजी
आपण घरात ह्या भांड्याची काळजी करतो पण बाहेर लोक सर्रास आतले सगळे अल्युमिनियम दिसत असलेली भांडीही वापरतात. माझ्या ऑफिसातल्या सगळ्या फुडकोर्टात पास्ता, नूडल्स वगैरे काउंटरवर अशीच काळोखी उडालेली भांडी वापरतांना बघितले आहे/होते.
मी नॉन स्टिक घेणे काही वर्षांपुर्वी बंद केले. हार्ड अनोडईज्ड भांडे आहे वापरात, ते जपून वापरते.
भांडी जेवण बनवण्यासाठी वापरायची नसल्यास स्वयंपाकघरातील इतर कामांसाठी वापरावीत. डाळ तांदूळ धुणे, भाजी करण्याआधी / चिरण्याआधी ठेवणे वगैरे. हे करताना फारसे टॉक्सिक पोटात जाणार नाही असे वाटते.
मी पण हेच लिहीणार होते
मी पण हेच लिहीणार होते
हॅन्डल काढून पर्ल / ऍक्रालीक रंगानी रंगवून डायनिंग टेबल वर फळं, फुलं सजवता येईल
फ्रीज वर चावी वगैरे एकत्र ठेवायला,
Hall मध्ये टीपॉय वर पाणी/फुलं/पाकळ्या सजवून(खोलगट असेल तर)
फ्लॉवर पॉट च्या खाली गोट्या/पेबल्स वगैरे सजवून ठेवायला वापरू शकतो
हो.तवा पण हॅन्डल काढून लेस
हो.तवा पण हॅन्डल काढून लेस चिकटवून पूजा थाली वगैरे करता येईल.
त्याच गेट ला उरलेलं एक्स्पायर्ड फेस क्रिम पण लावणार आहे. )
(अवांतरः एका महाग कंपनीचं फुकट मिळालेलं अँटी डॅण्ड्रफ तेल आम्हाला कुठेतरी ठेवलेलं ८ वर्षांनी सापडलं. त्यामुळे एका कुरकुरणार्या गेट ला ते लावलं
अवांतरः एका महाग कंपनीचं फुकट
अवांतरः एका महाग कंपनीचं फुकट मिळालेलं अँटी डॅण्ड्रफ तेल आम्हाला कुठेतरी ठेवलेलं ८ वर्षांनी सापडलं. त्यामुळे एका कुरकुरणार्या गेट ला ते लावलं Happy त्याच गेट ला उरलेलं एक्स्पायर्ड फेस क्रिम पण लावणार आहे. )>>>>>

येवू द्या अशा छान छान आयडिया !!!!
तुम्ही शोध घेऊन जबाबदारीने
तुम्ही शोध घेऊन जबाबदारीने वागताय हे उत्तमच आहे. योग्य विल्हेवाट लागो याकरता शुभेच्छा.
पण परदेशातही रिसायकल रीसायकल करून गोळा केलेलं प्लास्टिक किती रिसायाकल होतं आणि किती landfill मध्ये जातं हा संशोधनाचा विषय आहे.
How Big Oil Misled The Public Into Believing Plastic Would Be Recycled
त्याच गेट ला उरलेलं
त्याच गेट ला उरलेलं एक्स्पायर्ड फेस क्रिम पण लावणार आहे. ) >> गेटला पिंपल्स आले तर ते तुमच्यावर दावा ठोकेल
आणि gate ला सहन नाही झालं,
आणि gate ला सहन नाही झालं, rashes आले, पुरळ आलं तर?
Skin लाल होते अशानं
मग काय करू क्रीम चं
मग काय करू क्रीम चं
हौसे हौसेने आणलेलं फेकवतही नाही.फार तर क्रीम मध्ये कणिक मळून कलर घालून सुगंधी प्ले डो करता येईल.
https://youtu.be/mc783uTg-rc
https://youtu.be/mc783uTg-rc
मी अनु, हे पहा
अशा अनेक tricks शोधता येतील
मी भांड्यांच्या दुकानात नेऊन
मी भांड्यांच्या दुकानात नेऊन देते. बदल्यात तसाच सेम नवा तवा घेतला तर ते किंमतीत सूट देतात.
चिकटपणा न करता नवीन भांडे
चिकटपणा न करता नवीन भांडे विकत घ्या.
हे परत कोटिंग करून देणारे-
हे परत कोटिंग करून देणारे- काय मटेरिअल वापरतात, कोटिंग प्रोसेसची क्वालिटी काय, जरा शंकाच नव्हे का? > शंका रास्त आहे. मी एक तवा घेत्ला होता असा कोटिंग करून. ज्याच्याकडून घेतला त्याच्या म्हणण्यप्रमाणे कंपनी सारखेच सेम अस्ते सगळे. त्याचं फिनिशिंग जरा कमी वाटलं मला. आणि हा नवकोटिंग्चा तवा परत लवकर खराब झाला माझा.
चिकटपणा न करता नवीन भांडे
चिकटपणा न करता नवीन भांडे विकत घ्या.
नवीन Submitted by सखा on 1 October, 2020 - 12:55
>>
तुम्हाला योग्य "सायंटीफि़क" प्रश्न विचारुन तुमच्या धाग्याचा फोलपणा बरोब्बर पकडल्यामुळे तुमचा झालेला तिळपापड समजु शकतो. निरुत्तर होऊन तुम्हाला तिथुन पळ काढावा लागला.
पण जर तुम्ही नीट मराठी शिकुन आलात व हा धागा परत वाचलात तर तुमच्या लगेच लक्षात येईल की, खराब झालेले भांडे परत कसे वापरात आणावे या बद्दल हा धागा नसुन, ते भांडे शास्त्रीय पद्धतीने निकालात कसे काढावे या बद्दल आहे. वर एका उत्तरात मी हे स्पष्ट केले आहे की दुरुस्त करायचे नाही म्हणुन.
लवकर बरे व्हा.
योग्य विल्हेवाट लावायचा एकच
योग्य विल्हेवाट लावायचा एकच मार्ग दिसतोय, भांडे स्वयंपाकाकरिता निरुपयोगी करून मोडीत काढणे.
ड्रीलिंग मशीन असेल तर त्याने मध्ये भोके पाडून. (मेटल ड्रिल बिट लागेल.) नसल्यास हे वर्कशॉपमध्ये जाऊन पैसे मोजून करवून घ्यावे लागेल.
थोडे खोलगट असेल तर हँडल काढून
थोडे खोलगट असेल तर हँडल काढून झाड लावता येईल.हल्ली किटल्या रंगवून विकतात.तसे मंडला पेंट करून भिंतीवर लावता येईल.
काही अवांतर वस्तू(भांड्यांचे साबण-स्क्रबर/हार्पिक कॉलिन ठेवायला )वापरता येईल.
तव्याची बॉडी टेराकोटा कोट करून वॉलपीस.