घातलेली साद तू, मी ऐकली नाही
साद प्रेमाने तशी तू घातली नाही
भोगल्या मी तू दिलेल्या त्या व्यथा साऱ्या
प्रेम मिळण्याची व्यथा मी भोगली नाही
भूतकाळाने शिकवले वेगळे काही
माणसाशी प्रीत वेडी चांगली नाही
जे प्रवासी भेटले, ते पांगले सारे
भाग्य माझे! वाट माझी पांगली नाही
घाबरट हे सत्य इथले, न्याय ही भित्रे
आज खोट्यालाच भीती वाटली नाही
शस्त्र झाले सर्व बोथट, वार ही थकले
राजनीतीची लढाई संपली नाही
रोज पडले कैक, त्यांना मी उचलले मग
का कुणी माझीच तिरडी उचलली नाही?
व्यथा
भावनेचा कोंडमारा
घाव जे जिव्हारा
कसा आवरू आता
आयुष्याचा पसारा
सांगू व्यथा कोणाला
आहे कोण ऐकणारा
कसा आळवू न कळे
सुना सुना देव्हारा
गुंतलास कोठे तू
कोणास उध्धारा
व्याकुळले नयन
दे दर्शन परमेश्वरा
राजेंद्र देवी
व्यथा
सुगंध घेता फुलाचा
काटा कधी रुतावा
सौख्यातही सुखाच्या
विष डंख उरी सलावा
दुर्भाग्य असे जीवनी
कुणा कधी नसावे
डोळ्यात असुनी पाणी
ओठी कसे हसावे
पिसाट सुटला वारा
राहिला दूर किनारा
मागू कुणा कुणा मी
दुबळ्या मना सहारा
वदली न कुणा व्यथा
हसलो सदा निर्व्यथा
थकलो थकलो आता
झुकवितो इथेची माथा
"नमस्कार मित्रमैत्रिणिंनो! मी स्नेहल निगडे, एस वाय बी एस सी! व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय प्राचार्य सर, आदरणीय उपप्राचार्य सर, आपल्या भागाचे आदरणीय तहसीलदार सर, सर्व गुरूजन आणि सर्व कर्मचारीवर्गाला अभिवादन करून मी आपले चार शब्द मांडते."
एका वडाची व्यथा
=============
आयुष्यात इथंवर... मी डोळे मिटुनी आलो...
मैफिली धुंद शब्दांच्या... डोळे मिटुनी प्यालो...
गायिले राग त्यांनी जेव्हा... दुख्खी आर्त स्वरांचे...
माझ्याच सार्या व्यथा मग... मी अनुभवून गेलो...
डोहात दु:खाच्या माझ्या... मीच बुडताना...
हरेक हात मदतीचा... मी ठोकरून गेलो...
जगलो इथे जरी मी... ताठ मानेने...
जाताना मात्र थोडी... मान झुकवूनी गेलो...
कुठंवर फेडावे... जीवनाने ऋण हे दु:खाचे...
दु:खाच्याच दारात आज... जीवनास विकूनी आलो...!
एका डॉक्टरच्या कविता-6 : व्यथा
फिनेल स्पिरिटच्या वासांनी
नाकाला घेराव केले
वेदनेच्या आकान्तांनी
कान सुद्धा बधीर झाले
रो़ज रोज मरण बघून
डोळे सुद्धा कोरडे झाले
मित्रांचं तर जावूच द्या
अश्ररू सुद्धा गद्दार झाले!
- अशोक