घातलेली साद तू, मी ऐकली नाही
साद प्रेमाने तशी तू घातली नाही
भोगल्या मी तू दिलेल्या त्या व्यथा साऱ्या
प्रेम मिळण्याची व्यथा मी भोगली नाही
भूतकाळाने शिकवले वेगळे काही
माणसाशी प्रीत वेडी चांगली नाही
जे प्रवासी भेटले, ते पांगले सारे
भाग्य माझे! वाट माझी पांगली नाही
घाबरट हे सत्य इथले, न्याय ही भित्रे
आज खोट्यालाच भीती वाटली नाही
शस्त्र झाले सर्व बोथट, वार ही थकले
राजनीतीची लढाई संपली नाही
रोज पडले कैक, त्यांना मी उचलले मग
का कुणी माझीच तिरडी उचलली नाही?
झुंजूमुंजू
रंगलेली रात अशी
रे तुझ्याच स्वप्नात
एक हितगूज तूझ्याशी
शब्द मांडले डोळ्यात
शहारून गेले कशी
तुझ्या नवथर स्पर्शात
तु घेऊनी बाहूपाशी
मंद होतास झूलवित
तुझ्या धुंदित काहीशी
होती नवखीच रित
लावी हूरहूर जीवाशी
तुझी अवखळ प्रीत
झुंजूमुंजू होता कानाशी
स्वप्न विरले तमात
मन बोलले मनाशी
कशी गुंतली प्रेमात
.....प्रांजली
कशी विसरू ग तुझी माझी प्रीत!!
प्रीत .....
माझे शब्द शब्द दाटले धुक्या परी
का तुझे भाव भाव गोठले अंतरी?
माझे ओठ ओठ मिटले मुक्या परी
का तुझे हास्य हास्य रुठ्ले अंतरी?
माझे मन मन फिरले पक्षा परी
का तुझे पंख पंख मिटले अंतरी ?
माझे तन तन बहरले श्रावणा परी
का तुझा पाऊस पाऊस बरसला अंतरी?
माझे ऋण ऋण उरले तरू परी
का तुझा रोम रोम लोपला अंतरी ?
मी प्रीत प्रीत केली मीरे परी
का तूझ्या नसे नसे कान्हा अंतरी?
-----मनिषा बांगर-बेळगे
प्रीतीचा सुगंध
कोळीवाडा ते आदर्शघाट
बस नंबर सात
तू चढलीस झोकात
बसलीस शेजारीच येउन
मी बसलेलो नाक धरून
बस कळकट्ट, घामट
पण तुझा वेगळाच थाट
सगळी बस जणू एक मोठी घामोळी
फक्त तू एकटीच महकणारी गंधाली
सर्वांची कापडं जुनाट विटकी
तुझी वस्त्रं तेवढी नीटनेटकी
हळूच तुझ्या अंगावर रेलून
मी घेतला भरगच्च श्वास, गोड सुवास
अहाहा, इंद्रनगरीत असल्याचा झाला भास
*
एका इष्टॊपवर लोक उतरून गेले
एक सफारी भाई दोस्तासंगं आत चढले
लई फ्येकत होता तुझ्याकडं नजर साला
मला भरपूर राग आला
*
पर उतरताना त्यानं रिलीफ दिला
" काय कपडे घातलेत, काय वास मारतोय," तुझ्याकडं बघून पुटपुटला