खरं तर ही कविता देण्याची हे योग्य स्थळ, वेळ न लायकी नव्हेच. पण कवितेपेक्षाही गायनाच्या सन्दर्भात असल्याने ही कविता मी इथे लिहीतोय. कदाचित याला काव्य म्हणुन काहीच मोल नसेल पण खुप भक्तीने लिहीलीय ही कविता मी!
गानसरस्वती
पवित्र हळवे सूर निराळे,
भैरवाची त्या जात कबिरी,
स्वरश्रुतींच्या हिंदोळ्यावर झुलत
निघाली आर्त किशोरी!
शांत मुद्रा मिटले डोळे,
तर हाती स्वरमंडल बाजे
दो बाजू दो तानपुरे अन
मध्ये शारदा जशी विराजे.
गानसस्वती किशोरीताईंच्या जीवनावर ज्येष्ठ संगीत समीक्षक दत्ता मारुलकर यानी "गानसरस्वती" असं पुस्तक लिहीलं आहे असं ट्वीटरवर वाचनात आलं. कुणा माबोकराकडे आहे का ते पुस्तक? बुकगंगेवर पण नाही, एक दोन वेबसाईट्स सोडल्या तर या पुस्तकाचा कुठेही उल्लेख नाही. दुर्मीळ प्रकार दिसतोय. कुणाकडे असल्यास किवा कुठे मिळेल हे माहित असल्यास नक्की कळवावे ही विनंती!
फेब्रुवारी महिन्यात गणेश कला-क्रीडा मंचावर पार पडलेला 'सहेला रे' हा अविस्मरणीय कार्यक्रम ऐकल्यानंतर मी माझ्या ब्लॉगवर त्याबद्दल लिहीलं होतं. तेव्हा मायबोलीवर account नव्हतं. आज सहज वाटून गेलं की तोच लेख माबोवर शेअर करावा.
तुमच्यासारख्याच एका संगीतभक्तानी केलेलं हे रसग्रहण तुम्हाला आवडेल अशी आशा करतो. चूभूदयाघ्या.
किशोरीताईंचा फोटो आंतरजालावरून.