किशोरीताईंवर एक कविता
खरं तर ही कविता देण्याची हे योग्य स्थळ, वेळ न लायकी नव्हेच. पण कवितेपेक्षाही गायनाच्या सन्दर्भात असल्याने ही कविता मी इथे लिहीतोय. कदाचित याला काव्य म्हणुन काहीच मोल नसेल पण खुप भक्तीने लिहीलीय ही कविता मी!
गानसरस्वती
पवित्र हळवे सूर निराळे,
भैरवाची त्या जात कबिरी,
स्वरश्रुतींच्या हिंदोळ्यावर झुलत
निघाली आर्त किशोरी!
शांत मुद्रा मिटले डोळे,
तर हाती स्वरमंडल बाजे
दो बाजू दो तानपुरे अन
मध्ये शारदा जशी विराजे.